वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा.डॉ इन्द्र मणि यांची फलोत्पादन मंत्री माननीय नामदार श्री संदिपान भुमरे, आमदार मा श्री हरिभाऊ नाना बागडे व जिल्हाधिकारी मा श्री असतीन कुमारपांडे यांची दिनांक ७ नोव्हेंबर रोजी भेट घेतली. माननीय कुलगुरू यांनी विद्यापीठातील सद्यस्थिती व पुढील संशोधनाविषयी माननीय मंत्री महोदयांना अवगत केले. फळ संशोधन केंद्र तसेच औरंगाबाद व जालना जिल्ह्यातील इतर संशोधन केंद्र कृषी महाविद्यालय यांनी केलेले संशोधनाबाबत सखोल चर्चा करण्यात आली. फळ संशोधन केंद्र येथील आंब्याचे व चिंचेच्या विविध वाणा व त्याची वैशिष्ट्य याबाबत माहिती केंद्राचे प्रमुख डॉ. एम बी पाटील यांनी दिली तर मोसंबी पिकातील विविध समस्या व त्यावरील उपाय यावर बदनापूर मोसंबी संशोधन केंद्राचे श्री संजय पाटील सोयगावकर यांनी माहिती सादर केली. बदनापूर येथील कृषी संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ डी के पाटील यांनी तुर मूग व हरभरा या पिकांविषयी संशोधित केलेले विविध वाणाबाबत माहिती सादर केली तुरी चे वाण बीडीएन-७११ हे शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय झाले असून भारतात जवळ जवळ ५० टक्के क्षेत्र हे या वाणाखाली आहे. डॉ सूर्यकांत पवार यांनी बाजरा संशोधन केंद्र विषयी झालेले प्रगती या वेळेला सादर केली. सदरील बैठकीस अशी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राकेश अहिरे, कृषी विद्यालयाचे प्राचार्य डॉ. किरण जाधव व इतर शास्त्रज्ञ यावेळी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment