वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी, कृषी विभाग,महाराष्ट्र शासन
रिलायन्स फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मौजे इंदेवाडी येथे जागतिक मृदा
दिनाचे आयोजन करण्यात आले होते. त्या कार्यक्रमास मराठवाडा कृषी विद्यापीठातील
शास्त्रज्ञ डॉ.सुदाम शिराळे, मृदा शास्त्रज्ञ, एकात्मिक शेती
पद्धती यांनी शेतकऱ्यांना तसेच बचत गटातील महिलांना मृदा दिनाविषयी सविस्तर
मार्गदर्शन केले मंडळ कृषी अधिकारी श्री कैलास गायकवाड रिलायन्स फाउंडेशनचे श्री
परमार यांनी मृदा दिनाविषयी तसेच त्यांनी
घेत असलेल्या योजना विषयीशेतकऱ्यांना मार्गदर्शन केले त्याप्रसंगी शेतकरी तसेच बचत
गटाच्या महिला उपस्थित होते. या प्रसंगी
महिला बचत गटांनी तयार केलेल्या गांडूळ खत प्रोजेक्ट ची पाहणी केली व त्यांना
मार्गदर्शन केले.
Tuesday, December 6, 2022
मौजे इंदेवाडी येथे जागतिक मृदा दिन साजरा
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment