Tuesday, January 3, 2023

सिल्लोड येथील राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनात तिस-या दिवशीही राज्‍यभरातील शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद

शेतक-यांसोबतच विद्या‍र्थीही जाणुन घेत आहेत आधुनिक कृषि तंत्रज्ञान

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आणि महाराष्ट्रातील चारही कृषी विद्यापीठांना ५० वर्षे पूर्ण झाली असून या विद्यापीठ विकसित कृषी तंत्रज्ञान शेतक-यांपर्यंत पोहोचविण्‍याच्‍या दृष्‍टीने कृषी विभागाच्‍या पुढाकाराने दिनांक जानेवारी ते जानेवारी दरम्‍यान राज्‍याचे कृषि मंत्री मा ना श्री अब्‍दुल सत्‍तार यांच्‍या संकल्‍पनेतुन सिल्लोड (जि.औरंगाबाद) येथे राज्यस्तरीय सिल्लोड कृषि महोत्सव २०२३ आयोजन करण्‍यात आले असुन या महोत्‍सवाच्‍या उदघाटन मुख्‍यमंत्री मा ना श्री एकनाथ शिंदे यांच्‍या शुभहस्‍ते झाले. उदघाटनप्रसंगी रेल्‍वे, कोळसा व खाणी मंत्रालयाचे केंद्रीय राज्‍यमंत्री मा ना श्री रावसाहेब दानवे, केंद्रीय राज्‍यमंत्री (वित्‍त) मा ना डॉ भागवत कराड, राज्‍याचे फलोत्‍पादन मंत्री मा ना श्री संदीपान भुमरे, कृषीमंत्री मा ना श्री अब्‍दुल सत्‍तार, सहकार, इतर मागास बहुजन कल्‍याण मंत्री मा  ना श्री अतुल सावे, लोकसभा सदस्‍य मा श्री सय्यद इम्तियाज जलील, प्रधान सचिव (कृषी) मा श्री एकनाथ डवले, कृषि आयुक्‍त मा श्री सुनील चव्‍हाण, कुलगुरू (वनामकृवि, परभणी) मा डॉ इन्द्र मणि, कुलगुरू (डॉपंदेकृवि, अकोला) मा डॉ शरद गडाख आदींची प्रमुख उपस्थिती होती.

पहिल्या दिवसापासूनच कृषि प्रदर्शन आणि तांत्रिक सत्रास शेतकऱ्यांचा प्रचंड उत्साह दिसला तिसरा दिवसी दिनांक ३ जानेवारी रोजी शेतकरी आणि विद्यार्थ्यांची मोठी हजेरी लावली. मराठवाडयातील महाविद्यालय आणि शालेय विद्यार्थीही मोठया प्रमाणात सहभागी होऊन आधुनिक कृषि तंत्रज्ञान समजुन घेतांना दिसत आहेत. कृषी प्रदर्शनात सहाशे दालने उभारण्यात आली असुन प्रामुख्याने यात राज्यातील चार कृषी विद्यापीठ, शासकीय विभाग, महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ, महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ यांचा समावेश आहे. बियाणे, रासायनिक खते, सिंचन साधने, रोपवाटिका, पशुसंवर्धन, सोलार, प्लास्टिक लायनिंग, कृषि ड्रोण आदी दालनाचा समावेश असुन धान्य महोत्सव तसेच उमेद मार्फत इतर साहित्य आणि खाद्यपदार्थाची दालने लावण्यात आलेली आहेत. यापूर्वी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शने हे नाशिक, पुणे आणि नागपूर या सारख्या मोठ्या शहरातच आयोजन केल्या जात असे यावर्षी प्रथमच कृषी मंत्री मा. ना. श्री. अब्दुल सत्तार यांच्या पुढाकारातून सिल्लोड सारख्या ग्रामीण भागात आयोजित करण्यात आले. ग्रामीण भागात आयोजन करून जास्तीत जास्त शेतकरी या तंत्रज्ञानाचा लाभ घेऊन आपली शेती चांगल्या पद्धतीने करतील, हा उद्देश यामागे आहे. 

आजच्या तिसऱ्या दिवसाचे वैशिष्ट्ये म्हणजे महाविद्यालयीम विद्यार्थ्यांची मोठी उपस्थिती होती विद्यार्थीसोबत राज्याच्या कानाकोपऱ्यातुन  शेतकरी मोठ्या संख्येने हजर होते. प्रदर्शनात चारही कृषी विद्यापीठाचे कृषी तंत्रज्ञान जाणून घेण्यासाठी शेतकरी आग्रही होते आपल्या शेतीसाठी कोणते तंत्रज्ञान फायदेशीर राहील याचे तंत्रज्ञान जाणून घेत होते. याच बरोबर विविध कृषी विषयावर चर्चा सत्र आणि परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. २०२३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृनधान्य वर्ष असल्याने प्रदर्शनातील दालनात त्याबाबतची मांडणी ठळकपणे दिसून येत आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन झालेल्या आहेत त्यांची दालने देखील लावण्यात आलेली आहेत. मका पीक मूल्यसाखळी सहभागधारकांची राष्ट्रस्तरीय कार्यशाळा दिनांक २ जानेवारी रोजी स्मार्ट प्रकल्पाच्या वतीने करण्यात आले, यामध्ये निविष्ठा पुरवठादार, पीक उत्पादन करणारे शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपनी (एफपीओ) खरेदीदार कंपनी मकावर प्रक्रिया करणारे उद्योजक इत्यादींचा समावेश होता जेणे करून सर्व सहभागधारकांच्या अपेक्षा, अडचणी आणि उपाय यावर चर्चा करण्यात आली. शेतीसाठी मजूर उपलब्धता ही मोठी समस्या झाली आहे त्यामुळे तृणधान्य पिकाचे क्षेत्र कमी होत आहे यासाठी या पिकाची काढणी मळणी यावर काही आधुनिक कृषी अवजारे आहेत काय? याची चौकशी शेतकरी करत होती शेतीमध्ये पेरणीपासून काढणीपर्यंतची कामे आज सर्व यांत्रिकीकरण होत असले तरी ज्वारी, बाजरी या सारख्या पिकाची काढणी, कापूस पिकाची वेचणी हे प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत यासाठी शेतकरी विद्यापीठाकडे प्रश्न विचारत आहेत. कृषी प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी राज्याचा कृषी, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ आणि इतर शासकीय विभाग परिश्रम करत आहेत. राज्यातील कानाकोपऱ्यातील शेतकरी प्रदर्शन स्थळी भेट देत असुन आपल्या शेतीसाठी फायदेशीर असलेले कृषी तंत्रज्ञान आत्मसात करत असल्‍याचे चित्र दिसुन आले. माननीय कृषीमंत्री मा ना श्री अब्‍दुल सत्‍तार कृषि प्रदर्शनीस भेेट देऊन स्‍वत: जातीने लक्ष देत असुन महोत्‍सवाकरिता स्थानिक कृषी विभाग मोठी धावपळ करत आहेत, दिनांक ४ आणि ५ जानेवारी दोन दिवस हा महोत्‍सव राहणार आहे.

No comments:

Post a Comment