सकाळ -ॲग्रोवन तर्फे ॲग्री एक्स्पो- २५ या कृषी प्रदर्शनाचे छत्रपती संभाजी नगर येथील जालना रोडवरील केंब्रिज स्कूल जवळील श्रीराम मंदिर ट्रस्ट मैदानावर आयोजन शुक्रवार (दि.१० ) ते सोमवार (दि.१३)करण्यात आले आहे. शनिवारी (दि.११) वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठचे कुलगुरू मा प्रा. (डॉ.) इन्द्र मणि सर यांनी ॲग्री एक्स्पो -२५ या कृषी प्रदर्शनातील विविध दालनास भेट देऊन शेतकरी व दालनधारकांशी संवाद साधला. कृषी अवजारे ,तंत्रज्ञानविषयक , शेतमाल प्रक्रिया, पूरक उद्योग दालनाची पाहणी केली. तसेच कुलगुरू महोदयांनी या ठिकाणी भेट देण्यासाठी आलेल्या विद्यापीठाच्या लिहाखेडी येथील कृषी महाविद्यालय विद्यार्थ्यांशी संवाद साधून प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
या प्रसंगी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. गिरधारी वाघमारे, तसेच परभणी, बदनापूर आणि छत्रपती संभाजीनगर येथील विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉ. एस. बी. पवार, डॉ. किरण जाधव, डॉ. गोपाळ शिंदे उपस्थित होते.
No comments:
Post a Comment