Tuesday, January 7, 2025

धाराशिव येथे कृषी उद्योजकता निर्मिती व क्षमाता विकास कार्यशाळचे आयोजन आणि महा ॲग्रो आयडॉल पुरस्कार २०२४ चे वितरण

उद्योजकता हाच यशस्वी होण्याचा मार्ग - कुलगुरू मा. प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे तुळजापूर येथील कृषी विज्ञान केंद्र, महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) धाराशिव आणि कृषी भूषण महाराष्ट्र एफपीओ स्टार्टअप फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी, कृषी उद्योजक, शेतकरी उत्पादक कंपन्यांचा क्षमता विकासावर आधारित कृषी उद्योजकता निर्मिती क्षमता विकास कार्यशाळा तसेच ॲग्रो केअर कृषी मंच आयोजित महा ॲग्रो आयडॉल अवॉर्ड्स २०२४ चे वितरण कार्यक्रम दिनांक जानेवारी रोजी धाराशिव येथील सेंट्रल बिल्डिंगच्या डीपीडीसी हॉल मध्ये आयोजित करण्यात आला. अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू मा. प्रा. (डॉ.) इन्द्र मणि हे होते. कार्यक्रमास सन्माननीय उपस्थिती धाराशिव चे पोलीस अधीक्षक मा. श्री संजय जाधव यांची होती. व्यासपीठावर विस्तार शिक्षण संचालक डॉ. गिरधारी वाघमारे, धाराशिवचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री रविंद्र माने, सहयोगी अधिष्ठाता डॉ दिगंबर पेरके, आत्माचे प्रकल्प संचालक श्री खंडेराव सराफ, कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख श्री सचिन सूर्यवंशी आणि कृषी भूषण महाराष्ट्र एफपीओ स्टार्टअप फेडरेशनचे अध्यक्ष श्री भूषण निकम हे होते.

यावेळी कृषि आणि सलग्न क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेले शास्त्रज्ञ, विस्तार कार्यकर्ते , प्रगतशील शेतकरी आणि यशस्वी उद्योजक अशा एकूण ३० व्यक्तींना मान्यवरांच्या शुभहस्ते महा ॲग्रो आयडॉल पुरस्कार २०२४ चे वितरण करण्यात आले.

अध्यक्षीय भाषणात कुलगुरू मा. प्रा (डॉ) इन्द्र मणि यांनी कृषी उद्योजकता निर्मिती आणि क्षमता विकासासाठी महत्वपूर्ण   मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, उद्योजकता हाच यशस्वी होण्याचा मार्ग, उद्योजक बनायच असेल तर मेहनत करण्याची इच्छा, आर्थिक जोखीम घेण्याची तयारी पाहिजे. ठराविक गोष्टी ठरवून उद्योजक बनने अवघड आहे. महाराष्ट्रात शेतकरी मध्ये उद्योजकता कौशल्य भरभरून आहेत. यशस्वी उद्योजकाने किमान एक नवीन उद्योजक निर्माण करणे गरजेचे आहे . तसेच समाजातील लोकांना उद्योजक होण्याकरिता सहकार्य प्रेरणा दिली पाहिजे. तसेच आपण मोठे बनण्यापेक्षा महान बनणे महत्वाचे  आहे, असे प्रतिपादन केले.

विस्तार शिक्षण संचालक डॉ. वाघमारे सर म्हणाले की, चिन, जपान या देशांनी छोटे छोटे लघु उद्योग निर्माण करून उद्योजकता वाढविली. परंतु, आज भारत देशाने चिन आणि जपान या देशांना मागे टाकत आहोत. मा. कुलगुरू यांच्या संकल्पनेतून माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी हा कार्यक्रम खास शेतकरी बांधवाकरिता दर महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी अविरतपणे घेण्यात येत आहे. शेतकरी शास्त्रज्ञ सुसंवाद दर शुक्रवारी ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येतो त्याचा शेतकरी बांधवानी सहभागी होऊन फायदा घ्यावा आपल्या शंका चे निरसन करून घ्यावे. विद्यापीठ विस्तार कार्यातून शेतकऱ्यांना यशस्वी उद्योजक तयार करण्यासाठी प्रयत्न करत आहे. मोठे उद्योजक निर्माण होने काळाची गरज आहे असे नमूद केले.














No comments:

Post a Comment