Monday, January 2, 2023

राज्‍यस्‍तरीय सिल्‍लोड कृषी महोत्‍सवातील तांत्रिक सत्रास शेतकरी बांधवाचा प्रतिसाद दिनांक १ जानेवारी

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आणि महाराष्ट्रातील चारही कृषी विद्यापीठांना ५० वर्षे पूर्ण झाली असून या विद्यापीठ विकसित कृषी तंत्रज्ञान शेतक-यांपर्यंत पोहोचविण्‍याच्‍या दृष्‍टीने कृषी विभागाच्‍या पुढाकाराने दिनांक जानेवारी ते जानेवारी दरम्‍यान राज्‍याचे कृषि मंत्री मा ना श्री अब्‍दुल सत्‍तार यांच्‍या संकल्‍पनेतुन सिल्लोड (जि.औरंगाबाद) येथे राज्यस्तरीय सिल्लोड कृषि महोत्सव २०२३ आयोजन करण्‍यात आले असुन या महोत्‍सवाच्‍या उदघाटन मुख्‍यमंत्री मा ना श्री एकनाथ शिंदे यांच्‍या शुभहस्‍ते झाले. सदर महोत्‍सवात तांत्रिक सत्रात राज्‍यातील नामांकीत कृषी तज्ञांचे विविध विषयावर मार्गदर्शन ठेवण्‍यात आले असुन दिनांक १ जानेवारी रोजी तांत्रिक सत्रात राहुरी येथील डॉ. सुनील गोरंंडीवार, वनामकृविचे डॉ. स्मिता सोळंके, डॉ. स्मिता खोडके, डॉ. आनंद गोरे आदींनी मार्गदर्शन केले. व्‍यासपीठावर तांत्रिक सत्राचे अध्‍यक्ष डॉबासाकोकृविचे विस्‍तार शिक्षण संचालक डॉ प्रमोद सावंत, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ देवराव देवसरकर, डॉ किरण जाधव, डॉ सोमवंशी आदींची उपस्थिती होती.

राहुरी येथील डॉ. सुनील गोरंंडीवार यांनी ड्रोन तंत्रज्ञानाबद्दल सविस्तर मार्गदर्शन करतांना म्‍हणाल की, येणा-या काळात ड्रोन तंत्रज्ञानाचा ट्रॅक्टर प्रमाणेच वेगवेगळ्या प्रकारे शेतीमध्ये वापर होणार आहे. पिकांची मॅपिंग आणि पिकांच्या पानांच्या रंगावरून अन्नद्रव्य आणि पाणी व्यवस्थापन करणे, फवारणी तंत्रामध्ये सुद्धा अधिक अधिक आधुनिक बदल होऊन शेतकऱ्यांसाठी ड्रोन तंत्रज्ञान फायदेशीर ठरेल असे ते म्‍हणाले.

वनामकृविचे डॉ. स्मिता सोळंके यांनी कृषी यांत्रिकीकरणाबद्दल माहिती देतांना ट्रॅक्टरचा कमी वापरात एकाच वेळे अनेक कामे करणे शक्‍य असुन एकाच वेळेस फवारणी, पेरणी, स-या पाडणे आदी कामे करण्‍याकरिता यंत्रे विद्यापीठाने विकसित केली असुन बैलशक्तीचा वापराने जालणा-या विविध विद्यापीठ विकसित यंत्रसामग्री बद्दल मार्गदर्शन केले. डॉ. स्मिता खोडके यांनी सोयाबीन आणि ज्वारी पिकांच्या मूल्यवर्धनाबद्दल माहिती दिली. विशेषतः सोया दूध आणि सोया पनीर या मूल्यवर्धनामधून शेतकऱ्यांना अधिक फायदा होऊ शकतो आणि शेतकऱ्यांनी असे उद्योगधंदे उभारणे आवश्यक असल्याचे सांगितले. डॉ. आनंद गोरे यांनी बदलत्या हवामानामध्ये पिकांच्या नियोजनामध्ये दीर्घ आणि अल्पमुदती चे योग्य ते फेरबदल करणे गरजेचे असल्याचे सांगितले.

तांत्रिक सत्रास शेतकरी बांधवांनी मोठा प्रतिसाद दिला.




No comments:

Post a Comment