वसंतराव
नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथील कृषी विद्याशाखेत आचार्य पदवी संपादन
केलेले विद्यार्थी तथा खामगाव (ता. गेवराई) येथील कृषी विज्ञान केंद्रातील विषय विशेषज्ञ डॉ. हनुमान सोपानराव गरुड
यांना हैद्राबाद येथील भारतीय कोरडवाहु शेती संस्थेच्या वतीने देण्यात येणारा उत्कृष्ट
आचार्य प्रबंध पुरस्कार (Best Ph.D. Thesis Award) प्रदान करण्यात आला. हैदराबाद
येथे दिनांक २२ ते २४ डिसेंबर २०२२ दरम्यान पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय
परिषदेमध्ये राणी लक्ष्मीबाई केंद्रीय कृषी विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ. पंजाब सिंग
यांच्या हस्ते सदर पुरस्कार देण्यात आला. यावेळी संस्थेच अध्यक्ष तथा क्रीडाचे
संचालक डॉ. व्ही. के. सिंग, माजी कुलगुरू (पंदेकृवी, अकोला) डॉ. व्ही एम
मायंदे, शास्त्रज्ञ डॉ. समी रेड्डी, डॉ.
के व्ही राव, डॉ. बी व्ही असेवार आदींची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ गरूड यांचा आचार्य पदवीचा शोधप्रबंध “परफॉर्मन्स ऑफ डिफरंट लेंड कॉन्फिग्युरेशन
अंडर पिजनपी बेसड इंटरक्रॉपिंग सिस्टीम्स” या विषयावर होता. त्यांचे आचार्य पदवी मार्गदर्शक
डॉ. भगवान आसेवार हे होते. पुरस्काराबद्दल कुलगुरू मा. डॉ. इन्द्र मणि यांनी
अभिनंदन केले.
Best Ph.D. Thesis Award to Dr. Hanuman Garud
Dr. Hanuman Garud, SMS (Agronomy), KVK, Khamgaon has been awarded the "Best Ph.D. Thesis Award" by the Indian Society of Dryland Agriculture (ISDA), ICAR-CRIDA in the presence of Dr. Punjab Singh, VC, RLBCAU (UP), Dr.V.M. Mayande, Former VC, Dr. PDKV, Akola, Dr. Sammi Reddy, Dr. VK Singh, Dr. K. V. Rao, Dr. B.V. Asewar in the International Conference on ‘Reimagining Rainfed Agro-ecosystems: Challenges & Opportunities’ held during 22-24, December, 2022 at ICAR-CRIDA, Hyderabad , Telangana, India. Dr. Hanuman Garud completed his Ph.D. under the guidance of Dr. B.V. Asewar, ADP, CoA, Golegaon.
No comments:
Post a Comment