वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या कृषि किटकशास्त्र विभागातील निवृत्त प्राध्यापक डॉ बब्रुवाण भानुदास गायकवाड यांच्या वतीने कृषी किटकशास्त्र विभागातील पदव्युत्तर आणि आचार्य पदवी अभ्यासक्रमात पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांकरिता सुवर्ण पदकाकरिता रूपये ७.५ लाख रूपय निधीचा धनादेश दिनांक ४ जानेवारी कुलगुरू मा डॉ इन्द्र मणि यांना सपुर्त करण्यात आला. यावेळी सुविद्य पत्नी सौ. सुनिताताई गायकवाड, कुलसचिव डॉ धिरजकुमार कदम, विद्यापीठ नियंत्रक श्रीमती दिपाराणी देवतराज, डॉ पी एस बोरीकर, डॉ डि डब्लु वडनेरकर, डॉ एम बी भोसले, डॉ डि आर मुंढे, मुलगा कोल्हापुर येथील शिवाजी विद्यापीठातील वनस्पतीशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ निखिल गायकवाड, त्यांच्या सुन सौ वर्षा गायकवाड, नात स्नेहल आणि नातु साहिल आदी उपस्थित होते.
याप्रसंगी कुलगुरू मा डॉ इन्द्र
मणि यांनी डॉ गायकवाड यांच्या नावे सुवर्णपदकामुळे किटकशास्त्र विभागातील पदव्युत्तर
विद्यार्थ्यांना संशोधनात चांगले कार्य करण्यास चालना मिळणार असल्याचे
प्रतिपादन केले.
निवृत्त डॉ बी बी गायकवाड यांनी यावर्षी वयाची ७५ वर्ष पुर्ण केले असुन ते परभणी कृषि विद्यापीठाचे माजी विद्यार्थी आहे. त्यांनी परभणी कृषि विद्यापीठात १९७५ ते १९९४ दरम्यान तसेच राहुरी विद्यापीठात १९९४ ते २००५ दरम्यान कृषि शिक्षण, संशोधन आणि विस्तार शिक्षण क्षेत्रात भरिव असे योगदान दिले. ते राहुरी येथुन सेवानिवृत्त झाले.
No comments:
Post a Comment