वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा. प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी बाजार वाहेगाव (ता. बदनापुर) येथील विद्यापीठ विकसित तुर वाण गोदावरी उत्पादकांच्या शेतावरती दिनांक ११ जानेवारी भेटी दिल्या. त्यांनी श्री साईनाथ काळे आणि श्री नवाब पटेल या शेतकऱ्यांच्या शेतावरती जिरायत गोदावरी वाणाची पाहणी केली. दोन्ही शेतकऱ्यांनी गोदावरी तुरी पासून किमान दहा ते बारा क्विंटल उत्पादन मिळणार असल्याची खात्री व्यक्त केली. तुरीसाठी कमी होणारा खर्च आणि चांगले उत्पादन यामुळे एकरी जवळपास ९० हजार ते एक लाख पर्यंत उत्पन्न मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच श्री बळीराम काळे यांनी सोयाबीन पासून नऊ क्विंटल आणि तुरीपासून आठ क्विंटल आंतरपीक घेऊन अधिक चांगले उत्पादन मिळाल्याची माहिती दिली. यावेळी गावकऱ्यांनी मा. कुलगुरू यांचे कृषि संशोधन केंद्र बदनापूर द्वारे निर्मित नवनवीन वाण मिळाल्यामुळे शेतीमध्ये अधिक फायदा होत असल्याचे नमूद केले. तसेच यावर्षी हरभऱ्याचा नवीन परभणी चना हा वाण या गावांमध्ये देण्यात आला असून हा वाण उत्तम असल्याचे शेतकऱ्यांनी माननीय कुलगुरू यांना सांगितले तसेच विद्यापीठाचे आभार मानले. यावेळी त्यांच्या सोबत प्रभारी अधिकारी डॉ किरण जाधव आणि बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते...
No comments:
Post a Comment