वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या लिहाखेडी (जिल्हा छ.संभाजीनगर) कृषि महाविद्यालयात कुलगुरु मा डॉ.इन्द्र मणि व शिक्षण संचालक डॉ.भगवान आसेवार यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक २४ जानेवारी रोजी प्रोफसर, अमेरिकेतील परडयू विद्यापीठाचे प्राध्यापक डॉ. धर्मेद्र सारस्वत यांचे महाविद्यालयाचे
विद्यार्थी, प्राध्यापक, शास्त्रज्ञ, अधिकारी यांच्याकरिता कृत्रिम बुध्दीमत्तेचा शेतीत वापर या
विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
प्राध्यापक डॉ.
धर्मेद्र सारस्वत यांनी आपल्या व्याख्यानात विद्यार्थ्यांना कृत्रिम बुध्दीमत्ता व त्याचा कृषि
क्षेत्रात वाढता उपयोग याबद्दल मार्गदर्शन केले. मार्गदर्शनपर बोलताना त्यांनी तंत्रज्ञानात सतत बदल
असल्यामुळे आपल्याला सतत अद्यावत राहाणे आवश्यक आहे. नाविन्य आत्मसात करण्यासाठी
विद्याथ्यर्थ्यांनी न्युनगंड न बाळगता
स्वतःमध्ये आत्मविश्वास निर्माण करावा. सर्व विद्यार्थी समान असतात, त्यांना पायाभूत सोयीपेक्षाही शिक्षण कशाप्रकारे दिले जाते
है खुप महत्त्वाचे आहे.
शिक्षण हे व्यवसायाभिमुख असले
पाहिजे, त्यास प्रात्यक्षिकाची जोड
असणे आवश्यक आहे.
भविष्यात शेतीमध्ये
कृत्रिम बुध्दीमत्ता ही महत्तवाची भुमीका बजावणार असल्यामुळे विद्यार्थी,
शास्त्रज्ञ व शेतकरी यांनी नेहमीच सज्ज
राहावे.
शेतीतील उत्पादकता वाढविण्यासाठी डाटा विश्लेषण,
स्वंयचलीत यंत्रणा आणि अचुक
निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत कृत्रिम बुध्दीमत्तेचा वापर, यावर मार्गदर्शन करून या तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांचे श्रम कमी
करण्याबरोबरच आर्थिक बचत कशी
होवू शकते हे
त्यांनी स्पष्ट केले. त्यांनी विद्याथ्यांशी संवाद साधत
परदेशातील कृषि क्षेत्राशी निगडीत रोजगारांच्या संधी
याबद्दल
माहिती दिली.
कार्यक्रमाच्या प्रास्तविकामध्ये डॉ. सु.चा. पवार यांनी राष्ट्रीय कृषि संशोधन प्रकल्प, छ. संभाजीनगर या संशोधन केंद्रातून प्रसारीत झालेल्या जैवसंपृक्त बाजरी वाण, संशोधन केंद्रात कार्यान्वीय असलेल्या जैविक औषधी व खते संशोधन व निर्मिती प्रयोगशाळेत तयार होणाऱ्या जैविक औषधी व खते यांचा विविध पिकांसाठी शेतकऱ्यांना होणारा उपयोगाबद्दल माहिती दिली.
No comments:
Post a Comment