वसंतराव नाईक
मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी अंतर्गत आंतर महाविद्यालयीन बुद्धिबळ स्पर्धा पाथ्री
येथील डॉ. गंगाधरराव पाथरीकर कृषी महाविद्यालयात पार पडल्या. उद्घाटन प्रसंगी
कार्यक्रमाचे अध्यक्ष मित्र साधना शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष माननीय श्री.
द्वारकाभाऊ पाथ्रीकर हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणुन विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ.
एस. एस मोरे हे उपस्थित होते. व्यासपीठावर मित्र साधना शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष
श्री राजेंद्रभाऊ पाथ्रीकर, प्राचार्य डॉ. एस. आर
नागरगोजे आदींची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व
कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
स्पर्धेत
शासकीय व अशासकीय अश्या एकुण १४ महाविद्यालयांनी सहभाग नोंदवला होता. त्यातून
सर्वोत्तम कामगिरी, प्रथम पारितोषिक एम. जी. एम जैवतंत्रज्ञान
महाविद्यालय औरंगाबाद तर द्वितीय पारितोषिक कृषी महाविद्यालय बदनापुर यांनी
मिळवले. विजयी संघांना पारितोषिक व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे
प्रास्ताविक उपप्राचार्य डॉ. व्ही. पी वावधने यांनी केले. कार्यक्रमाचे
सूत्रसंचालन प्राध्यापिका नरोटे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. वासनिक यांनी
केले. पंच समितीत डॉ. राऊत, डॉ. पाटील, डॉ. दडके, डॉ. झाटे, श्री पंडित, श्री राठोड, डॉ वासनिक, वाहेकर समावेश होता. कार्यक्रमास प्राध्यापक व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment