वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील
ज्वार संशोधन केंद्राच्या वतीने दिनांक २६ जानेवारी रोजी मौजे पिंगळी येथील शेतकरी
श्री रामकिशन पवार यांच्या रब्बी ज्वारीच्या आद्यरेषिय पीक प्रात्यक्षिकांतर्गत
विद्यापीठ विकसित परभणी सुपरमोती या नवीन वाणाच्या प्रक्षेत्रास संशोधन संचालक डॉ
दत्तप्रसाद वासकर व प्रभारी अधिकारी डॉ एल एन जावळे यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी डॉ. दत्तप्रसाद वासकर यांनी उपस्थित शेतक-यांना मार्गदर्शन करतांना म्हणाले की, सन २०२३ हे वर्ष संपुर्ण जगात आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य
वर्ष म्हणुन साजरे करण्यात येत आहे. भारतीय खाद्य
संस्कृतीत भरड धान्यास महत्व आहे परंतु काळाच्या ओघात आपण पाश्चिमात्य खाद्याचा
आभारात समावेश करत आहोत. ज्वारी पिकामुळे मानवास खाण्यास पौष्टिक ज्वारी मिळते तर जनावरांना कडबा मिळतो. हीच जनावरे आपणास शेणखत देतात, याचा उपयोग आपणास जमिन सुपिकतेसाठी होतो. डॉ. एल. एन. जावळे यांनी रब्बी
ज्वारीचे सुधारित वाण व पारंपारिक दगडी वाणामधील फरक सांगितला व इतर शेतक-यांनी
पुढील हंगामामध्ये दगडी वाण घेण्याऐवजी सुधारित वाणांची पेरणी करावी असे आवाहन
केले. भेटी दरम्यान गावातील शेतकरी बांधव
उपस्थित होते.
Friday, January 27, 2023
मौजे पिंगळी येथील ज्वारीच्या आद्यरेषिय पीक प्रात्यक्षिकांची पाहणी
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment