Tuesday, January 3, 2023

राज्यस्तरीय सिल्लोड कृषी महोत्सवात वनामकृविचा सक्रीय सहभागाबाबत कृषिमंत्री मा ना श्री अब्‍दुल सत्‍तार यांनी केले अभिनंदन

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आणि महाराष्ट्रातील चारही कृषी विद्यापीठांना ५० वर्षे पूर्ण झाली असून या विद्यापीठ विकसित कृषी तंत्रज्ञान शेतक-यांपर्यंत पोहोचविण्‍याच्‍या दृष्‍टीने कृषी विभागाच्‍या पुढाकाराने दिनांक जानेवारी ते जानेवारी दरम्‍यान राज्‍याचे कृषि मंत्री मा ना श्री अब्‍दुल सत्‍तार यांच्‍या संकल्‍पनेतुन सिल्लोड (जि.औरंगाबाद) येथे राज्यस्तरीय सिल्लोड कृषि महोत्सव २०२३ आयोजन करण्‍यात आले असुन या महोत्‍सवाच्‍या उदघाटन मुख्‍यमंत्री मा ना श्री एकनाथ शिंदे यांच्‍या शुभहस्‍ते झाले. कृषि महोत्‍सवानिमित्‍त आयोजित कृषि प्रदर्शनीत कृषि विभाग, कृषि विद्यापीठे यांच्यासह शासनाचे विविध विभाग, कृषि निगडीत विविध खासगी कंपन्‍या यांची दालने असुन बाजारपेठांचं नवीन तंत्रज्ञानड्रोन तंत्रज्ञान याची माहिती दिली जात आहे. याशिवाय कृषी विज्ञान केंद्र, महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ, महाबीज, महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ, राष्ट्रीय फलोत्पादन अभियान अशा योजनांची माहिती दालने, कृषी निविष्ठा, तंत्रज्ञान, सिंचन साधने, शेतीविषयक अवजारे, मशिनरी, नवनवीन यांत्रिकीकरण, ऑटोमेटेड फार्मिंग, शेतीपूरक लघुउद्योगांसाठी विशेष दालनशेतकरी गटांनी तयार केलेली उत्पादने आदींसह महोत्सवात एकूण सहाशे दालनाचा समावेश आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाची यात विविध विभागाची व संशोधन केंद्राची ३० दालनाचा समावेश होता, यास शेतकरी बांधवांनी मोठा प्रतिसाद दिला. विद्यापीठ शास्‍त्रज्ञांनीही शेतकरी बांधवाच्‍या विविध प्रश्‍नांची उत्‍तरे देऊन समाधान केले. विद्यापीठाच्‍या शास्‍त्रज्ञांच्‍या सक्रीय सहभागाबाबत राज्‍याचे माननीय कृषीमंत्री मा ना श्री अब्‍दुल सत्‍तार यांनी कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि आणि सर्व सहभागी शास्‍त्रज्ञांचे अभिनंदन केले.


No comments:

Post a Comment