Tuesday, February 10, 2026

महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय कृषिमंत्री माननीय नामदार श्री दत्तात्रय भरणे यांचे अध्यक्षतेत "नैसर्गिक शेती- संधी आणि आव्हाने" विषयावर राज्यस्तरीय विचारमंथन संपन्न!

“नैसर्गिक शेती संदर्भात विस्तार सेवा व समन्वय " सत्र माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले.











कृषिप्रधान संस्कृती लाभलेल्या आपल्या देशाने कृषि वैज्ञानिक आणि शेतकऱ्यांच्या योगदानातून कधीकाळी इतर प्रगत राष्ट्रावरील  अन्नधान्य उत्पादनातील परावलंबीत्व झूगारत केवळ आपल्या सर्वधिक लोकसंख्यांक देशाची भूकच भागविली नाही तर अन्नधान्य, फळे व इतर कृषि उत्पादांच्या निर्यातीत महत्वपूर्ण भूमिका बजावत आपले सर्वोत्तम योगदान दिले असल्याचे प्रतिपादित करतांना महाराष्ट्र राज्याचे कृषि मंत्री ना. श्री. दत्तात्रय भरणे यांनी राज्यातील शेती क्षेत्राचे आधीपत्य अधोरेखित केले व सध्या काळाची गरज बनलेल्या व्यावसायिकदृष्ट्या फायदेशीर नैसर्गिक शेतीच्या तंत्रज्ञान वापरासह प्रचार प्रसारात महाराष्ट्र देशपातळीवर अग्रेसर राज्य ठरेल असा आत्मविश्वास देखील व्यक्त केला. नैसर्गिक शेतीचे विविध पैलू जाणून घेण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाच्या नैसर्गिक शेती संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे वतीने "नैसर्गिक शेती - संधी आणि आव्हाने" या अतिशय महत्त्वकांक्षी विषयावर एक दिवसीय राज्यस्तरीय विचार मंथन सत्राचे आयोजन दिनांक १० फेब्रुवारी २०२६ रोजी कृषि महाविद्यालय अकोलाच्या स्व. के. आर. ठाकरे सभागृहात करण्यात आले होते, यां अतिशय महत्वाकांक्षी ब्रेन स्टोर्मिंग सत्राच्या उदघाटन प्रसंगी कार्यक्रमाचे उदघाटक तथा अध्यक्ष म्हणून राज्यभरातून उपस्थित झालेले कृषि विद्यापीठांचे कुलगुरू, संचालक, शास्त्रज्ञ, कृषि महाविद्यालय/कृषि तंत्र विद्यालयांचे सहयोगी अधिष्ठाता/ प्राचार्य, कृषि विज्ञान केंद्राचे प्रमुख/ विषय तज्ञ,  अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी- विद्यार्थिनी सोबतच राज्यातील कृषि विभागाचे प्रादेशिक,विभागीय, जिल्हा स्तरीय अधिकारी, प्रकल्प संचालक आत्मा, यांचे सह आभासी माध्यमातून सहभागी झालेले प्रयोगशील, प्रगतीशील शेतकरी वर्गाला संबोधीत करतांना ते बोलत होते.  केंद्र शासनाच्या शाश्वत शेती धोरणांनुसार तसेच महाराष्ट्र राज्य शासनाच्या कृषी धोरणांनुसार नैसर्गिक शेतीस चालना देणे ही काळाची गरज बनली असून या संदर्भात महाराष्ट्राचे सन्माननीय राज्यपाल व कृषी विद्यापीठांचे कुलपती मा. श्री. आचार्य देवव्रतजी यांचे योगदान अत्यंत मौलिक असल्याचे सांगताना कृषिमंत्री नामदार श्री. दत्तात्रय भरणे यांनी त्यांच्या दूरदृष्टीतून आणि सातत्यपूर्ण मार्गदर्शनामुळे नैसर्गिक शेतीचा विचार राज्यातील प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी आपण संयुक्त परिश्रमांची मोट बांधत आर्थिक, सशक्त, आरोग्य  संपन्न राज्य म्हणून पुढे आणण्याचा संकल्प करण्याचे भावनिक आवाहन केले व राज्य शासनाच्या भरीव सहयोगाची शाश्वती देखील दिली. तर  माननीय राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी आपल्या दूरदृष्टीतून शास्त्रोक्त पद्धतीने शाश्वत ठरलेले विविध कृषि विषयक संशोधन संस्थांच्या निरंतर संशोधनातून सिद्ध झालेले व्यावसायिकदृष्ट्या शाश्वत नैसर्गिक शेती तत्रज्ञान पूर्णपणे समजून घेत, प्रथम निविष्ठा निर्मिती व नंतर छोट्या प्रमाणात वापर करण्याचे देखील स्पष्ट केले असल्याचे सांगताना माननीय राज्यपाल महोदयांचे सचिव डॉ. प्रशांतकुमार नारनवरे यांनी इतर राज्यातील कृषि विषयक संस्थानी सिद्ध केलेले तंत्रज्ञान प्रथम आपल्या राज्यातील कृषि विषयक संस्थानी यावर अधिक संशोधन करीत त्यातून आपल्या शासकीय निमशासकीय संस्थासह प्रयोगशील शेतकऱ्यांच्या एकात्मिक प्रयत्नातून नैसर्गिक शेती कृतीत आणायचे आवाहन आपले मार्गदर्शनात केले.

त्याप्रसंगी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथील माननीय कुलगुरू डॉ. शरद गडाख तसेच राज्याचे माननीय कृषी आयुक्त श्री. सुरज मांढरे यांनीही कार्यक्रमात मार्गदर्शन केले. उद्घाटन सत्रानंतर तांत्रिक सत्रांच्या माध्यमातून नैसर्गिक शेतीचे विविध पैलू सविस्तरपणे उलगडण्यात आले. यामध्ये नैसर्गिक शेती : क्षमता व परिणाम”, “नैसर्गिक शेतीमध्ये सूक्ष्मजीव व गांडुळांची भूमिका”, “नैसर्गिक शेती अंतर्गत पीक उत्पादन सुधारणा” तसेच नैसर्गिक शेती संदर्भात विस्तार सेवा व समन्वय” या चार तांत्रिक सत्रांमध्ये तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. यापैकी नैसर्गिक शेती संदर्भात विस्तार सेवा व समन्वय” हे सत्र माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले.

महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय कृषिमंत्री माननीय नामदार श्री. दत्तात्रय भरणे यांचे अध्यक्षतेत संपन्न झालेल्या या अतिशय महत्त्वकांक्षी परिसंवादाचे प्रसंगी महाराष्ट्र राज्याच्या राज्यपाल महोदयांचे माननीय सचिव डॉ. प्रशांतकुमार नारनवरे, राज्याचे कृषी आयुक्त माननीय श्री सुरज मांढरे यांचे सह डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोलाचे माननीय कुलगुरू  डॉ. शरद गडाख, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे कुलगुरू  डॉ. विलास खर्चे, मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणीचे माननीय कुलगुरू, डॉ. इन्द्र मणि, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोलीचे माननीय कुलगुरू डॉ. संजय भावे, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूरचे माननीय कुलगुरू डॉ. नितीन पाटील , महात्मा फुले कृषि विद्यापीठ,, राहुरीचे माजी कुलगुरू डॉ. सुभाष पुरी, विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्य, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, प्रमुख संशोधक (PI) डॉ. आनंद गोरे यांच्यासह नैसर्गिक शेती क्षेत्रातील तज्ज्ञ शास्त्रज्ञ डॉ. मिनाक्षी पाटील, डॉ. पपिता गौरखेडे, डॉ. श्रध्दा धुरगुडे, प्रा. प्रीतम भुतडा तसेच संशोधन सहाय्यक तेजस्विनी कच्छवे तसेच या कार्यशाळेत कृषी आयुक्तालयापासून ते जिल्हा स्तरावरील अधिकारी, आत्माचे प्रकल्प संचालक, विद्यापीठाचे अधिष्ठाता, विस्तार व संशोधन संचालक, विषयतज्ज्ञ शास्त्रज्ञ, विद्यार्थी, जिल्हा कृषी अधीक्षक आणि विविध राष्ट्रीय संशोधन केंद्रांचे  संचालकांची उपस्थिती लाभली होती.

सौजन्य - 

डॉ. किशोर बिडवे, जनसंपर्क अधिकारी, पीडीकेव्ही, अकोला

 



No comments:

Post a Comment