Thursday, January 5, 2023

इस्‍त्राईल दुतावासातील श्री याईर एशेल यांची सिल्लोड कृषी महोत्सवातील वनामकृविच्‍या दालनास भेट

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आणि महाराष्ट्रातील चारही कृषी विद्यापीठांना ५० वर्षे पूर्ण झाली असून या विद्यापीठ विकसित कृषी तंत्रज्ञान शेतक-यांपर्यंत पोहोचविण्‍याच्‍या दृष्‍टीने कृषी विभागाच्‍या पुढाकाराने दिनांक जानेवारी ते जानेवारी दरम्‍यान राज्‍याचे कृषि मंत्री मा ना श्री अब्‍दुल सत्‍तार यांच्‍या संकल्‍पनेतुन सिल्लोड (जि.औरंगाबाद) येथे राज्यस्तरीय सिल्लोड कृषि महोत्सव  २०२३ आयोजन करण्‍यात आले असुन या महोत्‍सवाच्‍या उदघाटन मुख्‍यमंत्री मा ना श्री एकनाथ शिंदे यांच्‍या शुभहस्‍ते झाले.

कृषि महोत्‍सवानिमित्‍त आयोजित कृषि प्रदर्शनीत कृषि विभाग, कृषि विद्यापीठे यांच्यासह शासनाचे विविध विभाग, कृषि निगडीत विविध खासगी कंपन्‍या यांची दालने असुन दिनांक ५ जानेवारी रोजी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्‍या दालनास इस्‍त्राईल दुतावासातील कृषि विभागाचे अधिकारी श्री याईर एशेल यांनी भेट दिली. यावेळी विस्‍तार शिक्षण संचालक डॉ देवराव देवसरकर यांनी त्‍यांनी विद्यापीठाच्‍या संशोधनाची माहिती दिली.

माहिती देतांना डॉ देवराव देवसरकर म्‍हणाले की, मराठवाडा विभागातील बदलत्या हवामानात मागील काही वर्षात पडणारे पर्जन्यमान, तापमान यावर आधारित विद्यापीठ कृषी तंत्रज्ञान निर्माण करण्याचा प्रयत्न करत असुन या परिस्थितीत शेतकऱ्याच्या शेतात शाश्वत उत्पादन येण्यासाठी तंत्रज्ञान शेतकऱ्यांना पोहचविण्‍यासाठी विद्यापीठ प्रयत्नशील आहे. चालू वर्ष हे आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष असल्याने या भागातील शेतकरी यात सामील असणाऱ्या काही खास पिके जसे ज्वारी, बाजरी या पिकाच्या क्षेत्रात वाढ व्हावी म्हणून आम्ही  शेतकऱ्याना या पिकाचे महत्व अधोरेखित करत आहोत.

सहयोगी संचालक संशोधन डॉ सूर्यकांत पवार यांनी राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प निर्मिती बाजरा एएचबी-१२०० वाणाची पीक नमुने आणि मानवी आहारात या वाणाचे महत्व सांगुन पाहुण्यांना या वाणाची कणसे नमुने दाखविले. तसेच कृषी संशोधन केंद्र बदनापूर येथून नव्याने विकसित झालेला तूर वाण गोदावरी याविषयी माहिती डॉ दीपक पाटील यांनी दिली. फळ संशोधन केंद्रचे प्रभारी अधिकारी डॉ एम बी पाटील, कृषीतंत्र विद्यालयाचे प्राचार्य डॉ किरण जाधव, मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ पी आर देशमुख कृषी विज्ञान केंद्राचे मुख्य शास्त्रज्ञ डॉ किशोर झाडे पैठण आदीसह कृषी शास्रज्ञ उपस्थित होते.

No comments:

Post a Comment