मौजे कोळ पिंपरी व पांगरी (ता. धारूर, जि. बीड)
"माझा एक दिवस माझ्या
बळीराजासाठी" उपक्रमांतर्गत कृषि महाविद्यालय अंबाजोगाई, विभागीय कृषी विस्तार शिक्षण केंद्र आंबेजोगाई आणि कृषी विभाग ता. धारूर
जि. बीड यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ८ नोंव्हेबर रोजी मौजे कोळ पिंपरी व
पांगरी, ता. धारूर जि. बीड येथे भेट देऊन मौजे कोळ पिंपरी
येथील शेतकरी श्री.विजयकुमार मुरलीधर खुळे, श्री.धनवीर
चंद्रसेन तांबुरे तसेच मौजे पांगरी येथील श्री.अंकुश लक्ष्मणराव थोरात, दत्तात्रेय रामकृष्ण थोरात यांच्याशी शेतीतील विविध विषयावर चर्चा करून
मार्गदर्शन करण्यात आले. सदरील शेतकरी मित्रांना सतत विद्यापीठातील शास्त्रज्ञ,
विस्तार कृषि विद्यावेत्ता, कृषी विभागातील
कृषी सहाय्यक, विविध विषयातील तज्ञ मंडळींच्या यांच्या
संपर्कात राहून शेती विषयक ज्ञान संपादन करीत असतात. सदरील दोन्ही गावे ही कृषी
विभागाच्या पोकरा या योजनेअंतर्गत येत असल्याने संबंधित शेतकऱ्यांनी पोकरा
योजनेतून तुषार सिंचन तसेच यांत्रिकीकरण याचा लाभ घेतला आहे. शेतीतील विविध अडचणी
विषयी बोलताना त्यांनी प्रामुख्याने विद्युत पुरवठा नियमित नसणे तसेच रानडुकरांचा
व हरणांचा मोठा उपद्रव होणे या गोष्टीकडे लक्ष वेधले. यावेळी सहयोगी अधिष्ठाता डॉ.एस.डी. बंटेवाड,
डॉ. व्ही. पी. सूर्यवंशी, विस्तार कृषी विद्यावेत्ता,
विभागीय कृषी विस्तार शिक्षण केंद्र आंबेजोगाई, श्री प्रा. सी. बी. अडसूळ, कीटक शास्त्रज्ञ, कृषी महाविद्यालय आंबेजोगाई तसेच श्री. शरद शिंगारे, तालुका कृषी अधिकारी धारूर जिल्हा बीड हे उपस्थित होते.
No comments:
Post a Comment