कृषी आणि जैवप्रणाली अभियांत्रिकी आंतरराष्ट्रीय अकादमी या अग्रगण्य वैज्ञानिक संस्थेचे फेलो म्हणुन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ इन्द्र मणि यांची निवड करण्यात आली, याबद्दल विद्यापीठातील निवृत प्राध्यापक व कर्मचारी यांच्या वतीने सत्कार करून अभिनंदन करण्यात आले. दिनांक २० डिसेंबर रोजी नागपूर अधिवेशात मंजूर झालेल्या पुरवणी अर्थसंकल्पासाठी मंत्रालयात मंजूरी मिळाली, निवृत्ती वेतनाबाबत व पेन्शन धारक कर्मचारी यांचे प्रश्न सकारात्मक प्रतिसाद दिल्याबद्दल कुलगुरू मा डॉ इन्द्र मणि व विद्यापीठ नियत्रंक श्रीमती दिपाराणी देवतराज यांचे आभार व्यक्त केले. यावेळी श्री. जे. एल. कातकडे, श्री. पी. एस. चव्हाण, डॉ आर डब्लु देशमुख, डॉ अशोक सेलगांवकरआदीसह विद्यापीठाचे निवृत्ती प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment