पैठण तालुक्यातील मौजे थेरगाव येथील प्रगतशील शेतकरी कैलास निर्मळ हे गेल्या आठ दहा वर्षांपासून तूर पीक शेती करतात मागील आठ वर्षे त्यांनी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्या बदनापुर येथील कृषी संशोधन केंद्र निर्मित बिडीएन ७११ या वाणाची लागवड कोरडवाहू शेतीत करत होते. या खरिपात त्यांनी ६ एकर क्षेत्रावर ठिबकद्वारे याच केंद्राचा नवीन मर व वांझ रोग प्रतिबंधक आणि दाण्याचा रंग पांढरा १७० दिवसात तयार होणार बिडीएन ७११ पेक्षाही अधिक उत्पादन देणारे वाण गोदावरी म्हणजे बिडीएन २०१३-४१ याची लागवड केली आहे. या भागात अतिवृष्टीमुळे खरीप पिकाचे नुकसान झाले, परंतु याही परिस्थितीत हा वान तग धरून राहिला आहे. या शेतकऱ्यांनी दोन ओळीतील अंतर १० फूट आणि दोन रोपांतील अंतर दीड फूट ठेवले आहे हे पीक सध्या फुलाने बहरले आहे. बिडीएन ७११ वाणाची फुले पिवळी तर गोदावरी या तूर वाणाची फुले पांढरी आहे. पैठण तालुका हा औरंगाबाद जिल्ह्यात तूर पीक आवडीने घेणारे शेतकऱ्यांचा तालुका आहे. मागील पाच वर्षांपासून विद्यापीठाच्या तूर वाणाची बियाणे शेतकरी बियाणे विक्री केंद्रातून घेऊन जात आहे, शिवाय शेतकऱ्यांना स्वतः च्या शेतातील बियाणे वापर करत लागवड करा असा संदेश देखील कृषी शास्रज्ञानी दिलेला आहे शिवाय आपआपल्या गावात इतर शेतकऱ्यांना ही बियाणे योग्य ती काळजी घेत देऊ शकतात असे ही सांगण्यात आलेले आहे त्यामुळे या तालुक्यात तूर पीक सध्या चांगलेच बहरले आहे.
सौजन्य
: श्री रामेश्वर ठोंबरे, विभागीय
कृषी विस्तार शिक्षण केंद्र, औरंगाबाद
No comments:
Post a Comment