Thursday, January 9, 2025

बदनापूर येथील कृषी संशोधन केंद्रात कापूस उत्पादक शेतकरी मेळावा आणि प्रशिक्षण संपन्न

 कुलगुरु मा.प्रा.(डॉ.)इन्द्र मणि यांच्या शुभहस्ते कीटकनाशके फवारताना वापरण्यासाठीचे सेफ्टी किट वितरण

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या बदनापूर येथील कृषी संशोधन केंद्र आणि नागपूर येथील केंद्रीय कापूस संशोधन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने कीटकनाशक प्रतिकारक्षमता व्यवस्थापन प्रकल्प अंतर्गत कापूस उत्पादक शेतकरी मेळावा आणि प्रशिक्षण कार्यक्रम दिनांक ९ जानेवारी रोजी संपन्न झाला. अध्यक्षस्थानी कुलगुरु मा.प्रा.(डॉ.)इन्द्र मणि हे होते. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून नवी दिल्ली येथील भारतीय पीक संरक्षण महासंघाचे कार्यकारी संचालक श्रीमती निर्मला पत्रावाला आणि नागपूर येथील केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ विश्लेष नगरारे हे होते. यावेळी संशोधन संचालक डॉ खिजर बेग, विस्तार शिक्षण संचालक डॉ गिरधारी वाघमारे, सहयोगी अधिष्ठाता डॉ. राकेश अहिरे, वनस्पती जनुकीय  विभागाचे प्रमुख डॉ. हिराकांत काळपांडे, वरीष्ठ शास्त्रज्ञ डॉ डी के. पाटील प्रभारी अधिकारी डॉ किरण जाधव आदींची उपस्थिती होती.

कार्यक्रमादरम्यान नवी दिल्ली येथील सीसीएफआय संस्थेद्वारे उपस्थित शेतकऱ्यांना कुलगुरु मा.प्रा.(डॉ.)इन्द्र मणि यांच्या शुभहस्ते कीटकनाशके फवारताना वापरण्यासाठी चे सेफ्टी किट देण्यात आले. तसेच त्यांनी परभणी चना १६ वाणाच्या प्रक्सेत्रास भेट दिली. या वाणास जमिनीपासून ३० सेंटीमीटर नंतर घाटे लागत असल्याचे महत्वपूर्ण वैशिष्ट्य याचे त्यांनी निरीक्षण केले आणि शेतकऱ्यासाठी हा वाण मशीनद्वारे काढणीसाठी उपयुक्त असल्याचे नमूद केले.








No comments:

Post a Comment