हिसार (हरियाणा) येथील चौधरी चरण सिंह हरियाणा कृषी विद्यापीठात २१वी अखिल भारतीय आंतर कृषि विद्यापीठ स्पर्धा २०२२-२३ चे दिनांक २० फेब्रवारी ते २४ फेब्रुवारी दरम्यान आयोजन करण्यात आले होते. यात व्हॉलीबॉल स्पर्धेत वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या मुलीच्या संघाने सुवर्ण पदक प्राप्त करून मानाचा तुरा रावला तसेच सर्वसाधारण गटातील चॅम्पियन्स ट्रॉफी प्राप्त केली. यावेळी चौधरी चरण सिंह हरियाणा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ बी. आर; काम्बोज यांच्या हस्ते ट्रॉफी प्रदान करण्यात आली. सदर यशाबाबत कुलगुरू मा डॉ इन्द्र मणि, शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, कुलसचिव डॉ धिरजकुमार कदम, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ सचिन मोरे आदींनी अभिनंदन केले. स्पर्धेत देशातील कृषि विद्यापीठातील ६५ संघाने सहभाग नोंदविला होता. संघास डॉ आशाताई देशमुख, डॉ डि एफ राठोड, डॉ चौव्हान आदींनी मार्गदर्शन केले.
No comments:
Post a Comment