वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील
ज्वार संशोधन केंद्राच्या वतीने दिनांक २६ जानेवारी रोजी मौजे पिंगळी येथील शेतकरी
श्री रामकिशन पवार यांच्या रब्बी ज्वारीच्या आद्यरेषिय पीक प्रात्यक्षिकांतर्गत
विद्यापीठ विकसित परभणी सुपरमोती या नवीन वाणाच्या प्रक्षेत्रास संशोधन संचालक डॉ
दत्तप्रसाद वासकर व प्रभारी अधिकारी डॉ एल एन जावळे यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी डॉ. दत्तप्रसाद वासकर यांनी उपस्थित शेतक-यांना मार्गदर्शन करतांना म्हणाले की, सन २०२३ हे वर्ष संपुर्ण जगात आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य
वर्ष म्हणुन साजरे करण्यात येत आहे. भारतीय खाद्य
संस्कृतीत भरड धान्यास महत्व आहे परंतु काळाच्या ओघात आपण पाश्चिमात्य खाद्याचा
आभारात समावेश करत आहोत. ज्वारी पिकामुळे मानवास खाण्यास पौष्टिक ज्वारी मिळते तर जनावरांना कडबा मिळतो. हीच जनावरे आपणास शेणखत देतात, याचा उपयोग आपणास जमिन सुपिकतेसाठी होतो. डॉ. एल. एन. जावळे यांनी रब्बी
ज्वारीचे सुधारित वाण व पारंपारिक दगडी वाणामधील फरक सांगितला व इतर शेतक-यांनी
पुढील हंगामामध्ये दगडी वाण घेण्याऐवजी सुधारित वाणांची पेरणी करावी असे आवाहन
केले. भेटी दरम्यान गावातील शेतकरी बांधव
उपस्थित होते.
Friday, January 27, 2023
मौजे पिंगळी येथील ज्वारीच्या आद्यरेषिय पीक प्रात्यक्षिकांची पाहणी
Thursday, January 26, 2023
वनामकृवि विकसित सुर्यफुल वाण एलएसएफएच-१७१
औरंगाबाद जिल्हयातील मौजे नेधोना येथील शेतकरी बाबासाहेब गाडेकर यांच्या शेतात वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठत विकसित सुर्यफुल वाण एलएसएफएच-१७१ चांगलाच बहरला असुन सदर पिक हे औरंगाबाद कृषि विज्ञान केंद्राच्या वतीने घेण्यात आलेल्या आद्यरेषीय प्रात्यक्षिकाचे आहे. दिनांंक २५ जानेवारी रोजी डॉ के के झाडे व डॉ बी एल पिसुरे यांनी भेट दिली. सदर प्रक्षेत्र हे समुह आद्यरेषीय प्रात्यक्षिकांतर्गत मौजे नेधोना येथील निवडक २५ शेतकरी बांधवाच्या शेतात घेण्यात आलेल्या प्रात्यक्षिकांचा भाग आहे. सद्यस्थितीत सदर पिक पक्व अवस्थेत आहे. याच प्रकारे फुलंब्री तालुक्यातील वाव्हाना येथील २५ निवडक शेतकरी बांधवाना परभणी विद्यापीठ विकसित जवसाचे एलएसए-९३ वाणाचे समुह आद्यरेषी प्रात्यक्षिके दिलेली असुन यांना डॉ के के झाडे, डॉ बी एल पिसुरे यांच्या सह विद्यापीठ तज्ञ वेळोवेळी मार्गदर्शन करतात.
Tuesday, January 24, 2023
कृषि विज्ञान केंद्र, खामगाव येथे ड्रोनचे प्रशिक्षण व प्रात्यक्षिक संपन्न
शेती करत असताना सध्याच्या वातावरणातील बदलामुळे पिकावर कीड व रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होताना दिसून येत आहे. कीड व रोगाचे व्यवस्थापनाकरिता शक्यतो शेतकरी पाठीवरील वापरणाऱ्या नॅप सॅक स्प्रेयर, एचटीपी पंप ई. चा वापर जास्तीत जास्त प्रमाणात करतात आणि हे करत असताना फवारणी करणारे शेतकरी किंवा शेतमजूर पहावी तेवढी स्वतःच्या शरीराची काळजी घेताना दिसत नाही. जसे त्यांना सांगण्यात आलेले आहे की कुठल्याही प्रकारची फवारणी करत असताना फवारणीचा गणवेश व तोंडावर मास्क, डोळ्यावर चष्मा इत्यादी चा वापर करणे आवश्यक असते तरीसुद्धा बहुतांश शेतकरी हे या बाबींकडे विशेष लक्ष देतांना दिसत नाही व बऱ्याच ठिकाणी जीवितहानीच्या घटना घडत असतात. त्यावर उपाय म्हणून शेतीसाठी ड्रोनचा वापर सध्याच्या काळात उपयुक्त ठरणार आहे. याच्या वापरामुळे मजुरांची, वेळेची, पैशाची बचत तर होतेच सोबतच ड्रोन द्वारे फवारणी केल्यामुळे ड्रोन वापरणाऱ्या किंवा शेतातील शेतकऱ्यांना याच्या वापरामुळे किंवा त्यातील असलेल्या फवारणीच्या औषधामुळे विपरीत परिणाम घडून येत नाही. शेतीतील ड्रोन वापरा विषयी जागृती व प्रसार करण्याकरिता वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र, खामगाव येथे कृषि अभियांत्रिकी विभागामार्फत "शेतीसाठी ड्रोनचा वापर" या विषयावर एक दिवसीय प्रशिक्षण व प्रात्यक्षिक कार्यक्रम दिनांक २४.०१. २०२३ रोजी घेण्यात आला.
या एक दिवशी
कार्यक्रमाकरिता गरुडा एरोस्पेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, चेन्नई यांच्या कडून ड्रोन व पायलट यांची उपलब्धता
करून देण्यात आली. सदरील कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून प्रा. दिप्ती पाटगावकर,
कार्यक्रम समन्वयक, कृषि विज्ञान केंद्र,
खामगाव, प्रमुख पाहुणे श्री. जेजुरकर, जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी, बीड, प्रमुख उपस्थिती मध्ये श्री. वडकुते, तालुका कृषि अधिकारी, गेवराई, श्री.
डींगरे, सरपंच, खामगाव, श्री. शिंदे, सरपंच, नागझरी हे
लाभले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस मान्यवरांच्या हस्ते भारताचे पहिले कृषि मंत्री
स्व. वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून तसेच दिप प्रज्वलन करून
कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. या प्रशिक्षण व प्रात्यक्षिक कार्यक्रमांमध्ये
ड्रोन विषयी विस्तृत अशी माहिती सोबतच त्याच्या वापराचे निकष यांच्या विषयी
महत्वपूर्ण मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस केंद्रातील डॉ.
तुकेश सुरपाम, विषय विशेषज्ञ, कृषी
अभियांत्रिकी विभाग यांनी ड्रोन विषयी तांत्रिक माहिती व त्याच्या वापरा बद्दल
सविस्तर असे मार्गदर्शन उपस्थित शेतकऱ्यांना दिले. तालुका कृषी अधिकारी श्री.
वडकुते यांनी ड्रोनचा वापर भविष्यात जास्तीत जास्त क्षेत्रावर होणे गरजेचे आहे असे
आपल्या मार्गदर्शनात सांगितले. पुढील मार्गदर्शनात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी
श्री. जेजुरकर यांनी ड्रोन हे शेतीसाठी कसे फायदेशीर ठरणार आहेत व भविष्यात याच्या
अनुदानाबद्दल कृषी विभाग जास्तीत जास्त प्रसार व प्रचार करणार असे प्रतिपादन केले.
अध्यक्षनीय भाषणात कार्यक्रम समन्वयक प्रा. दिप्ती पाटगावकर यांनी ड्रोनचे शेतीतील
वापर व त्यामुळे होणारे भविष्यातील फायदे याविषयी मार्गदर्शन केले. त्यानंतर
केंद्राच्या प्रक्षेत्रावर असलेल्या हरभरा पिकामध्ये ड्रोन चे प्रात्यक्षिक
देण्यात आले. प्रात्यक्षिक देतांना डॉ. सूरपाम यांनी उपलब्ध असलेल्या ड्रोन चे
प्रकार, मॅनुअल व ऑटोमॅटिक सिस्टम, वापरण्याची
पद्धत, ड्रोन वापरासाठी लागणारे प्रमाणपत्र, केंद्राकडून मिळणारे अनुदान व इतर मत्वाची माहिती उपस्थित शेतकरी, कृषि विभागातील अधिकारी व कर्मचारी यांना दिली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी
कृषि विज्ञान केंद्र व कृषि विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
Tuesday, January 17, 2023
MoU singed between SAC-ISRO, Ahmedabad and VNMKV, Parbhani
The MoU helpful for providing accurate agromet advisory at block & district level
तुळजापुर कृषी विज्ञान केंद्रात शेळीपालन प्रशिक्षण कार्यक्रम
कृषी विज्ञान केंद्र म्हणजे शेतीतील विज्ञान ........ विकास गोफणे
कृषी
विज्ञान केंद्र म्हणजे शेतीतील विज्ञान होय, तुळजापूर
कृषी विज्ञान केंद्रामुळे उस्मानाबाद जिल्ह्यातील ग्रामीण महिलांचे उत्पन्नात वाढ होत
आहे, असे प्रतिपादन संपदा ट्रस्टचे श्री विकास गोफने यांनी केले.
तुळजापूर कृषी विज्ञान केंद्र आणि उमेद तुळजापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आर्या
प्रकल्पांतर्गत दिनांक १७ जानेवारी ते २१ जानेवारी दरम्यान आयोजित पाचदिवसीय शेळीपालन या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटन
प्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर कृषी
विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक श्री लालासाहेब देशमुख, उमेदचे
तालुका व्यवस्थापक श्री विनायक पवार,
प्रशिक्षण समन्वयक डॉ. विजयकुमार जाधव, शास्त्रज्ञ
डॉ. दर्शना भुजबळ, डॉ. नकुल हरवाडीकर, सखाराम
मस्के, शिवराज रुपनर,
उमेदचे श्री युवराज शिंदे आदी उपस्थित होते.
मार्गदर्शनात श्री गोफणे म्हणाले की, कृषी विज्ञान केंद्राने जिल्ह्यात अनेक कृषि उद्योजक घडविले असून तांत्रिक ज्ञानासाठी आम्ही नेहमीच कृषी विज्ञान केंद्राकडे येतो. उमेदचे तालुका व्यवस्थापक श्री. विनायक पवार म्हणाले की, कृषी विज्ञान केंद्राच्या प्रशिक्षणांमध्ये आम्ही नेहमीच उमेदच्या विविध स्तरावरील महिलांचा समावेश करून त्यांच्या ज्ञानामध्ये जास्तीची भर घालतो. विविध प्रशिक्षणातील ज्ञानामुळे गाव पातळीवरील पशु सखी या शेळ्यांना प्राथमिक उपचार गावातच करत असून जनावरांच्या विविध लसीकरणाचा प्रसार देखील करत आहेत. कार्यक्रम समन्वयक श्री लालासाहेब देशमुख म्हणाले की, शेळीपालन प्रशिक्षणांत महिलांनी शेळीपालनाच्या तांत्रिक बाजू समजावून घेऊन त्यांचा वापर आपल्या दैनंदिन शेळीपालनात करून उत्पन्न वाढवावे. जिल्ह्यातील महिलांसाठी कृषी विज्ञान केंद्राचे दरवाजे सदैव उघडे आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. विजयकुमार जाधव यांनी केले तर आभार श्री सखाराम मस्के यांनी मानले.
Tuesday, January 10, 2023
बुरहापुर मध्य प्रदेश येथील केले के पौधों के रोग का प्रकोप का किए सर्वेक्षण
नेशनल सर्टिफिकेशन सिस्टम फॉर टिश्यू कल्चर रेज़ड प्लांट्स, जैव प्रौद्योगिकी विभाग, नई दिल्ली द्वारा गठित एक समिति ने हाल ही में मध्य प्रदेश के बुरहापुर जिले के इछापुर, दपोरा, चपोरा, आडगांव आदि गांवों का सर्वेक्षण किया है। इस यात्रा का उद्देश्य हाल ही में 'बुरहापुर क्षेत्र में केले के पौधों में सीएमवी के प्रकोप' के बारे में जानकारी प्राप्त करना और भविष्य में इस तरह की घटनाओं को रोकने के उपाय सुझाना था। इस समिति के वैज्ञानिकों को प्लांट-वायरस इंटरेक्शन, एंटोमोलॉजी, प्लांट टिशू कल्चर, प्लांट मॉलिक्यूलर बायोलॉजी और केले में अनुसंधान का अनुभव है । नई दिल्ली से समिति के सदस्यों में प्रो. इंद्रनील दासगुप्ता, डॉ. आशुतोष पांडे, डॉ. अमलेंदु घोष, डॉ. सुधाकर श्रीवास्तव और परभणी से डॉ. ए टी दौंडे, डॉ. पी. एस. नेहरकर और डॉ. जी पी जगताप, शामिल थे। कई किसानों से बातचीत के दौरान आवश्यक जानकारियां जुटाई गईं और पौधों से नमूने लिए गए। एक विस्तृत रिपोर्ट जल्द ही भारत सरकार के जैव प्रौद्योगिकी विभाग को सौंपी जाएगी।
श्री आर एन
एस तोमर, उप निदेशक, उद्यानिकी विभाग, बुरहानपुर ने स्थल भ्रमण का समन्वय किया और सभी
स्थानों पर समिति के साथ रहे। समिति ने बुरहानपुर जिलाधिकारी महोदया श्रीमती भाव्या
मित्तल के साथ भी औपचारिक मुलाकात की और सीएमवी के प्रकोप से संबंधित कई मुद्दों पर
चर्चा की। इस तरह की घटनाओं को कैसे रोका जाए, इस बारे में उनके सवाल के जवाब में,
डॉ. आशुतोष पांडे ने एक बहु-आयामी दृष्टिकोण का सुझाव दिया- (i) वायरस के प्रसार को
रोकने के लिए फसलों का चक्रीकरण (ii) यदि पौधे NCS-TCP मान्यता प्राप्त टिशू कल्चर
कंपनियों से खरीदे जाते हैं तो किसानों को सर्टिफिकेशन लेबल की मांग करनी चाहिए जो
NCS-TCP द्वारा QR कोड सहित वायरस मुक्त पौधों के लिए जारी किया जाता है (iii) जैसे ही संक्रमण दिखाई दे, किसानों को पौधों
को खेत से कुछ दूरी पर गाड़ देना चाहिए। किसानों में जागरुकता बढ़ाने की जरूरत पर जोर
दिया गया।
Thursday, January 5, 2023
इस्त्राईल दुतावासातील श्री याईर एशेल यांची सिल्लोड कृषी महोत्सवातील वनामकृविच्या दालनास भेट
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आणि महाराष्ट्रातील चारही कृषी विद्यापीठांना ५० वर्षे पूर्ण झाली असून या विद्यापीठ विकसित कृषी तंत्रज्ञान शेतक-यांपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने कृषी विभागाच्या पुढाकाराने दिनांक १ जानेवारी ते ५ जानेवारी दरम्यान राज्याचे कृषि मंत्री मा ना श्री अब्दुल सत्तार यांच्या संकल्पनेतुन सिल्लोड (जि.औरंगाबाद) येथे राज्यस्तरीय सिल्लोड कृषि महोत्सव – २०२३ आयोजन करण्यात आले असुन या महोत्सवाच्या उदघाटन मुख्यमंत्री मा ना श्री एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते झाले.
कृषि महोत्सवानिमित्त आयोजित कृषि प्रदर्शनीत कृषि विभाग, कृषि विद्यापीठे यांच्यासह शासनाचे विविध विभाग, कृषि निगडीत विविध खासगी कंपन्या यांची दालने असुन दिनांक ५ जानेवारी रोजी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या दालनास इस्त्राईल दुतावासातील कृषि विभागाचे अधिकारी श्री याईर एशेल यांनी भेट दिली. यावेळी विस्तार शिक्षण संचालक डॉ देवराव देवसरकर यांनी त्यांनी विद्यापीठाच्या संशोधनाची माहिती दिली.
माहिती देतांना डॉ देवराव देवसरकर म्हणाले की, मराठवाडा विभागातील बदलत्या हवामानात मागील काही वर्षात पडणारे पर्जन्यमान, तापमान यावर आधारित विद्यापीठ कृषी तंत्रज्ञान निर्माण करण्याचा प्रयत्न करत असुन या परिस्थितीत शेतकऱ्याच्या शेतात शाश्वत उत्पादन येण्यासाठी तंत्रज्ञान शेतकऱ्यांना पोहचविण्यासाठी विद्यापीठ प्रयत्नशील आहे. चालू वर्ष हे आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष असल्याने या भागातील शेतकरी यात सामील असणाऱ्या काही खास पिके जसे ज्वारी, बाजरी या पिकाच्या क्षेत्रात वाढ व्हावी म्हणून आम्ही शेतकऱ्याना या पिकाचे महत्व अधोरेखित करत आहोत.
सहयोगी संचालक संशोधन डॉ सूर्यकांत पवार यांनी राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प निर्मिती बाजरा एएचबी-१२०० वाणाची पीक नमुने आणि मानवी आहारात या वाणाचे महत्व सांगुन पाहुण्यांना या वाणाची कणसे नमुने दाखविले. तसेच कृषी संशोधन केंद्र बदनापूर येथून नव्याने विकसित झालेला तूर वाण गोदावरी याविषयी माहिती डॉ दीपक पाटील यांनी दिली. फळ संशोधन केंद्रचे प्रभारी अधिकारी डॉ एम बी पाटील, कृषीतंत्र विद्यालयाचे प्राचार्य डॉ किरण जाधव, मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ पी आर देशमुख कृषी विज्ञान केंद्राचे मुख्य शास्त्रज्ञ डॉ किशोर झाडे पैठण आदीसह कृषी शास्रज्ञ उपस्थित होते.
वनामकृविचे निवृत्त कृषि किटकशास्त्रज्ञ डॉ. बब्रुवाण भानुदास गायकवाड यांच्या नावे सुवर्ण पदक
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या कृषि किटकशास्त्र विभागातील निवृत्त प्राध्यापक डॉ बब्रुवाण भानुदास गायकवाड यांच्या वतीने कृषी किटकशास्त्र विभागातील पदव्युत्तर आणि आचार्य पदवी अभ्यासक्रमात पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांकरिता सुवर्ण पदकाकरिता रूपये ७.५ लाख रूपय निधीचा धनादेश दिनांक ४ जानेवारी कुलगुरू मा डॉ इन्द्र मणि यांना सपुर्त करण्यात आला. यावेळी सुविद्य पत्नी सौ. सुनिताताई गायकवाड, कुलसचिव डॉ धिरजकुमार कदम, विद्यापीठ नियंत्रक श्रीमती दिपाराणी देवतराज, डॉ पी एस बोरीकर, डॉ डि डब्लु वडनेरकर, डॉ एम बी भोसले, डॉ डि आर मुंढे, मुलगा कोल्हापुर येथील शिवाजी विद्यापीठातील वनस्पतीशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ निखिल गायकवाड, त्यांच्या सुन सौ वर्षा गायकवाड, नात स्नेहल आणि नातु साहिल आदी उपस्थित होते.
याप्रसंगी कुलगुरू मा डॉ इन्द्र
मणि यांनी डॉ गायकवाड यांच्या नावे सुवर्णपदकामुळे किटकशास्त्र विभागातील पदव्युत्तर
विद्यार्थ्यांना संशोधनात चांगले कार्य करण्यास चालना मिळणार असल्याचे
प्रतिपादन केले.
निवृत्त डॉ बी बी गायकवाड यांनी यावर्षी वयाची ७५ वर्ष पुर्ण केले असुन ते परभणी कृषि विद्यापीठाचे माजी विद्यार्थी आहे. त्यांनी परभणी कृषि विद्यापीठात १९७५ ते १९९४ दरम्यान तसेच राहुरी विद्यापीठात १९९४ ते २००५ दरम्यान कृषि शिक्षण, संशोधन आणि विस्तार शिक्षण क्षेत्रात भरिव असे योगदान दिले. ते राहुरी येथुन सेवानिवृत्त झाले.
Wednesday, January 4, 2023
बैलचलित कृषि अवजारे दालन शेतकरी बांधवाच्या आकषर्णाचे दालन ठरले
सिल्लोड (औरंगाबाद) येथे आयोजित राज्यस्तरीय सिल्लोड कृषी महोत्सवातील कृषि प्रदर्शनीतील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील पशुशक्तीचा योग्य वापर योजनेच्या बैलचलित कृषि अवजारे दालन शेतकरी बांधवाच्या आकषर्णाचे दालन ठरले.
राज्याचे सहकारी महसुल मंत्री यांची कृषी विद्यापीठाच्या दालनास भेट
राज्याचे सहकारी महसुल मंत्री मा ना श्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिनांक ४ जानेवारी रोजी राज्यस्तरीय सिल्लोड कृषी महोत्सवालातील कृषी विद्यापीठाच्या दालनास भेट दिली.
Tuesday, January 3, 2023
यशस्विनी शेतकरी उत्पादक कंपनीच्या संचालक मंडळासोबत चर्चा
सिल्लोड येथे कृषि प्रदर्शन महोत्सवाप्रसंगी यशस्विनी शेतकरी उत्पादक कंपनीच्या संचालक मंडळासोबत कृषिमंत्री मा ना श्री. अब्दुल सत्तार साहेब व महसूल मंत्री मा ना श्री. राधाकृष्ण विखे पाटील (पालकमंत्री सोलापूर) यांना कंपनीच्या कार्याविषयी माहिती देतांना. सोबत श्री. पी. एस.सुतार कृषि तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक आत्मा सोलापूर.
सिल्लोड (औरंगाबाद) येथे आयोजित राज्यस्तरीय सिल्लोड कृषी महोत्सवातील तांत्रिक सत्रास शेतकरी बांधवाचा प्रतिसाद (दिनांक ४ जानेवारी)
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आणि महाराष्ट्रातील चारही कृषी विद्यापीठांना ५० वर्षे पूर्ण झाली असून या विद्यापीठ विकसित कृषी तंत्रज्ञान शेतक-यांपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने कृषी विभागाच्या पुढाकाराने दिनांक १ जानेवारी ते ५ जानेवारी दरम्यान राज्याचे कृषि मंत्री मा ना श्री अब्दुल सत्तार यांच्या संकल्पनेतुन सिल्लोड (जि.औरंगाबाद) येथे राज्यस्तरीय सिल्लोड कृषि महोत्सव – २०२३ आयोजन करण्यात आले असुन या महोत्सवाच्या उदघाटन मुख्यमंत्री मा ना श्री एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते झाले. सदर महोत्सवात तांत्रिक सत्रात राज्यातील नामांकीत कृषी तज्ञांचे विविध विषयावर मार्गदर्शन ठेवण्यात आले असुन दिनांक ४ जानेवारी रोजी तांत्रिक सत्रात डॉ सचिन मोरे यांनी भारतीय शेतमालाची निर्यात एक दृष्टिक्षेप या विषयावरती मार्गदर्शन केले. सध्या भारतातील शेतमालाच्या निर्यातीचा वाटा पाहता विशेषतः प्रक्रियायुक्त शेतमालाची निर्यातीसाठी भारताला संधी असल्याचे त्यांनी नमूद केले. प्रा. सचिन बांदगुडे, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांनी पांडू क्षेत्र व्यवस्थापना विषयी माहिती दिली. शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतावरतीच मूलभूत बाबी लक्षात घेऊन माती आणि पाण्याचे संधारण केल्यास सूक्ष्म पाणलोट व्यवस्थापनातून अधिक फायदा होऊ शकेल अशी उदाहरणासह माहिती दिली. डॉ. जयंत देशमुख यांनी एकात्मिक शेती पद्धती वर मार्गदर्शन करताना जिरायत भागासाठी शेळीपालन आणि कोरडवाहू फळ पिकांचा समावेश केल्यास प्रचलित पीक पद्धती फायदेशीर होऊ शकते असे सांगितले. तसेच बागायती भागामध्ये पीक पद्धती बरोबरच दुग्धव्यवसाय आणि फळबाग लागवड फायदेशीर ठरू शकते असे त्यांनी सांगितले. डॉ. संजय पाटील यांनी मोसंबी लागवड तंत्रज्ञान याविषयी माहिती दिली. रोपांची योग्य निवड आणि जमिनीची योग्य निवड अत्यंत महत्त्वाची असून सुरुवातीच्या काळातील खत व्यवस्थापन आणि पाणी व्यवस्थापन चांगले ठेवल्यास एक उत्तम भाग तयार होऊ शकते असे त्यांनी सांगितले. सकाळच्या सत्रात अध्यक्ष म्हणून कृषी परिषदेचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. शिर्के आणि संशोधन संचालक डॉ. हरिहर कौसडीकर यांनी तर सहअध्यक्ष म्हणून डॉ. आर जी भाग्यवंत आणि डॉ. पी आर देशमुख यांनी कामकाज पाहिले.
दुपारच्या
सत्रात महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी चे
शास्त्रज्ञ डॉ. विक्रम कड यांनी शेतमाल बाजारात जाण्यापूर्वी तो रेडी टू
युज या स्वरूपात दिल्यास त्यास भाव चांगला मिळू शकतो हे त्यांनी उदाहरणासह
सांगितले. फळांच्या साठवणुकीसाठी शीत ग्रहांचा आणि शीत वाहतूक पद्धतीचा वापर
महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले. डॉ. एस. आर. पाटील यांनी कोरडवाहू
क्षेत्रासाठी सिताफळ, जांभूळ, कवट यासारख्या फळांची निवड करून त्यांची योग्य निगा
राखल्यास, ही फळ पिके कोरडवाहू क्षेत्रासाठी सुद्धा फायदेशीर ठरू
शकतात असे सांगितले. डॉ. एम बी पाटील यांनी आंबा लागवड तंत्रज्ञान या विषयावर
सविस्तर मार्गदर्शन केले. मोहराचे आणि सुरुवातीच्या काळातील आंब्याचे व्यवस्थापन
अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले. आंबा पिकातील आंबा उत्पादन दरवर्षी
घेण्यासाठी खत व्यवस्थापन आणि योग्य आंब्याची संख्या महत्त्वाचे असल्याचे त्यांनी
नमूद केले. डॉ. व्ही. एस. काळे यांनी हळद लागवड तंत्रज्ञान या विषयावर प्रकाश
टाकला. हळद उत्पादनात जमिनीची निवड आणि वानांची निवड करून सेंद्रिय खतांचा वापर
केल्यास चांगले उत्पादन मिळू शकते असे सांगितले. दुपारच्या सत्राचे अध्यक्ष
म्हणून डॉ. डी एन गोखले आणि डॉ. आर डी अहिरे यांनी काम पाहिले. तर सहअध्यक्ष
म्हणून डॉ. के टी जाधव आणि डॉ. पी आर झंवर यांनी काम पाहिले.
राज्यस्तरीय सिल्लोड कृषी महोत्सवात वनामकृविचा सक्रीय सहभागाबाबत कृषिमंत्री मा ना श्री अब्दुल सत्तार यांनी केले अभिनंदन
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आणि महाराष्ट्रातील चारही कृषी विद्यापीठांना ५० वर्षे पूर्ण झाली असून या विद्यापीठ विकसित कृषी तंत्रज्ञान शेतक-यांपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने कृषी विभागाच्या पुढाकाराने दिनांक १ जानेवारी ते ५ जानेवारी दरम्यान राज्याचे कृषि मंत्री मा ना श्री अब्दुल सत्तार यांच्या संकल्पनेतुन सिल्लोड (जि.औरंगाबाद) येथे राज्यस्तरीय सिल्लोड कृषि महोत्सव – २०२३ आयोजन करण्यात आले असुन या महोत्सवाच्या उदघाटन मुख्यमंत्री मा ना श्री एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते झाले. कृषि महोत्सवानिमित्त आयोजित कृषि प्रदर्शनीत कृषि विभाग, कृषि विद्यापीठे यांच्यासह शासनाचे विविध विभाग, कृषि निगडीत विविध खासगी कंपन्या यांची दालने असुन बाजारपेठांचं नवीन तंत्रज्ञान, ड्रोन तंत्रज्ञान याची माहिती दिली जात आहे. याशिवाय कृषी विज्ञान केंद्र, महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ, महाबीज, महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ, राष्ट्रीय फलोत्पादन अभियान अशा योजनांची माहिती दालने, कृषी निविष्ठा, तंत्रज्ञान, सिंचन साधने, शेतीविषयक अवजारे, मशिनरी, नवनवीन यांत्रिकीकरण, ऑटोमेटेड फार्मिंग, शेतीपूरक लघुउद्योगांसाठी विशेष दालन, शेतकरी गटांनी तयार केलेली उत्पादने आदींसह महोत्सवात एकूण सहाशे दालनाचा समावेश आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाची यात विविध विभागाची व संशोधन केंद्राची ३० दालनाचा समावेश होता, यास शेतकरी बांधवांनी मोठा प्रतिसाद दिला. विद्यापीठ शास्त्रज्ञांनीही शेतकरी बांधवाच्या विविध प्रश्नांची उत्तरे देऊन समाधान केले. विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांच्या सक्रीय सहभागाबाबत राज्याचे माननीय कृषीमंत्री मा ना श्री अब्दुल सत्तार यांनी कुलगुरू मा डॉ इन्द्र मणि आणि सर्व सहभागी शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले.