Friday, November 24, 2023

वनामकृवि विकसित तुरीचे वाण गोदावरी... बहरलेले शेतकरी बांधवांच्या शेतात


कंडारी येथील बहरलेल्या गोदावरी तुरीच्या प्रक्षेत्रास मा. कुलगुरु मिश्रा यांची भेट.
दिनांक 24 नोव्हेंबर 2023 रोजी माननीय कुलगुरू इंद्र मनी मिश्रा, वनामकृवी परभणी यांनी कृषी संशोधन केंद्र बदनापूर येथील शास्त्रज्ञा समवेत गोदावरी वाणाची लागवड केलेल्या शेतकऱ्याच्या शेतावरती भेट दिली. सध्या कंडारी तालुका बदनापूर येथे दोनशे एकर क्षेत्रावर गोदावरी वाणाची लागवड करण्यात आली आहे अशी माहिती येथील शेतकरी राजेंद्र शिंगारे यांनी दिली. राजेंद्र शिंनगारे यांनी 2020 मध्ये एक किलो गोदावरी वाणाचे बियाणे कृषी संशोधन केंद्र बदनापूर येथून आणले. त्यांनी गेल्या तीन वर्षांमध्ये आपल्याकडील बियाणे इतर शेतकऱ्यांना दिले. दोन वर्षांमध्ये गोदावरी वाणाची 18 क्विंटल पर्यंत प्रति एकरी उत्पादन शेतकऱ्यांना मिळाल्याचे राजेंद्र शिंगारे यांनी माहिती दिली. उत्पादकता पाहता शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरल्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या क्षेत्रावर गोदावरी वाणाची लागवड केली आहे. 
बद्रीनाथ फटाले, कंडारी यांनी 25 मे रोजी गोदावरी वाणाची लागवड केली. केवळ 10: 26:26 नत्र स्फुरद पालाश 100 किलो प्रति एकरी आणि आतापर्यंत केवळ एक कीटकनाशकाची फवारणी केली आहे.
इतक्या कमी लागवड खर्चा वरती एकरी वीस क्विंटल तुरीचे उत्पादन मिळेल अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
कृषी संशोधन केंद्र बदनापूर द्वारे विकसित केलेले वाण बीडीएन २, बीडीएन ७११ आणि नव्याने प्रसारित केलेली गोदावरी केवळ राज्यपातळीवर नव्हे तर देशपातळीवर शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरले आहेत याबद्दल उपस्थित शेतकऱ्यांना माननीय कुलगुरूंनी माहिती दिली. आणि म्हणूनच यांची लागवड महाराष्ट्रातच नव्हे तर गुजरात सारख्या राज्यांमध्ये सुद्धा होत असल्याचे दिसून येत‌ असल्याचे नमूद केले. कमीत कमी लागवड खर्च आणि अधिक उत्पादन याचा विचार करता तुरी सारख्या पिकाला शेतकऱ्यांनी प्राधान्य देणे गरजेचे असल्याचे माननीय कुलगुरू यांनी यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना सल्ला दिला आणि अशाच पद्धतीने नवीन नवीन तंत्रज्ञानाचा प्रसार शेतकऱ्यांमध्ये होण्याची गरज असल्याचे नमूद केले.
यावेळी कृषि संशोधन केंद्राचे, प्रभारी अधिकारी डॉक्टर केटी जाधव, डॉक्टर डी के पाटील, कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता तथा व प्राचार्य, डॉक्टर आर डी अहिरे, कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख,  डॉक्टर सचिन सोमवंशी, डॉक्टर पी ए पगार, डॉक्टर गीते आणि ईतर शास्त्रज्ञ उपस्थित होते.

Sunday, November 19, 2023

प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय परभणी सेवा केंद्रास माननीय कुलगुरू डॉ इन्‍द्र मणि यांची भेट

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे माननीय कुलगुरु डॉ. इन्‍द्र मणि यांनी दिनांक १८ नोव्‍हेंबर रोजी प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय परभणी सेवा केंद्रास भेट दिली यावेळी त्‍यांनी केंद्राच्‍या कृषि व ग्राम विकास विभागाच्‍या सदस्‍या बरोबर चर्चा केली. यावेळी केंद्राच्‍या संचालिका ब्रह्माकुमारी अर्चना बहनजी और ब्रह्माकुमार तांदले भाईजी यासह केंद्राचे इतर सदस्‍य उपस्थित होते.

मार्गदर्शनात कुलगुरू मा डॉ  इन्‍द्र मणि म्‍हणाले की, अहंकार, व्‍देष, स्‍वार्थ हे मानवाच्‍या प्रगतीतील मुख्‍य अडथळे असुन व्‍यक्‍ती कितीही विव्‍दान असला तरी त्‍यांच्‍या मध्‍ये विनय पाहिजे. आज युवकांना मार्गदर्शन करण्‍याची अत्‍यंत गरज असुन प्रजापिता ब्रम्‍हाकुमारी सारख्‍या संस्‍थांनी पुढाकार घ्‍यावा.   


अल्पसंख्यांक मंत्री मा. ना. श्री. अब्दुल सत्तार यांचे धाकटे चि. अमेर सत्तार यांच्‍या विवाह सोहळास कुलगुरू यांची उपस्थिती व शुभेच्‍छा

अल्पसंख्यांक मंत्री मा. ना. श्री. अब्दुल सत्तार यांचे धाकटे चिरंजीव अमेर सत्तार यांचा हा विवाह सोहळा दिनांक १९  नोव्‍हेंबर रोजी शाही उत्‍साहात पार पडत आहे. लग्‍न सोहळयास राज्‍यातील अनेक बडे नेत्‍यांनी हजेरी लावली होती. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माननीय कुलगुरू डॉ इन्‍द्र मणि यांनी लग्‍न सोहळयास उपस्थित राहुन नवदांपत्‍यास शुभेच्‍छा दिल्‍या.