Thursday, January 26, 2023

वनामकृवि विकसित सुर्यफुल वाण एलएसएफएच-१७१

औरंगाबाद जिल्‍हयातील मौजे नेधोना येथील शेतकरी बाबासाहेब गाडेकर यांच्‍या शेतात  वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठत विकसित सुर्यफुल वाण एलएसएफएच-१७१ चांगलाच बहरला असुन सदर पिक हे औरंगाबाद कृषि विज्ञान केंद्राच्‍या वतीने घेण्‍यात आलेल्‍या आद्यरेषीय प्रात्‍यक्षिकाचे आहे. दिनांंक २५ जानेवारी रोजी डॉ के के झाडे व डॉ बी एल पिसुरे यांनी भेट दिली. सदर प्रक्षेत्र हे समुह आद्यरेषीय प्रात्‍यक्षिकांतर्गत मौजे नेधोना येथील निवडक २५ शेतकरी बांधवाच्‍या शेतात घेण्‍यात आलेल्‍या प्रात्‍यक्षिकांचा भाग आहे. सद्यस्थितीत सदर पिक पक्‍व अवस्‍थेत आहे. याच प्रकारे फुलंब्री तालुक्‍यातील वाव्‍हाना येथील २५ निवडक शेतकरी बांधवाना परभणी विद्यापीठ विकसित जवसाचे एलएसए-९३ वाणाचे समुह आद्यरेषी प्रात्‍यक्षिके दिलेली असुन यांना डॉ के के झाडे, डॉ बी एल पिसुरे यांच्‍या सह विद्यापीठ तज्ञ वेळोवेळी मार्गदर्शन करतात.

 

Cluster Frontline Demonstrations on Rabi Oilseeds (CFLD OILSEEDS) conducted by KVK, Aurangabad-I during rabi season 2022. 25 Demonstrations of Sunflower crop Variety LSFH-171 at Nedhona village, Aurangabad, 25 Demonstrations of Linseed crop Variety LSL-93 at Vahvana Tq Fulambri. 25 Demonstrations of Gram crop Variety Phule Vikram at Dongargaon Tq Fulambri. Now crops at maturity stage, and farmers are satisfied with these varieties.



No comments:

Post a Comment