Tuesday, February 28, 2023

Two Day Sensitization Workshop on Academic Management System organised at VNMKV, Parbhani

ICAR-IASRI, New Delhi and NAHEP-CAAST, VNMKV, Parbhani jointly organized a two day Sensitization Workshop on Academic Management System at VNMKV, Parbhani during 28th Feb to 1st March, 2023. The workshop was inaugurated on 28th February under the chairmanship of Dr. Indra Mani, Vice-Chancellor, VNMKV, Parbhani. Dr. Prashantkumar Patil, Vice-Chancellor, MPKV, Rahuri, Dr. Sudeep, PI, NAHEP Component-2 & Head (CA), ICAR-IASRI, New Delhi, Dr. R.C.Goyal, IT Consultant, and Dr. D.N.Gokhale, Director of Instruction, VNMKV, Parbhani graced the function through hybrid mode.  

In his inaugural address, Hon'ble VC Dr. Indra Mani stated that the online Academic Management System (AMS) will streamline the university's academic work and automate various academic activities. This will increase efficiency and transparency in university education system and save time and effort. It will be extremely beneficial in implementing the curriculum outlined in the new National Education Policy (NEP 2020). Dr. Prashantkumar Patil, VC, MPKV gave his best wishes for the workshop.

Dr. Sudip Marwaha said that, the VNMKV implemented the AMS by accurately filling out the required information in a short period of time. Because of the system, all educational work will be completed in time, and the entire process from admission upto the completion of the degree will be updated in the system. Students will benefit from this system. The AMS includes curriculum management, student management, faculty management, e-learning and online fee collection.

In his guidance Dr. R.C.Goyal said that through AMS every academic information of the institutes should be available to the students, faculty members and administrator at one click at anywhere and anytime. While Dr. D.N. Gokhale mentioned the efforts taken by the University for AMS.

In technical session, the hands on training given by Dr. R.C.Goyal Mrs. Rajni Gulia and Mrs. Nisha about Academics Management System (AMS), blended learning platform, e-learning etc.

The welcome address delivered by Dr. R.V.Chavan and Dr. G.U.Shinde briefed about the NAHEP project activities at VNMKV, Parbhani. The programme hosted by Dr. Veena Bhalerao and Dr. R.V.Shinde proposed vote of thanks. The program attended by Associate Dean Dr. Syed Ismail, Dr. Jaya Bangale, Dr. B.M. Thombre, Dr. J.E. Jahagirdar, Dr. S.D. Bantewad, Dr. R.D. Ahire, Dr. B.V.Asewar, Dr. K.R.Kamble, Dr. R.B.Kshirsagar, faculty members of the university attended the programme online and offline mode.



Collaborative proposals of VNMKV, Parbhani with TAFE and Dabur

Collaborative proposals of VNMKV, Parbhani with TAFE and Dabur presented in front of Hon. Minister Agriculture Govt of Maharashtra Shri. Abdul Sattar and government officers on dated 28.02.2023. The proposals such J Farm and Adaptive research and Mechanization center for Maharashtra with TAFE group and  Cultivation of medicinal plants and their R & D with Dabur Group discussed in details and both the proposals are principally approved by Hon. Minister.

Prof Dr. Indra Mani, Hon. Vice Chancellor VNMKV, Commissioner Agriculture Shri. Eknath Dawale, representatives of both industries, Dr U M Khodke ADP (Ag. Engg.), Dr Dhirajkumar Kadam, Registrar, Dr G M Waghmare and Prof H B Patil were present on this occasion. Dr PG Patil Hon. VC MPKV Rahuri also graces this occasion with his presence.


Friday, February 24, 2023

Visit of Hon'ble Minister Shri. Nitinji Gadkari



The People's Convention Millets for Millions 24-25 Feb, 2023 at ICAR, New Delhi

 


Dr. Indra Mani, Hon'ble Vice-Chancellor, VNMKV, Parbhani participated in the People's Convention Millets for Millions orgnised at ICAR, New Delhi during 24-25 Feb, 2023.

व्‍हॉलीबॉल स्‍पर्धेत वनामकृविच्‍या मुलीच्‍या संघास सुवर्ण पदक

हिसार (हरियाणा) येथील चौधरी चरण सिंह हरियाणा कृषी विद्यापीठात २१वी अखिल भारतीय आंतर कृषि विद्यापीठ स्‍पर्धा २०२२-२३ चे दिनांक २० फेब्रवारी ते २४ फेब्रुवारी दरम्‍यान आयोजन करण्‍यात आले होते. यात व्‍हॉलीबॉल स्‍पर्धेत वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या मुलीच्‍या संघाने सुवर्ण पदक प्राप्‍त करून मानाचा तुरा रावला तसेच सर्वसाधारण गटातील चॅम्पियन्स ट्रॉफी प्राप्‍त केली. यावेळी चौधरी चरण सिंह हरियाणा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ बी. आर; काम्‍बोज यांच्‍या हस्‍ते ट्रॉफी प्रदान करण्‍यात आली. सदर यशाबाबत कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि, शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, कुलसचिव डॉ धिरजकुमार कदम, विद्यार्थी कल्‍याण अधिकारी डॉ सचिन मोरे आदींनी अभिनंदन केले. स्‍पर्धेत देशातील कृषि विद्यापीठातील ६५ संघाने सहभाग नोंदविला होता. संघास डॉ आशाताई देशमुख, डॉ डि एफ राठोड, डॉ चौव्‍हान आदींनी मार्गदर्शन केले.

Thursday, February 23, 2023

विद्यार्थ्यांनी आपल्यातील कलागुण जोपासावे …… पोलीस निरीक्षक श्री शिवाजी बंटेवाड

वनामकृवितील बदनापूर कृषी महाविद्यालयात क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन

विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन जीवनामध्ये अभ्यासासोबतच आपल्यातील कलागुण जोपासावे, विद्यार्थी जीवन आनंदी, उत्साही व निरोगी राहण्यासाठी ते कलागुण ओळखून त्याला चालना द्यावी जेणेकरून आपले विद्यार्थीजीवन हे सुकर व कायम स्मरणीय राहील असे प्रतिपादन बदनापूरचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांनी केले ते कृषी महाविद्यालय, बदनापूर मार्फत आयोजित क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी उद्घाटक म्हणून बोलत होते. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्‍या बदनापुर येथील कृषी महाविद्यालयाच्‍या वतीने दिनांक २३ ते २५ फेब्रुवारी रोजी क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष व कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य डॉ. आर. डी. अहिरे यांनी क्रीडा महोत्सवाच्या अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विद्यापीठस्तरावर क्रीडाक्षेत्रात केलेल्या कामगिरीबद्दल अवगत करून दिले तसेच क्रीडा प्रकारासाठी आवश्यक त्या सोयीसुविधा विद्यार्थ्यांना पुरविण्यात येतील असे आश्वासन दिले.

क्रीडा महोत्सवादरम्यान क्रिकेट, व्हॉलीबॉल, खो-खो, कबड्डी, बुद्धिबळ व टेबल टेनिस आदी विविध क्रीडा प्रकारांचा समावेश करण्यात आलेला असून मुलांसाठी व मुलींसाठी स्वतंत्र सामन्यांचे आयोजन करण्यात आलेले आहे. यावेळी राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा डॉ. एन. डी. देशमुख यांनी केले. उद्घाटन प्रसंगी कृषी संशोधन केंद्र, बदनापूरचे प्रभारी अधिकारी डॉ. डी. के. पाटील, जिमखाना उपाध्यक्ष डॉ. एस. एस. माने यांच्यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सौजन्‍य – डॉ एन डी देशमुख, कृषि महाविद्यालय, बदनापुर


Wednesday, February 22, 2023

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या २८ व्या दीक्षांत समारंभात वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू मा प्रा. डॉ. इन्द्र मणि यांनी केले मार्गदर्शन

नाशिक – स्वयंअध्ययन साहित्याची गुणवत्ता अनेक वेळा सिद्ध झाली आहे. नोंदणीकृत विद्यार्थ्यांच्या घरापर्यंत स्वयंअध्ययन साहित्य पोहोचविण्याची तत्पर वितरण यंत्रणा, अभ्यास केंद्रांवर तज्ज्ञ समुपदेशकांकडून विद्यार्थ्यांचे योग्य समुपदेशन, प्रश्नपत्रिकांचे ऑनलाइन वितरण, मूल्यमापन, विद्यार्थ्यांची परीक्षेतील चांगली कामगिरी आणि राज्यभर विद्यापीठाने विकसित केलेली प्रशासकीय यंत्रणा, यामुळे विद्यापीठ स्वत:ची ओळख निर्माण करण्यात यशस्वी झाले आहे, असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू मा प्रा. डॉ. इन्‍द्र मणि यांनी केले. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या २८ व्या दीक्षांत समारंभाचे आयोजन दिनांक २२ फेब्रुवारी रोजी करण्‍यात आले होते, समांरंभात मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.

मा डॉ इन्‍द्र मणि म्‍हणाले की , नवी शैक्षणिक धोरण २०२० ची बीजे खुल्या आणि दूरस्थ शिक्षण प्रणालीत दडलेली आहेत. या धोरणात अनेक चांगली वैशिष्ट्ये असली तरी कोणत्याही संस्थेची प्रगती त्याच्या अंमलबजावणीच्या दृष्टीकोनावर आणि त्या संस्थेच्या अद्वितीय सामर्थ्यावर अवलंबून असते. स्वयंअध्ययन साहित्य ही कोणत्याही मुक्त विद्यापीठाची खरी ताकद आणि कणा आहे.

विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील यांनी विद्यापीठाने नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सर्व शैक्षणिक शिक्षणक्रमांमध्ये बदल करण्याची प्रक्रिया सुरू केल्याचे सांगितले. विद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केले होते, असेही त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाला व्यवस्थापन मंडळाचे सदस्य प्रा. डॉ. जयदीप निकम, प्रा. डॉ. अनिल कुलकर्णी, ‘सह्याद्री’ कृषी समुहाचे मुख्य संचालक विलास शिंदे आदी उपस्थित होते. प्रारंभी सर्व पाहुण्यांचे मिरवणुकीने मुख्य व्यासपीठाजवळ आगमन झाले. कुलसचिव तथा परीक्षा नियंत्रक भटूप्रसाद पाटील यांनी मानदंडसह या मिरवणुकीचे नेतृत्व केले. २०२३-२४ या शैक्षणिक वर्षापासून बहुतांश शिक्षणक्रम नव्या स्वरुपात दिले जाणार आहेत. अकॅडॅमिक बँक ऑफ क्रेडिटच्या (एबीसी) नोंदणीची प्रक्रिया विद्यापीठात सुरू आहे. आतापर्यंत चार लाख विद्यार्थ्यांची नोंद करण्यात आली आहे. मुक्त विद्यापीठाच्या पदवीप्रदान समारंभात पदविकाधारक २४५१८, पदव्युत्तर पदविकाधारक १२, पदवीधारक एक लाख १४ हजार ३२८, पदव्युत्तर पदवीधारक १६३६९, पीएच. डी धारक पाच तर, एम.फिलधारक दोन स्नातकांना पदवी प्रदान करण्यात आली.






 

Sunday, February 19, 2023

VNMKV, Parbhani signed MoU with the ICAR-NBSS & LUP, Nagpur

The MoU aimed to create digital soil mapping of the entire Marathwada region

A Memorandum of Understanding (MoU) was signed on February 16, 2023 between Vasantrao Naik Marathwada Krishi Vidyapeeth (VNMKV) and ICAR-National Bureau of Soil Survey and Land Use Planning (NBSS & LUP), Nagpur. Hon’ble Vice-Chancellor Dr. Indra Mani, Director of NBSS & LUP Dr. B.P.Bhaskar, Director of Research Dr. D.P. Waskar, and HoD (Dept. of Agril. Chemistry & Soil Sci.) Dr. Pravin Vaidya signed the MoU.

The MoU is aimed at the development of digital soil mapping of the whole Marathwada region of Maharashtra and the creation of a decision support system for land use planning and sustainable agriculture. The MoU facilitates the sharing of scientific expertise in remote sensing and GIS, soil survey, land use planning, soil site suitability, soil fertility, and site specific soil and nutrient management for sustainable agriculture in the region, which is beneficial to the farmers for proper selection of crops as per soil types. A long-term collaborative cutting-edge research programme will be undertaken to develop site-specific advisory, information and diagnostics for sustainable soil use and production that will benefit farmers. Research instrumentation facilities at both institutes will be made accessible to the faculty, scientists, and PG students.

The members of Executive Council of VNMKV viz., MLC Mr. Satish Chavan, MLC Mr. Rameshrao Karad, MLA Mr. Abhimanyu Pawar, MLA Dr. Rahul Patil, and senior officers were present on this occasion. 

Saturday, February 18, 2023

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाची २०९ वी कार्यकारी परिषदेची बैठक संपन्‍न

209th Executive Council Meeting of VNMKV, Parbhani 


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाची २०९ वी कार्यकारी परिषदेची बैठक दिनांक १६ फेब्रुवारी रोजी कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि यांच्‍या अध्‍यक्षतेखाली संपन्‍न झाली. बैठकीस कार्यकारी परिषदेचे सदस्‍य विधानपरिषद सदस्‍य मा आ श्री सतीश चव्‍हाण, विधानपरिषद सदस्‍य मा आ श्री रमेशराव कराड, परभणी विधानसभेचे आमदार मा डॉ राहुल पाटील, विधानसभा सदस्‍य आमदार मा श्री अभिमन्‍यु पवार,  मा डॉ िआदिती सारडा, मा श्री भागवत देवसरकर, मा श्री विठ्ठलराव सकपाळ, मा श्री सुरज जगताप, मा श्री प्रविण देशमुख, मा श्री दिलीप देशमुख, शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ देवराव देवसरकर, कुलसचिव डॉ धिरजकुमार कदम, विद्यापीठ अभियंता श्री दीपक काशाळका, विद्यापीठ नियंत्रक श्रीमती दिपाराणी देवतराज आदींची प्रमुख उपस्थिती होती. बैठकीत विविध धोरणात्‍मक निर्णय घेण्‍यात आले. विद्यापीठाचे नामांकन वाढीकरिता करण्‍यात येणा-या उपाय योजना, विविध सामजंस्‍य करार, विद्यार्थी, शेतकरी व कर्मचारी यांच्‍या दृष्‍टीने विविध निर्णय घेण्‍यात आले. याप्रसंगी विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे नवनियुक्‍त सदस्‍याचे विद्यापीठाच्‍या वतीने सत्‍कार करण्‍यात आला.





सगरोळी येथील कृषी विज्ञान केंद्र व कृषि विभाग यांच्‍या वतीने आयोजित कृषी तंत्रज्ञान महोत्‍सव – कृषीवेध कार्यक्रमाचा समारोप

 





Friday, February 17, 2023

हिसार (हरियाणा) येथील अखिल भारतीय अंतर कृषी विद्यापीठ क्रीडा स्पर्धेसाठी वनामकृविचा संघ

हिसार (हरियाणा) येथील अखिल भारतीय अंतर कृषी विद्यापीठ क्रीडा स्पर्धेसाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी चा संघ दिनांक १८ फेब्रुवारी रोजी रवाना 


A sport team of VNMKV, Parbhani for All India Inter Agril University Sports Meet at Haryana Hisar

Friday, February 10, 2023

The MoU signed between Kansas State University (USA) and VNMKV, Parbhani

A memorable & historical moment in the annals of VNMKV, Parbhani .... Hon'ble Dr. Indra Mani

The Hon’ble Dr. Indra Mani, Vice-Chancellor of the VNMKV, Parbhani visited USA during 5th February to 15th February to sign Memorandum of Understanding (MoU) with reputed Universities of USA viz., University of Florida (UF), Kansas State University (KSU), University of Nebraska– Lincoln (UNL) and also visited to Washington State University (WSU) under National Agricultural Higher Education Project (ICAR-NAHEP).

On 10th February, 2023, the MoU signing ceremony organized at Kansas State University. The MoU was signed by Dr. David V. Rosowsky, Vice President for Research (KSU) and Dr. Indra Mani, VC, VNMKV. The purpose of MoU to establish a mutual collaboration for research projects of students and faculty, training and academic teaching participation regarding digital farming.

Both the Dr. Indra Mani and Dr. David V. Rosowsky briefed about the two premier institutions. In his speech, Dr. Indra Mani said it is a memorable and historical moment in the annals of VNMKV, Parbhani. Dr. Indra Mani briefed the present situation of the Indian agriculture.

Dr. Vara Prasad, Director & University Distinguished Professor (KSU), Dr. Emest Minton, Dr. Jan Middendorf, Dr. Naza Lilja, Dr. Grant Chapman, Dr. Raj Khosla, Dr. Kaliramesh Siliveru from KSU were present and other diverse faculty members from different colleges of the University were present on this occasion.

The MoU will help in the capacity building of students, faculty in agri-food system and associated entrepreneurship and also gain international exposure to better serve the need of agri-food system in India and Maharashtra. This MoU facilitated to develop mutual beneficial capacity building programs between KSU and VNMKV.  








Tuesday, February 7, 2023

VNMKV, Parbhani signed the MoU with University of Florida (USA)

The VNMKV, Parbhani signed the MoU with University of Florida, Gainesville, Florida on dt. 06.02.2023. The Hon’ble Vice Chancellor Dr. Indra Mani and Dr. Marta L Wayne, Dean of the International Centre & Associate Provostof University of Florida signed the MoU at Gainesville. The Dr Aditya Singh and Dr Vivek Sharma were present from ABE, UF, Gainesville. The purpose of MoU to establish a mutual collaboration for research projects of students and faculty, training and academic teaching participation regarding digital farming.


Wednesday, February 1, 2023

मौजे गल्ले बोरगाव (ता खुलताबाद, जि. औरंगाबाद) येथे शेतीदिन साजरा

मौजे गल्‍ले बोरगाव शिवार बहरले वनामकृवि विकसित ज्‍वारी सुपर मोतीने

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्‍या औरंगाबाद येथील विभागीय कृषी विस्‍तार शिक्षण केंद्र आणि जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालय औरंगाबाद यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने आंतरराष्‍ट्रीय पौष्‍टीक तृणधान्‍य वर्षानिमित्‍त दिनांक ३१ जानेवारी रोजी मौजे गल्ले बोरगाव (ता खुलताबाद, जि. औरंगाबाद) येथील श्री ज्ञानेश्वर भगत यांच्या शेतावर शेतीदिन आणि विद्यापीठ संशोधीत रब्बी ज्वारीचा सुपर मोती पिक पाहणी कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले होते. कार्यक्रमास सहयोगी संशोधन संचालक डॉ सुर्यकांत पवार, खुलताबाद तालुका कृषी अधिकारी शिरीष घनबहादूर, विभागीय कृषी विस्तार शिक्षण केंद्राचे रामेश्वर ठोंबरे, सरपंच विशाल खोसरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

मार्गदर्शनात डॉ सुर्यकांत पवार म्‍हणाले की, परभणी कृषी विद्यापीठाने रब्‍बी ज्‍वारीचे अनेक चांगले वाण विकसित केले असुन सुपर मोती हा वाणाची शेतकरी मोठया प्रमाणात लागवड करित आहेत. या वाणाची ज्‍वारीचे उत्‍पादन आणि चाराचे उत्‍पादन दोन्‍ही चांगले असुन यामुळे ज्‍वारी खाण्‍याकरिता व चारा जनावरांकरिता दोन्‍ही गोष्‍टी साध्‍य होतात. येणा-या रब्‍बी हंमागात सुपर मोती ज्‍वारी लागवडी खालील क्षेत्र वाढी करिता प्रयत्‍न करू. येत्या रब्बीत गल्ले बोरगाव हे सर्वांच्या सहकार्याने सुपर मोतीचे करू, असे ते म्‍हणाले.

श्री रामेश्वर ठोंबरे म्हणाले की, मागील दोन वर्षी या गावात या वाणानी चांगले उत्पादन दिले म्हणून २०२२ रब्बी हंगामात विद्यापीठ निर्मित संशोधित ज्वारी सुपर मोती वाणाची मोठी मागणी शेतकऱ्यांनी केली होती.  तर तालुका कृषी अधिकारी शिरीष धनबहादूर म्हणाले की, गल्‍ले बोरगाव हे खुलताबाद तालुक्यातील हे एक महत्वाचे रब्बी ज्वारी पिकविणारे गाव असुन हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्षात या शिवारचे महत्व अधोरेखित होते.

गल्‍ले बोरगाव या गावात विद्यापीठ संशोधित सुपरमोती वाणाची ५० एकर क्षेत्रावर लागवड केलेली असुन या शिवाय कृषी विभागाच्या वतीने पीक प्रात्यक्षिकेही देण्यात आलेली आहे, यात ज्वारीचा इतर वाणाचा समावेश आहे. संपुर्ण शिवारात रब्‍बी ज्‍वारीचे पिक सध्‍या चांगलेच बहरात असुन यात सुपरमोती वाणाची वाढ चांगली आहे. यावेळी उपस्थित मान्‍यवर व शेतकरी बांधवांनी विविध ज्‍वारीच्‍या प्रात्‍यक्षिक प्रक्षेत्रास भेट दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री एस बी धबाले यांनी केले तर आभार श्याम खोसरे यांनी मानले. प्रगतशील शेतकरी तुळशीराम औटे, किशोर खोसरे, श्याम खोसरे, पांडुरंग वेताळ, संतोष चंद्रटिके, कारभारी ठेंगडे यांच्यासह  सुपरमोती या वाणाची लागवड करणारे शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वीतेसाठी ज्ञानेश्वर मित्रमंडळ व ग्रामस्‍थांनी परिश्रम घेतले.


आविष्‍कार स्‍पर्धे अंतर्गत वनामकृविची विद्यार्थीनी दिपाली संगेकर हिने राजभवनात केले संशोधन प्रकल्‍पाचे सादरीकरण

पंधराव्या आंतरमहाविद्यालयीन आविष्कार स्पर्धेतुन निवड झालेल्‍या वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील सामुदायिक विज्ञान महाविद्यालयातील आचार्य पदवीची विद्यार्थ्‍यांनी दिपाली संगेकर हिने  प्रजासत्ताक दिनी दिनांक २६ जानेवारी रोजी राजभवन येथे आपला संशोधन प्रकल्प सादर केला. यामध्ये राज्‍यातील एकूण २७ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. सदर सादरीकरण पाहण्यासाठी राज्यपाल आणि विद्यापीठाचे कुलपती मा श्री भगत सिंग कोश्यारी, राज्याचे मुख्यमंत्री मा ना श्री एकनाथ शिंदे आदीसह अनेक उद्योगपती उपस्थित होते. दिपाली संगेकर हीने मूल्यवर्धित बेकरी उत्पादनांच्या निर्मितीमध्‍ये डिओइल्ड सोया मीलचा वापरयावर आपला संशोधन प्रकल्‍प सादर केला. यावेळी राज्‍यपाल मा श्री भगतसिंग कोश्यारी आणि मुख्‍यमंत्री मा ना श्री एकनाथ शिंदे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. सदर संशोधन प्रकल्‍पाकरिता निवृत्‍त संशोधिका डॉ आशा आर्या यांनी मार्गदर्शन केले. दिपाली संगेकर हिचे विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ इन्द्र मणि, शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, प्राचार्य डॉ जया बंगाळे, विद्यार्थी कल्‍याण अधिकारी डॉ सचिन मोरे आदींनी अभिनंदन केले.