कृषी विज्ञान केंद्र म्हणजे शेतीतील विज्ञान ........ विकास गोफणे
कृषी
विज्ञान केंद्र म्हणजे शेतीतील विज्ञान होय, तुळजापूर
कृषी विज्ञान केंद्रामुळे उस्मानाबाद जिल्ह्यातील ग्रामीण महिलांचे उत्पन्नात वाढ होत
आहे, असे प्रतिपादन संपदा ट्रस्टचे श्री विकास गोफने यांनी केले.
तुळजापूर कृषी विज्ञान केंद्र आणि उमेद तुळजापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आर्या
प्रकल्पांतर्गत दिनांक १७ जानेवारी ते २१ जानेवारी दरम्यान आयोजित पाचदिवसीय शेळीपालन या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटन
प्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर कृषी
विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक श्री लालासाहेब देशमुख, उमेदचे
तालुका व्यवस्थापक श्री विनायक पवार,
प्रशिक्षण समन्वयक डॉ. विजयकुमार जाधव, शास्त्रज्ञ
डॉ. दर्शना भुजबळ, डॉ. नकुल हरवाडीकर, सखाराम
मस्के, शिवराज रुपनर,
उमेदचे श्री युवराज शिंदे आदी उपस्थित होते.
मार्गदर्शनात श्री गोफणे म्हणाले की, कृषी विज्ञान केंद्राने जिल्ह्यात अनेक कृषि उद्योजक घडविले असून तांत्रिक ज्ञानासाठी आम्ही नेहमीच कृषी विज्ञान केंद्राकडे येतो. उमेदचे तालुका व्यवस्थापक श्री. विनायक पवार म्हणाले की, कृषी विज्ञान केंद्राच्या प्रशिक्षणांमध्ये आम्ही नेहमीच उमेदच्या विविध स्तरावरील महिलांचा समावेश करून त्यांच्या ज्ञानामध्ये जास्तीची भर घालतो. विविध प्रशिक्षणातील ज्ञानामुळे गाव पातळीवरील पशु सखी या शेळ्यांना प्राथमिक उपचार गावातच करत असून जनावरांच्या विविध लसीकरणाचा प्रसार देखील करत आहेत. कार्यक्रम समन्वयक श्री लालासाहेब देशमुख म्हणाले की, शेळीपालन प्रशिक्षणांत महिलांनी शेळीपालनाच्या तांत्रिक बाजू समजावून घेऊन त्यांचा वापर आपल्या दैनंदिन शेळीपालनात करून उत्पन्न वाढवावे. जिल्ह्यातील महिलांसाठी कृषी विज्ञान केंद्राचे दरवाजे सदैव उघडे आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. विजयकुमार जाधव यांनी केले तर आभार श्री सखाराम मस्के यांनी मानले.
No comments:
Post a Comment