Monday, January 2, 2023

माननीय मुख्‍यमंत्री यांना वनामकृविच्‍या कापुस संशोधन केंद्राच्‍या वतीने भेट दिले नैसर्गिक रंगीत कापसापासुन बनवलेले विशेष जॉकेट

माननीय मुख्यमंत्री महोदयांची वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्‍या प्रत्‍येक दालनास भेट देऊन केली पाहाणी 

सिल्‍लोड (औरंगाबाद) येथे आयोजित राज्‍यस्‍तरीय सिल्‍लोड कृषी महोत्‍सवात सत्‍ताविस दालनाचा समावेश, शेतकरी बांधव व कृषिच्‍या विद्यार्थ्‍यांचा उत्‍स्फुत्‍य प्रतिसाद 

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आणि महाराष्ट्रातील चारही कृषी विद्यापीठांना ५० वर्षे पूर्ण झाली असून या विद्यापीठ विकसित कृषी तंत्रज्ञान शेतक-यांपर्यंत पोहोचविण्‍याच्‍या दृष्‍टीने कृषी विभागाच्‍या पुढाकाराने दिनांक जानेवारी ते जानेवारी दरम्‍यान राज्‍याचे कृषि मंत्री मा ना श्री अब्‍दुल सत्‍तार यांच्‍या संकल्‍पनेतुन सिल्लोड (जि.औरंगाबाद) येथे राज्यस्तरीय सिल्लोड कृषि महोत्सव २०२३ आयोजन करण्‍यात आले असुन या महोत्‍सवाच्‍या उदघाटन दिनांक १ जानेवारी रोजी मुख्‍यमंत्री मा ना श्री एकनाथ शिंदे यांच्‍या शुभहस्‍ते झाले. सदर महोत्‍सवानिमित्‍त आयोजित कृषि प्रदर्शनीत राज्‍यातील चारही कृषि विद्यापीठे आणि खासगी कंपन्‍या यांच्‍या कृषि तंत्रज्ञान आधारीत ५०० पेक्षा जास्‍त दालनाचा समावेश आहे.

यावेळी रेल्‍वे, कोळसा व खाणी मंत्रालयाचे केंद्रीय राज्‍यमंत्री मा ना श्री रावसाहेब पाटील दानवे, केंद्रीय राज्‍यमंत्री (वित्‍त) मा ना डॉ भागवत कराड, राज्‍याचे रोजगार व हमी योजना व फलोत्‍पादन मंत्री तथा औरंगाबाद जिल्‍हयाचे पालकमंत्री मा ना श्री संदीपान भुमरे, कृषी मंत्री मा ना श्री अब्‍दुल सत्‍तार, सहकार, इतर मागास बहुजन कल्‍याण मंत्री मा ना श्री अतुल सावे, लोकसभा सदस्‍य खासदार मा श्री सय्यद इम्तियाज जलील, कृषि आयुक्‍त मा श्री सुनील चव्‍हाण, प्रधान सचिव (कृषी) मा श्री एकनाथ डवले, कुलगुरू (वनामकृवि, परभणी) मा डॉ इन्द्र मणि, कुलगुरू (डॉपंदेकृवि, अकोला) मा डॉ शरद गडाख, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ देवराव देवसरकर, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, कुलसचिव डॉ धिरजकुमार कदम आदींची प्रमुख उपस्थिती होती.   

यावेळी माननीय मुख्‍यमंत्री यांनी कृषी प्रदर्शनीतील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या प्रत्‍येक दालनास भेट देऊन विद्यापीठ विकसित विविध कृषि तंत्रज्ञानाची माहिती घेतली. माननीय मुख्‍यमंत्री यांनी कृषी विद्यापीठ विकसित तंत्रज्ञानाबाबत समाधान व्‍यक्‍त करून सदर संशोधन जास्‍तीत जास्‍त शेतकरी बांधवा पर्यंत पोहचविण्‍याकरिता सर्वांनी प्रयत्‍न करण्‍याचे आवाहन त्‍यांनी केले. याप्रसंगी नांदेड येथील कापुस संशोधन केंद्राच्‍या वतीने माननीय मुख्‍यमंत्री यांना नैसर्गिक रंगीत कापसापासुन बनवलेले विषेश जॉकेट भेट दिली, हे विषेश जॉकेट माननीय मुख्‍यमंत्री यांनी परिधान करून यासारख्‍या शेतमाल मुल्‍यवर्धन तंत्रज्ञानाची गरज असल्‍याचे मत त्‍यांनी व्‍यक्‍त केले. यांनी कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि यांनी नैसर्गिक रंगीत कापसापासुन तयार केलेल्‍या हार घालुन सत्‍कार केला तर कापुस तज्ञ डॉ खिजर बेग यांनी विद्यापीठ विकसित विविध संकरीत व देशी वाणाची माहिती दिली.

१ जानेवारी ते ५ जानेवारी दरम्‍यान आयोजित कृषि प्रदर्शनीत विद्यापीठाचे विविध तंत्रज्ञानावर आधारीत एकुण सत्‍तावीस दालनाचा समावेश असुन राज्‍यातील शेतकरी बांधव व कृषिचे विद्यार्थी, कृषि विस्‍तारक मोठया प्रमाणात भेट देत आहेत.


















No comments:

Post a Comment