स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आणि महाराष्ट्रातील चारही कृषी विद्यापीठांना ५० वर्षे पूर्ण झाली असून या विद्यापीठ विकसित कृषी तंत्रज्ञान शेतक-यांपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने कृषी विभागाच्या पुढाकाराने दिनांक १ जानेवारी ते ५ जानेवारी दरम्यान राज्याचे कृषि मंत्री मा ना श्री अब्दुल सत्तार यांच्या संकल्पनेतुन सिल्लोड (जि.औरंगाबाद) येथे राज्यस्तरीय सिल्लोड कृषि महोत्सव – २०२३ आयोजन करण्यात आले असुन या महोत्सवाच्या उदघाटन मुख्यमंत्री मा ना श्री एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते झाले. सदर महोत्सवात तांत्रिक सत्रात राज्यातील नामांकीत कृषी तज्ञांचे विविध विषयावर मार्गदर्शन ठेवण्यात आले असुन दिनांक ४ जानेवारी रोजी तांत्रिक सत्रात डॉ सचिन मोरे यांनी भारतीय शेतमालाची निर्यात एक दृष्टिक्षेप या विषयावरती मार्गदर्शन केले. सध्या भारतातील शेतमालाच्या निर्यातीचा वाटा पाहता विशेषतः प्रक्रियायुक्त शेतमालाची निर्यातीसाठी भारताला संधी असल्याचे त्यांनी नमूद केले. प्रा. सचिन बांदगुडे, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांनी पांडू क्षेत्र व्यवस्थापना विषयी माहिती दिली. शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतावरतीच मूलभूत बाबी लक्षात घेऊन माती आणि पाण्याचे संधारण केल्यास सूक्ष्म पाणलोट व्यवस्थापनातून अधिक फायदा होऊ शकेल अशी उदाहरणासह माहिती दिली. डॉ. जयंत देशमुख यांनी एकात्मिक शेती पद्धती वर मार्गदर्शन करताना जिरायत भागासाठी शेळीपालन आणि कोरडवाहू फळ पिकांचा समावेश केल्यास प्रचलित पीक पद्धती फायदेशीर होऊ शकते असे सांगितले. तसेच बागायती भागामध्ये पीक पद्धती बरोबरच दुग्धव्यवसाय आणि फळबाग लागवड फायदेशीर ठरू शकते असे त्यांनी सांगितले. डॉ. संजय पाटील यांनी मोसंबी लागवड तंत्रज्ञान याविषयी माहिती दिली. रोपांची योग्य निवड आणि जमिनीची योग्य निवड अत्यंत महत्त्वाची असून सुरुवातीच्या काळातील खत व्यवस्थापन आणि पाणी व्यवस्थापन चांगले ठेवल्यास एक उत्तम भाग तयार होऊ शकते असे त्यांनी सांगितले. सकाळच्या सत्रात अध्यक्ष म्हणून कृषी परिषदेचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. शिर्के आणि संशोधन संचालक डॉ. हरिहर कौसडीकर यांनी तर सहअध्यक्ष म्हणून डॉ. आर जी भाग्यवंत आणि डॉ. पी आर देशमुख यांनी कामकाज पाहिले.
दुपारच्या
सत्रात महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी चे
शास्त्रज्ञ डॉ. विक्रम कड यांनी शेतमाल बाजारात जाण्यापूर्वी तो रेडी टू
युज या स्वरूपात दिल्यास त्यास भाव चांगला मिळू शकतो हे त्यांनी उदाहरणासह
सांगितले. फळांच्या साठवणुकीसाठी शीत ग्रहांचा आणि शीत वाहतूक पद्धतीचा वापर
महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले. डॉ. एस. आर. पाटील यांनी कोरडवाहू
क्षेत्रासाठी सिताफळ, जांभूळ, कवट यासारख्या फळांची निवड करून त्यांची योग्य निगा
राखल्यास, ही फळ पिके कोरडवाहू क्षेत्रासाठी सुद्धा फायदेशीर ठरू
शकतात असे सांगितले. डॉ. एम बी पाटील यांनी आंबा लागवड तंत्रज्ञान या विषयावर
सविस्तर मार्गदर्शन केले. मोहराचे आणि सुरुवातीच्या काळातील आंब्याचे व्यवस्थापन
अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले. आंबा पिकातील आंबा उत्पादन दरवर्षी
घेण्यासाठी खत व्यवस्थापन आणि योग्य आंब्याची संख्या महत्त्वाचे असल्याचे त्यांनी
नमूद केले. डॉ. व्ही. एस. काळे यांनी हळद लागवड तंत्रज्ञान या विषयावर प्रकाश
टाकला. हळद उत्पादनात जमिनीची निवड आणि वानांची निवड करून सेंद्रिय खतांचा वापर
केल्यास चांगले उत्पादन मिळू शकते असे सांगितले. दुपारच्या सत्राचे अध्यक्ष
म्हणून डॉ. डी एन गोखले आणि डॉ. आर डी अहिरे यांनी काम पाहिले. तर सहअध्यक्ष
म्हणून डॉ. के टी जाधव आणि डॉ. पी आर झंवर यांनी काम पाहिले.
No comments:
Post a Comment