माजी पंतप्रधान भारतरत्न स्व. इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी आणि प्रथम गृहमंत्री लोहपूरुष स्व. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या वतीने दिनांक ३१ ऑक्टोबर रोजी विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी कुलगुरू मा डॉ इन्द्र मणि यांच्या हस्ते माजी पंतप्रधान भारतरत्न स्व. इंदिरा गांधी आणि स्व. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अपर्णन करून विनम्र अभिवादन केले. यावेळी स्व. सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती “राष्ट्रीय एकता दिवस” म्हणून पाळण्यात येतो. या निमित्ताने कुलगुरू मा डॉ इन्द्र मणि यांनी उपस्थितांना राष्ट्रीय एकता दिवसाची शपथ दिली. यावेळी शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, संशोधन संचालक डॉ दत्तप्रसाद वासकर, विस्तार शिक्षण संचालक डॉ देवराव देवसरकर, कुलसचिव डॉ धिरजकुमार कदम, विद्यापीठ नियंत्रक श्रीमती दिपाराणी देवतराज आदीसह विविध महाविद्यालयाचे प्राचार्य, विभाग प्रमुख, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment