Thursday, December 29, 2022

Best Oral presentation Award to Dr. B. V. Asewar

Dr. B. V. Asewar Associate Dean, College of Agriculture, Golegaon has been awarded the "Best oral presentation Award" by the Indian Society of Dryland Agriculture (ISDA) ICAR- CRIDA by hands of Dr S. Bhaskar, ADG (A, AF & CC) ICAR and in presence of Dr. V. K. Singh, President, ISDA and Dr. K V Rao in the International Conference on ‘Reimagining Rainfed Agro Ecosystem : Challenges and Opportunities’ held at ICAR-CRIDA Hyderabad. He was presented his paper on ‘Enhancing productivity is to required agriculture through in-situ & ex-situ water harvesting NICRA expertise in Resilience through land and water management and governance.’

बीड येथे आयोजित मराठवाडा कृषि महोत्‍सवाचे उदघाटन


श्री स्‍वामी समर्थ सेवा व  अध्‍यात्मिक विकास मार्ग दिंडोरी प्रणित अखिल भारतीय स्‍वामी समर्थ गुरूपिठ त्रिंबकेश्‍वर वतीने दिनांक २९ डिसेंबर २०२२ ते १ जानेवारी २०२३ दरम्‍यान बीड येथे मराठवाडा कृषी महोत्‍सवाचे आयोजन करण्‍यात आले असुन या कृषी महोत्‍सवाचे उदघाटन परमपुज्‍य गुरूमाऊलींचे परश्रध्‍देय शिष्‍य तथा सुपुत्र माननीय श्री चंद्रकांतदादा मोरे, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू माननीय डॉ इन्‍द्र मणि, खासदार मा श्री ओमराजे निंबाळकर, माजीमंत्री मा ना श्री जयदत्‍त क्षीरसागर, मा श्री अनिलदादा जगताप, मा अॅड शेख शफीक भाऊ, मा श्री बजरंग सोनवणे आदींच्‍या  प्रमुख उपस्थित झाले. 



Tuesday, December 27, 2022

कै. डॉ. पंजाबराव देशमुख यांच्‍या जयंती निमित्‍त वनामकृविच्‍या वतीने विनम्र अभिवादन

भारताचे पहिले कृषीमंत्री कै. डॉ. पंजाबराव देशमुख यांच्‍या जयंती निमित्‍त वनामकृविच्‍या वतीने दिनांक २७ डिसेंबर रोजी विनम्र अभिवादन करण्‍यात आले. यावेळी संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, कुलसचिव डॉ धिरजकुमार कदम आदीसह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Prof. (Dr.) Indra Mani addressed the VCs Convention of IAUA held at Mathura

Prof. (Dr.) Indra Mani, Hon’ble Vice-Chancellor, VNMKV, Parbhani attended the 46th Annual Convention of Vice-Chancellors of Indian Agricultural Universities Association (IAUA) held during December 26th to 27th 2022 organized at U.P. Pandit Deen Dayal Upadhyaya Pashu Chikitsa Vigyan Vishwavidyalay, Mathura (UP). The theme of the convention is ‘National Education Policy 2020 : Implementation in Agricultural Universities’. Prof. (Dr.) Indra Mani addressed the Convention as a panelist.   

In his address Prof. (Dr.) Indra Mani said that the coming year 2023 has been declared the International Millet Year by the UNO and VNMKV, Parbhani has developed many good varieties of sorghum and pearl millet. Parbhani Shakti is the Country’s first biofortified variety of sorghum has been developed by VNMKV in collaboration with ICRISAT, Hyderabad. 'Parbhani Shakti' variety is rich in zinc and iron content; similarly, a biofortified variety of pearl millet was also developed by the university. These varieties have a potential to decrease the malnutrition in women and child. The university is trying to produce quality seeds in large quantities to meet the demand of farmers through PPP. In order to increase the use of millets in human diets, university plans to create public awareness in 2023 through campaign. The university also emphasized on value addition of the millets. 

The Vice-Chancellors of Agricultural /  Horticultural / Animal Science Universities throughout the country attended the convention.

Friday, December 23, 2022

वनामकृविच्‍या डॉ. हनुमान गरुड यांना भारतीय कोरडवाहु शेती संस्‍थेचा उत्‍कृष्‍ट आचार्य प्रबंध पुरस्‍कार

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथील कृषी विद्याशाखेत आचार्य पदवी संपादन केलेले विद्यार्थी तथा खामगाव (ता. गेवराई) येथील कृषी विज्ञान केंद्रातील विषय विशेषज्ञ डॉ. हनुमान सोपानराव गरुड यांना हैद्राबाद येथील भारतीय कोरडवाहु शेती संस्‍थेच्‍या वतीने देण्‍यात येणारा उत्‍कृष्‍ट आचार्य प्रबंध पुरस्‍कार (Best Ph.D. Thesis Award) प्रदान करण्‍यात आला. हैदराबाद येथे दिनांक २२ ते २४ डिसेंबर २०२२ दरम्यान पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये राणी लक्ष्मीबाई केंद्रीय कृषी विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ. पंजाब सिंग यांच्‍या हस्‍ते सदर पुरस्‍कार देण्‍यात आला. यावेळी संस्‍थेच अध्‍यक्ष तथा क्रीडाचे संचालक डॉ. व्ही. के. सिंग, माजी कुलगुरू (पंदेकृवी, अकोला) डॉ. व्ही एम मायंदे, शास्‍त्रज्ञ डॉ. समी रेड्डी, डॉ. के व्ही राव, डॉ. बी व्ही असेवार आदींची प्रमुख उपस्थिती होती. डॉ गरूड यांचा आचार्य पदवीचा शोधप्रबंध “परफॉर्मन्स ऑफ डिफरंट लेंड कॉन्फिग्युरेशन अंडर पिजनपी बेसड इंटरक्रॉपिंग सिस्टीम्स” या विषयावर होता. त्यांचे आचार्य पदवी मार्गदर्शक डॉ. भगवान आसेवार हे होते. पुरस्काराबद्दल कुलगुरू मा. डॉ. इन्‍द्र मणि यांनी अभिनंदन केले.

शेतकरी बापलेकाच्या चेहऱ्यावरील आनंद हा विद्यापीठासाठी प्रेरणादायी …… शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले

मौजे शंकरपुर (ता गंगापुर जि औरंगाबाद) येथे तूर शेतीदिन साजरा

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील औरंगाबाद येथील विभागीय कृषी विस्तार शिक्षण केंद्र आणि गंगापूर तालुका कृषी अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २२ डिसेंबर रोजी मौजे शंकरपूर ता गंगापूर येथील तरुण प्रगतशील शेतकरी अभंग शेवाळे यांच्या शेतात विद्यापीठ विकसित तूर वाण - गोदावरी शेतीदिन संपन्न झाला. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्‍हणुन शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले हे होते तर विभागीय कृषी सहसंचालक डॉ डी एल जाधव, राष्‍ट्रीय कृषि संशोधन प्रकल्‍पाचे प्रमुख डॉ सूर्यकांत पवार, बदनापूर येथील कृषी संशोधन केंद्राचे कडधान्य पैदासकार डॉ दीपक पाटील, हिमायतबाग फळ संशोधन केंद्रोच डॉ एम बी पाटील, संचालक विस्‍तार डॉ तुकाराम मोटे, अधिक्षक कृषि अधिकारी श्री उमेश घाटगे, प्राचार्य डॉ एस डी बटेवाड, डॉ सचिन मोरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

मार्गदर्शनात डॉ धर्मराज गोखले म्हणाले की, मला या चांगल्या संशोधनाचा शेतकरी बांधवांच्या शेतात तूर पीक पाहून आनंद होत आहे विद्यापीठाचे संशोधन कितीही चांगले असले तरी जो पर्यन्त ते शेतकरी बांधवाच्या शेतात बहरणार नाही तो पर्यंत त्याचा उपयोग नाही वसंतराव नाईक  मराठवाडा कृषी विद्यापीठ या भागापासून दूर असले तरी येथील कार्यरत कृषी विद्यापीठाच्या शास्रज्ञाचे आणि कृषी विभागाचे एकत्रित उत्तम कार्य हे शेतकरी बांधवांसाठी नक्कीच बळ निर्माण करणारे आहे मराठवाड्यात औरंगाबाद जिल्ह्याची कृषीविस्तार सेवा ही उल्लेखनीय आहे या संशोधना सोबत मला शेवाळे पितापुत्र यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून अत्यानंद झाला आहे हे शेतकरी पितापुत्र इतर शेतकरी बांधवाना नक्कीच शेती करण्यासाठी आदर्श आहेत.

विभागीय कृषी सहसंचालक डॉ डी एल जाधव म्हणाले की या तूर पिकाचे क्षेत्र पाहून अतिवृष्टीत ही पीक नक्कीच वाचवू शकतो हा संदेश अभंग शेवाळे यांनी दिला आहे सतत नवनवीन प्रयोग आपल्या शेतात प्रभावीपणे राबविण्यात हे माहीर आहेत  कृषी संशोधन केंद्र बदनापूर निर्मित गोदावरी वान हा येत्या काळात नक्कीच विस्तारल्या शिवाय राहणार नाही.

डॉ एम बी पाटील यांनी सद्यस्थितीत मोसंबी पिकाचे आंबेबहर व्यवस्थापन तंत्रज्ञान सांगितले ताण धरण्याचा कालावधी त्यानंतर पाणी नियोजन खत नियोजन केल्यास हे फळ पीक शेतकऱ्यांना समृद्ध केल्याशिवाय राहणार नाही आता मृग बहराची फळे काळी दिसत आहे हे काळेपणा कोळी या किटकामुळे प्रादुर्भाव झाला आहे यासाठी वेळेवर गंधकयुक्त कीटकनाशके फवारले तर याचा बंदोबस्त नक्कीच होतो आंध्रप्रदेश मधील सातगुडी बागा नाहीशा झाल्या आहेत त्यामुळे आपल्या भागातील शेतकऱ्यांना अधिक पैसे मिळविण्याची संधी उपलब्द झाली आहे याचा विचार करून बागेचे व्यवस्थापन उत्तम करत अधिक उत्पादनाची कास धरावी असे आवाहन केले.

डॉ दीपक पाटील म्हणाले की, औरंगाबाद विभागात जवळपास ऐंशी टक्के वाण पांढऱ्या रंगाची तूर शेतकरी बांधव लागवड करतात, याचा विचार करून आणि अधिक उत्पादनक्षम वाण विकासावर बदनापुर कृषी संशोधन केंद्राने भर दिला आहे. भारी जमीन आणि सिंचन व्यवस्था असेल तर शेतकरी बांधवानी गोदावरी या वाणाची लागवड करावी. गेली आठ वर्षांपासून या केंद्राने विकसित केलेला बिडीएन ७११ हा वाण शेतकरी बांधवात मोठा प्रचलित आहे.

डॉ सूर्यकांत पवार म्हणाले की, वारंवार एकच पीक घेणे हे जमीन आणि शेतकरी या दोन ही घटकासाठी फायदेशीर नसते. तूर राज्यातील महत्वाचे आणि खात्रीचे उत्पादन देणारे पीक असुन मागील पाच वर्षापासून कृषी विद्यापीठ व कृषी विभागाच्या वतीने प्रयत्न केला जात आहे. जिल्ह्यात अनेक शेतकरी आता हे तूर उत्पादक शेतकरी म्हणून ओळखल्या जात आहे हेच संशोधनाचे यश आहे.

किटकशास्‍त्रज्ञ डॉ नितीन पतंगे यांनी तूर पिकावर येणारी कीड आणि व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन केले आणि औरंगाबाद येथील राष्‍ट्रीय कृषि संशोधन प्रकल्‍पाच्‍या वतीने निर्मित ट्रायकोकार्ड यांची माहिती दिली. कार्यक्रमात तूर उत्पादक शेतकरी अभंग  शेवाळे यांनी तूर गोदावरी लागवडीपासून आज पर्यंत काय पीक व्यवस्थापन तंत्रज्ञान राबविले याची माहिती दिली. प्रास्तविक विभागीय कृषी विस्तार शिक्षण केंद्राचे रामेश्वर ठोंबरे यांनी केले. सूत्रसंचालन संजीव साठे पाटील यांनी केले तर आभार तालुका कृषी अधिकारी गंगापूर ज्ञानेश्वर तारगे यांनी मानले. कार्यक्रमास शेतकरी बांधव मोठया संख्‍येने उपस्थित होते.


सौजन्‍य - रामेश्वर ठोंबरे, विभागीय कृषी विस्तार शिक्षण केंद्र औरंगाबाद

Wednesday, December 21, 2022

कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि यांचे विद्यापीठ निवृत्‍त प्राध्‍यापक व कर्मचारी यांनी केले अभिनंदन

कृषी आणि जैवप्रणाली अभियांत्रिकी आंतरराष्ट्रीय अकादमी या अग्रगण्‍य वैज्ञानिक संस्‍थेचे फेलो म्‍हणुन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि यांची निवड करण्‍यात आली, याबद्दल विद्यापीठातील निवृत प्राध्‍यापक व कर्मचारी यांच्‍या वतीने सत्‍कार करून अभिनंदन करण्‍यात आले. दिनांक २० डिसेंबर रोजी नागपूर अधिवेशात मंजूर झालेल्या पुरवणी अर्थसंकल्पासाठी मंत्रालयात मंजूरी मिळाली, निवृत्‍ती वेतनाबाबत व पेन्‍शन धारक कर्मचारी यांचे प्रश्‍न सकारात्‍मक प्रतिसाद दिल्‍याबद्दल कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि व विद्यापीठ नियत्रंक श्रीमती दिपाराणी देवतराज यांचे आभार व्‍यक्‍त केले. यावेळी श्री. जे. एल. कातकडे, श्री. पी. एस. चव्हाण, डॉ आर डब्‍लु देशमुख, डॉ अशोक सेलगांवकरआदीसह विद्यापीठाचे निवृत्ती प्राध्‍यापक व कर्मचारी उपस्थित होते.

कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि यांचे कृषीभूषण श्री मधुकरराव घुगे यांनी केले अभिनंदन

कृषी आणि जैवप्रणाली अभियांत्रिकी आंतरराष्ट्रीय अकादमी या अग्रगण्‍य वैज्ञानिक संस्‍थेचे फेलो म्‍हणुन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि यांची निवड करण्‍यात आली, याबद्दल जिंतुर तालुक्‍यातील मौजे केहाळ येथील प्रगतशील शेतकरी कृषीभूषण श्री मधुकरराव घुगे यांनी कुलगुरू मा डॉ इंन्‍द्र मणि यांचा सत्‍कार करून अभिनंदन केले. याप्रसंगी कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्‍ठाता डॉ सय्यद ईस्‍माईल यांची प्रमुख उपस्थिती होती.  

Sunday, December 18, 2022

Inauguration of New Administrative Building of ICAR-ATARI

The new administrative building of ICAR-Agricultural Technology Application Research Institute (ATARI), Pune was inaugurated by Shri Narendra Singh Tomar, Union Minister of Agriculture and Farmer's Welfare virtually on dt 19.12.2023. Shri Kailash Choudhary, Union Minister of State for Agriculture & Farmers Welfare, Dr. Himanshu Pathak, Secretary (DARE) & Director General (ICAR)Dr. U.S. Gautam, Deputy Director General (Agril. Extension), ICAR; P.P. Adrushya Kadsiddheshwar Swami, Chairman, Kaneri Math, Kolhapur; Dr. P.G. Patil, Vice Chancellor, MPKV, Rahuri; Dr. Lakhan Singh, Director, ICAR-ATARI, Dr. Indra Mani, VC, VNMKV, Parbhani, other Vice-Chancellors of SAUs, Senior Officials of ICAR, Directors of ICAR Institutes were present on the occasion.




Saturday, December 10, 2022

VNMAU’s Vice-Chancellor Dr Indra Mani addressed CIGR World Congress held at Japan as Distinguished Guest Speaker

Dr. Indra Mani conferred with prestigious fellowship of iAABE, USA during the Congress

Dr. Indra Mani, Hon’ble Vice-Chancellor of Vasantrao Naik Marathwada Agricultural University (VNMAU), Parbhani addressed XX CIGR World Congress as a Distinguished Guest Speaker specially invited by CIGR International Commission of Agricultural and Biosystems Engineering, where he delivered a lecture on "Sustainable Food-Water-Energy Nexus: India Context."  

The said congress was held at Kyoto, Japan during December 5-9, 2022 on theme 'Sustainable Agricultural Production - Water, Land, Energy and Food', in which researchers, engineers, professors, entrepreneurs and students, experts related to the field of agriculture and bio-systems engineering at the global level participated and presented their research findings. The congress focused on different scientific and technical areas of Agricultural Engineering through various sessions such as land and water, structures and environment, plant production, energy in agriculture, system management, bioprocesses, and information technology etc. Dr. Indra Mani expressed that the findings of the conference will be useful for sustainable agricultural production in the Country, Maharashtra state and Marathwada region.

The outcomes of the said congress are very fruitful, the delegates around the globe discussed about the latest agricultural technologies. During the Congress, Dr. Indra Mani interacted with various international scientists and distinguished professors on collaborative research work which can be taken up in the future to address the issues facing the Indian agriculture sector. 

The research findings regarding digital farming were also discussed in the Congress. The ideas and outcomes coming from the Congress are inputs for strengthening and expediting the activities of digital farming research. The relevant cutting edge and needful techniques developed in Japan can be promoted which are suitable to Indian context. It will strengthen the network of the university with reputed institutes of the world who are working in the sustainable agricultural development. Most of the Japanese scientists and professors are now willing to have a research collaboration with India in agriculture and automation areas. This collaboration will create a possibility to have an internship for our students at Japanese Universities which will help in making skilled human resources for India in advanced farm machinery. On other hand, institutes from Japan will get the students for research from our country, said Dr. Indra Mani. 

The Japan is the one of the leading countries in area of automation, robotics and drone technology in agriculture. Drone technology is the emerging technology in the agricultural field which is useful in insecticide and pesticide spraying, crop monitoring, field measurement etc. These technologies are in infant stage in India. Dr. Indra Mani is a chairman of the national level drone committee of Central government to formulate the guidelines for use of drones in agriculture.

In the said congress, Dr. Indra Mani was conferred with the prestigious fellowship of the International Academy of Agricultural and Biosystem Engineering (iAABE) by President of iAABE Prof. Fedro S.Zazueta. The iAABE is a prominent scientific organization having it headquarter at University of Florida, USA works, aim of the academy is to stimulate the development of science and technology in the field of Agricultural Engineering in the World. Dr. Indra Mani has been elected as a fellow of the iAABE for his outstanding contributions in the field of agricultural engineering as well as overall agricultural development during his working in agricultural institutions in the country.


Tuesday, December 6, 2022

मौजे इंदेवाडी येथे जागतिक मृदा दिन साजरा

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी, कृषी विभाग,महाराष्ट्र शासन रिलायन्स फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मौजे इंदेवाडी येथे जागतिक मृदा दिनाचे आयोजन करण्यात आले होते. त्या कार्यक्रमास मराठवाडा कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञ डॉ.सुदाम शिराळे, मृदा शास्त्रज्ञ, एकात्मिक शेती पद्धती यांनी शेतकऱ्यांना तसेच बचत गटातील महिलांना मृदा दिनाविषयी सविस्तर मार्गदर्शन केले मंडळ कृषी अधिकारी श्री कैलास गायकवाड रिलायन्स फाउंडेशनचे श्री परमार यांनी  मृदा दिनाविषयी तसेच त्यांनी घेत असलेल्या योजना विषयीशेतकऱ्यांना मार्गदर्शन केले त्याप्रसंगी शेतकरी तसेच बचत गटाच्या महिला उपस्थित होते.  या प्रसंगी महिला बचत गटांनी तयार केलेल्या गांडूळ खत प्रोजेक्ट ची पाहणी केली व त्यांना मार्गदर्शन केले.

Friday, December 2, 2022

वनामकृविचे माजी कुलगुरू कै गणेश ठाकुर यांना विद्यापीठाच्‍या वतीने भावपुर्ण श्रध्‍दाजंली

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माजी कुलगुरू कै गणेश पुंडलिकराव ठाकुर यांचे दिनांक १ डिसेंबर रोजी पुणे येथे अल्‍प आजाराने निधन झाले. दिनांक २ डिसेंबर रोजी विद्यापीठाच्‍या वतीने त्‍यांना भावपुर्ण श्रध्‍दाजंली वाहिण्‍यात आली.  कै गणेश ठाकुर हे विद्यापीठाचे २१ ऑक्‍टोबर २०१० ते २४ जानेवारी २०११ दरम्‍यान चौदावे कुलगुरू म्‍हणुन कार्यरत होते.

Friday, November 11, 2022

वनामकृवि विकसित तुरीचे वाण गोदावरी बहरली शेत शिवारात

 

पैठण तालुक्‍यातील मौजे थेरगाव येथील प्रगतशील शेतकरी कैलास निर्मळ हे गेल्या आठ दहा वर्षांपासून तूर पीक शेती करतात मागील आठ वर्षे त्यांनी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्‍या बदनापुर येथील कृषी संशोधन केंद्र निर्मित बिडीएन ७११ या वाणाची लागवड कोरडवाहू शेतीत करत होते. या खरिपात त्यांनी ६ एकर क्षेत्रावर ठिबकद्वारे याच केंद्राचा नवीन मर व वांझ रोग प्रतिबंधक आणि दाण्याचा रंग पांढरा १७० दिवसात तयार होणार बिडीएन ७११ पेक्षाही अधिक  उत्पादन देणारे वाण गोदावरी म्हणजे बिडीएन २०१३-४१ याची लागवड केली आहे. या भागात अतिवृष्टीमुळे खरीप पिकाचे नुकसान झाले, परंतु याही परिस्थितीत हा वान तग धरून राहिला आहे. या शेतकऱ्यांनी दोन ओळीतील अंतर १० फूट आणि दोन रोपांतील अंतर दीड फूट ठेवले आहे हे पीक सध्या फुलाने बहरले आहे. बिडीएन ७११ वाणाची फुले पिवळी तर गोदावरी या तूर वाणाची फुले पांढरी आहे. पैठण तालुका हा औरंगाबाद जिल्ह्यात तूर पीक आवडीने घेणारे शेतकऱ्यांचा तालुका आहे. मागील पाच वर्षांपासून विद्यापीठाच्या तूर वाणाची बियाणे शेतकरी बियाणे विक्री केंद्रातून घेऊन जात आहे, शिवाय शेतकऱ्यांना स्वतः च्या शेतातील बियाणे वापर करत लागवड करा असा संदेश देखील कृषी शास्रज्ञानी दिलेला आहे शिवाय आपआपल्या गावात इतर शेतकऱ्यांना ही बियाणे योग्य ती काळजी घेत देऊ शकतात असे ही सांगण्यात आलेले आहे त्यामुळे या तालुक्यात तूर पीक सध्या चांगलेच बहरले आहे.



सौजन्‍य : श्री रामेश्‍वर ठोंबरे, विभागीय कृषी विस्‍तार शिक्षण केंद्र, औरंगाबाद


Tuesday, November 8, 2022

मानवी समाजाच्‍या उन्‍नतीचा शेतकरी हाच केंद्रबिंदु ........... कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि

वनामकृविच्‍या वतीने संपुर्ण मराठवाडयातील ६० पेक्षा जास्‍त गावात राबविण्‍यात आला  ‘माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी’ उपक्रम

उपक्रमांतर्गत  कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि मौजे मंगरूळ येथील शेतक-यांच्‍या प्रक्षेत्रावर भेट साधला संवाद

शेती विकास आणि शेतकरी कल्‍याण यात शासन, कृषि विभाग, कृषि विद्यापीठ आणि स्‍वत: शेतकरी हे महत्‍वाचे खांब असुन सर्वांनी एकत्रित कार्य केल्‍यास शेतकरी बांधवाची मोठी प्रगती शक्‍य आहे. करोना रोगाच्‍या काळात संपुर्ण जगात कृषि क्षेत्राची ताकद सर्वांनी अनुभवली असुन कृषिक्षेत्रानेच देशाची अर्थव्‍यवस्‍थेस व मानवी जीवनास तारले आहे. मानवी समाजाच्‍या उन्‍नतीचा शेतकरी हाच केंद्रबिंदु आहे, हे सिध्‍द होते, असे प्रतिपादन कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि यांनी केले.

महाराष्‍ट्र शासनाच्‍या सुचनेनुसार वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी च्या वतीने संपूर्ण मराठवाड्यात १ सप्टेंबर ते ३० नोव्हेंबर दरम्यान 'माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी' उपक्रम राबविण्यात येत असुन उपक्रमांतर्गत दिनांक ८ नोव्‍हेंबर रोजी एकाच दिवशी विद्यापीठ शास्‍त्रज्ञ संपुर्ण  मराठवाडयातील ६० पेक्षा जास्‍त गावात जाऊन शेतकरी बांधवाशी संवाद साधला. सदरिल उपक्रमांतर्गत विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि हे मानवत तालुक्‍यातील मौजे मंगरूळ येथे शेतक-यांच्‍या प्रक्षेत्रावर भेट देऊन संवाद साधला. कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक भारतीय किसान संघाचे सरसंघटनमंत्री मा श्री दादा लाड, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ देवराव देवसरकर, कुलसचिव डॉ धीरजकुमार कदम, प्रगतशील शेतकरी श्री अशोक दशमाने, श्री मधुकर जाधव, तालुका कृषि अधिकारी श्री प्रदिप कच्‍छवे, रेशीम शास्‍त्रज्ञ डॉ सी बी लटपटे, डॉ अनंत लाड, श्री गुलाब शिंदे, श्री रघुवीर नाईक आदींची प्रमुख उपस्थिती होती.

मार्गदर्शनात कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि पुढे म्‍हणाले की, पिक उत्‍पादन वाढीत शुध्‍द बियाणे, दर्जेदार कृषि निविष्‍ठा सोबत सुधारित पिक व्‍यवस्‍थापन तंत्रज्ञानाची जोड आवश्‍यक आहे. अनेक शेतकरी स्‍वत: शेतीत नवनवीन प्रयोग करित आहेत. प्रयोगशील शेतकरी मा श्री दादा लाड यांनी विकसित केलेले कापुस लागवड तंत्रज्ञान अनेक शेतकरी स्‍वत: अवलंब करून या तंत्रज्ञानाची उपयुक्‍तता अधोरेखित केली आहे.  

मा श्री दादा लाड यांनी कापुस लागवड तंत्रज्ञानाबाबत माहिती देतांना म्‍हणाले की, कपासातील दोन झाडे आणि दोन ओळीतील आंतर कमी करून झाडांची संख्‍या योग्‍य राखणे आवश्‍यक आहे. झाडाच्या खालच्या गळफांद्या काढल्याने दाटी कमी होते. गळफांद्या काढल्यावर खोड शेंड्यापर्यंत जाड बनते. गळफांद्या काढल्याने बोंडाचा आकार मोठा होण्‍यास मदत होते. एकरी झाडांची संख्या वाढल्याने उत्पादनात वाढ होते असे ते म्‍हणाले.

डॉ देवराव देवसरकर यांनी आपल्‍या भाषणात विद्यापीठ विकसित विविध वाण आणि विद्यापीठ प्रकाशनाबाबत  माहिती दिली. कार्यक्रमाच्‍या प्रास्‍ताविकात श्री प्रदिप कच्‍छवे यांनी केले तर मुख्‍य अतिथीचा परिचय डॉ अनंत लाड यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन तालुका तंत्र सहाय्यक श्री योगेश पवार यांनी केले. यावेळी मान्‍यवरांनी प्रगतशील शेतकरी मधुकर जाधव आणि अशोक दशमाने यांच्‍या श्री दादा लाड कापुस तंत्रज्ञान प्रक्षेत्रास भेट दिली. प्रक्षेत्राच्‍या शिवार पर्यंत माननीय कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि आणि मा श्री दादा लाड यांनी बैलगाडीतुन प्रवास केला. या कार्यक्रमास परिसरातील ८६ गावातील शेतकरी उपस्थित होते.

 दिनांक ८ नोव्‍हेंबर रोजी राबविण्‍यात आलेल्‍या उपक्रमाकरिता विद्यापीठ शास्‍त्रज्ञांची २५ पथके तयार करण्‍यात आली होती, यात १२५ पेक्षा शास्‍त्रज्ञांचा समावेश होता. संपुर्ण दिवसात विद्यापीठ शास्‍त्रज्ञ शेतकरी बांधवाशी संवाद साधुन त्‍यांच्‍या कृषि विषयक समस्‍या जाणुन घेऊन शेतकरी बांधवाच्‍या शेतीस भेट देऊन विविध विषयांवर मार्गदर्शन करण्‍यात आले. सदर उपक्रमांची सुरूवात दिनांक १ सप्‍टेबर रोजी करण्‍यात आली असुन दिनांक १ सप्‍टेंबर रोजी संपूर्ण मराठवाड्यात ८० विद्यापीठ शास्‍त्रज्ञांचा समावेश असलेल्‍या २२ पथकांनी ६० गावांत तर दिनांक ३ ऑक्‍टोबर रोजी ११५ शास्‍त्रज्ञांचा समावेश असलेल्‍या २७ पथकांनी ६४ गावांत भेट देऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. शेतकरी बांधवांच्‍या शेती विषयी तांत्रिक समस्याचे समाधान करण्यात आले. सदरिल उपक्रम कृषि विभागाच्‍या सहकार्यांने राबविण्यात येत आहे.




मौजे कोळ पिंपरी व पांगरी (ता. धारूर, जि. बीड)

"माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी" उपक्रमांतर्गत कृषि महाविद्यालय अंबाजोगाई, विभागीय कृषी विस्तार शिक्षण केंद्र आंबेजोगाई आणि कृषी विभाग ता. धारूर जि. बीड यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ८ नोंव्‍हेबर रोजी मौजे कोळ पिंपरी व पांगरी, ता. धारूर जि. बीड येथे भेट देऊन मौजे कोळ पिंपरी येथील शेतकरी श्री.विजयकुमार मुरलीधर खुळे, श्री.धनवीर चंद्रसेन तांबुरे तसेच मौजे पांगरी येथील श्री.अंकुश लक्ष्मणराव थोरात, दत्तात्रेय रामकृष्ण थोरात यांच्याशी शेतीतील विविध विषयावर चर्चा करून मार्गदर्शन करण्यात आले. सदरील शेतकरी मित्रांना सतत विद्यापीठातील शास्त्रज्ञ, विस्तार कृषि विद्यावेत्ता, कृषी विभागातील कृषी सहाय्यक, विविध विषयातील तज्ञ मंडळींच्या यांच्या संपर्कात राहून शेती विषयक ज्ञान संपादन करीत असतात. सदरील दोन्ही गावे ही कृषी विभागाच्या पोकरा या योजनेअंतर्गत येत असल्याने संबंधित शेतकऱ्यांनी पोकरा योजनेतून तुषार सिंचन तसेच यांत्रिकीकरण याचा लाभ घेतला आहे. शेतीतील विविध अडचणी विषयी बोलताना त्यांनी प्रामुख्याने विद्युत पुरवठा नियमित नसणे तसेच रानडुकरांचा व हरणांचा मोठा उपद्रव होणे या गोष्टीकडे लक्ष वेधले. यावेळी सहयोगी अधिष्‍ठाता डॉ.एस.डी. बंटेवाड, डॉ. व्ही. पी. सूर्यवंशी, विस्तार कृषी विद्यावेत्ता, विभागीय कृषी विस्तार शिक्षण केंद्र आंबेजोगाई, श्री प्रा. सी. बी. अडसूळ, कीटक शास्त्रज्ञ, कृषी महाविद्यालय आंबेजोगाई तसेच श्री. शरद शिंगारे, तालुका कृषी अधिकारी धारूर जिल्हा बीड हे उपस्थित होते.

Monday, November 7, 2022

माननीय फलोत्पादन मंत्री यांची माननीय कुलगुरू यांनी घेतली भेट

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा.डॉ इन्‍द्र मणि यांची फलोत्पादन मंत्री माननीय नामदार श्री संदिपान भुमरे, आमदार मा श्री हरिभाऊ नाना बागडे व जिल्हाधिकारी मा श्री असतीन कुमारपांडे यांची दिनांक ७ नोव्‍हेंबर रोजी भेट घेतली. माननीय कुलगुरू यांनी विद्यापीठातील सद्यस्थिती व पुढील संशोधनाविषयी माननीय मंत्री महोदयांना अवगत केले. फळ संशोधन केंद्र तसेच औरंगाबाद व जालना जिल्ह्यातील इतर संशोधन केंद्र कृषी महाविद्यालय यांनी केलेले संशोधनाबाबत सखोल चर्चा करण्यात आली. फळ संशोधन केंद्र येथील आंब्याचे व चिंचेच्या विविध वाणा व त्याची वैशिष्ट्य याबाबत माहिती केंद्राचे प्रमुख डॉ. एम बी पाटील यांनी दिली तर मोसंबी पिकातील विविध समस्या व त्यावरील उपाय यावर बदनापूर मोसंबी संशोधन केंद्राचे श्री संजय पाटील सोयगावकर यांनी माहिती सादर केली. बदनापूर येथील कृषी संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ डी के पाटील यांनी तुर मूग व हरभरा या पिकांविषयी संशोधित केलेले विविध वाणाबाबत माहिती सादर केली तुरी चे वाण बीडीएन-७११ हे शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय झाले असून भारतात जवळ जवळ ५० टक्के क्षेत्र हे या वाणाखाली आहे. डॉ सूर्यकांत पवार यांनी बाजरा संशोधन केंद्र विषयी झालेले प्रगती या वेळेला सादर केली. सदरील बैठकीस अशी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राकेश अहिरे, कृषी विद्यालयाचे प्राचार्य डॉ. किरण जाधव व इतर शास्त्रज्ञ यावेळी उपस्थित होते.

Saturday, November 5, 2022

आंतर महाविद्यालयीन बुध्दिबळ स्‍पर्धा संपन्‍न

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी अंतर्गत आंतर महाविद्यालयीन बुद्धिबळ स्पर्धा पा‍थ्री येथील डॉ. गंगाधरराव पाथरीकर कृषी महाविद्यालयात पार पडल्या. उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष मित्र साधना शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष माननीय श्री. द्वारकाभाऊ पाथ्रीकर हे होते तर प्रमुख पाहुणे म्‍हणुन विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. एस. एस मोरे हे उपस्थित होते. व्यासपीठावर मित्र साधना शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष श्री राजेंद्रभाऊ पाथ्रीकर, प्राचार्य डॉ. एस. आर नागरगोजे आदींची प्रमुख उपस्थिती होती. मान्‍यवरांच्‍या हस्ते दीपप्रज्वलन व कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

स्पर्धेत शासकीय व अशासकीय अश्या एकुण १४ महाविद्यालयांनी सहभाग नोंदवला होता. त्यातून सर्वोत्तम कामगिरी, प्रथम पारितोषिक एम. जी. एम जैवतंत्रज्ञान महाविद्यालय औरंगाबाद तर द्वितीय पारितोषिक कृषी महाविद्यालय बदनापुर यांनी मिळवले. विजयी संघांना पारितोषिक व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य डॉ. व्ही. पी वावधने यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापिका नरोटे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. वासनिक यांनी केले. पंच समितीत डॉ. राऊत, डॉ. पाटील, डॉ. दडके, डॉ. झाटे, श्री पंडित, श्री राठोड, डॉ वासनिक, वाहेकर समावेश होता. कार्यक्रमास प्राध्यापक व विद्यार्थी मोठया संख्‍येने उपस्थित होते.

Sunday, October 30, 2022

स्‍व. इंदिरा गांधी आणि स्‍व. सरदार वल्लभभाई पटेल यांच्‍या स्‍मृतीस विनम्र अभिवादन

माजी पंतप्रधान भारतरत्‍न स्‍व. इंदिरा गांधी यांची पुण्‍यतिथी आणि प्रथम गृहमंत्री लोहपूरुष स्‍व. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या वतीने दिनांक ३१ ऑक्‍टोबर रोजी विनम्र अभिवादन करण्‍यात आले. यावेळी कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि यांच्‍या हस्‍ते माजी पंतप्रधान भारतरत्‍न स्‍व. इंदिरा गांधी आणि स्‍व. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेस पुष्‍पहार अपर्णन करून विनम्र अभिवादन केले. यावेळी स्‍व. सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती राष्ट्रीय एकता दिवस म्हणून पाळण्यात येतो. या निमित्ताने कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि यांनी उपस्थितांना राष्ट्रीय एकता दिवसाची शपथ दिली. यावेळी शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ देवराव देवसरकर, कुलसचिव डॉ धिरजकुमार कदम, विद्यापीठ नियंत्रक श्रीमती दिपाराणी देवतराज  आदीसह विविध महाविद्यालयाचे प्राचार्य, विभाग प्रमुख, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.