Monday, January 2, 2023

राज्‍यस्‍तरीय सिल्‍लोड कृषी महोत्‍सवातील तांत्रिक सत्रास शेतकरी बांधवाचा प्रतिसाद दिनांक २ जानेवारी

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आणि महाराष्ट्रातील चारही कृषी विद्यापीठांना ५० वर्षे पूर्ण झाली असून या विद्यापीठ विकसित कृषी तंत्रज्ञान शेतक-यांपर्यंत पोहोचविण्‍याच्‍या दृष्‍टीने कृषी विभागाच्‍या पुढाकाराने दिनांक जानेवारी ते जानेवारी दरम्‍यान राज्‍याचे कृषि मंत्री मा ना श्री अब्‍दुल सत्‍तार यांच्‍या संकल्‍पनेतुन सिल्लोड (जि.औरंगाबाद) येथे राज्यस्तरीय सिल्लोड कृषि महोत्सव २०२३ आयोजन करण्‍यात आले असुन या महोत्‍सवाच्‍या उदघाटन मुख्‍यमंत्री मा ना श्री एकनाथ शिंदे यांच्‍या शुभहस्‍ते झाले. सदर महोत्‍सवात तांत्रिक सत्रात राज्‍यातील नामांकीत कृषी तज्ञांचे विविध विषयावर मार्गदर्शन ठेवण्‍यात आले असुन दिनांक २ जानेवारी रोजी तांत्रिक सत्रात मका पीक लागवड तंत्रज्ञानाविषयी डॉ. एस. बी. पवार सर यांनी मार्गदर्शन केले. मका पिकाची लागवड करताना मका पिकांच्या जाती आणि खत व्यवस्थापन याबरोबरच पीक फेरपालट सुद्धा महत्त्वाचा असल्याचे त्यांनी नमूद केले. कृषी मालाच्या विपणनासंबंधी श्रीकांत कुवळेकर, पत्रकार तथा वायदे बाजार तज्ञ, मुंबई यांनी वायदे बाजार संबंधी मार्गदर्शन केले. वायदे बाजाराच्या माध्यमातून शेतकरी भविष्यात होणारे बदल लक्षात घेऊन आपल्या स्वतःच्या शेतमालाची किंमत वायदे बाजारात ठरवून त्याची विक्री करू शकतो. आणि या किमतीवर जर भाव कमी झाले तर त्याची विक्री करून नफाही कमवू शकतो असे त्यांनी उदाहरणासह सांगितले. डॉ. सोमनाथ माने यांनी देशी गोवंशा विषयी माहिती दिली. गिर,सिंधी आणि साहिवाल या अधिक दूध देणाऱ्या गायींचे शास्त्रोक्त नियोजन केल्यास दर्जेदार आणि अधिक उत्पादन मिळू शकते असे त्यांनी सांगितले.

डॉ. अरविंद पांडागळे यांनी कापूस लागवड तंत्रज्ञान याविषयी मार्गदर्शन केले. कापसाची लागवड करताना खत व्यवस्थापन योग्य वेळेतच करून विनाकारण होणाऱ्या फवारणी आणि अधिक खतमात्रा देण्याची गरज नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच शेतकऱ्यांनी डिसेंबर नंतर ज्या किंवा अधिक काळापर्यंत कापूस ठेवणे टाळणे आवश्यक असल्याचे सांगितले. यामुळे बोंड आळी ला आपण आमंत्रण देतो आणि आपले नुकसान करून घेतो असे त्यांनी सांगितले. मत्स्य शेती विषयी डॉ. प्रकाश शिनगारे यांनी मार्गदर्शन केले आणि या भागात सुद्धा कडवंची सारख्या गावाने मत्स्य शेतीत उत्तम काम केल्याचे उदाहरणासह सांगितले. मिरची व टोमॅटो लागवड तंत्रज्ञान याविषयी डॉ. व्ही एस खंदारे यांनी आणि केळी व आंबा लागवड काढणीपश्चात तंत्रज्ञान याविषयी डॉ. शिवाजी शिंदे यांनी मार्गदर्शन केले. एकंदरीतच पिकाच्या काढणी पश्चात तंत्रज्ञानाचा वापर केल्याशिवाय भाजीपाला आणि फळ पिकात उत्तम दर्जा आणि बाजार भाव मिळू शकत नसल्याचे नमूद केले.






No comments:

Post a Comment