वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या धाराशिव येथील कृषी महाविद्यालयास कुलगुरू मा. प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी दिनांक ७ जानेवारी रोजी भेट दिली. यावेळी त्यांच्या सोबत विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. गिरधारी वाघमारे हे होते. सदरील भेट प्रेरणादायीही होती, यामुळे महाविद्यालयातील विद्यार्थी व प्राध्यापकांच्या आत्मविश्वासात भर घातली. माननीय कुलगुरूंच्या उत्साहवर्धक शब्दांनी उपस्थितांचे मनोबल वाढवले व शिक्षण आणि नवकल्पनांसाठीची वचनबद्धता आणखी मजबूत केली. या भेटीमध्ये माननीय कुलगुरू आणि संचालक महोदयांनी महाविद्यालयाच्या शैक्षणिक, संशोधन व विस्तार कार्याचा आढावा घेतला. तसेच त्यांनी प्राध्यापक व विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या शंका समाधान व नवकल्पनांना प्रोत्साहन दिले. महाविद्यालयाच्या पायाभूत सुविधा, संशोधन प्रकल्प व विस्तार कार्याची त्यांनी प्रशंसा केली आणि भविष्यातील विकासासाठी महत्वपूर्ण सूचना दिल्या. या भेटीने महाविद्यालयाच्या सर्व सदस्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ दिगंबर पेरके, प्राध्यापक यांच्यासह सर्व विद्यार्थ्यांनी भेटीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
No comments:
Post a Comment