Saturday, February 18, 2023

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाची २०९ वी कार्यकारी परिषदेची बैठक संपन्‍न

209th Executive Council Meeting of VNMKV, Parbhani 


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाची २०९ वी कार्यकारी परिषदेची बैठक दिनांक १६ फेब्रुवारी रोजी कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि यांच्‍या अध्‍यक्षतेखाली संपन्‍न झाली. बैठकीस कार्यकारी परिषदेचे सदस्‍य विधानपरिषद सदस्‍य मा आ श्री सतीश चव्‍हाण, विधानपरिषद सदस्‍य मा आ श्री रमेशराव कराड, परभणी विधानसभेचे आमदार मा डॉ राहुल पाटील, विधानसभा सदस्‍य आमदार मा श्री अभिमन्‍यु पवार,  मा डॉ िआदिती सारडा, मा श्री भागवत देवसरकर, मा श्री विठ्ठलराव सकपाळ, मा श्री सुरज जगताप, मा श्री प्रविण देशमुख, मा श्री दिलीप देशमुख, शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ देवराव देवसरकर, कुलसचिव डॉ धिरजकुमार कदम, विद्यापीठ अभियंता श्री दीपक काशाळका, विद्यापीठ नियंत्रक श्रीमती दिपाराणी देवतराज आदींची प्रमुख उपस्थिती होती. बैठकीत विविध धोरणात्‍मक निर्णय घेण्‍यात आले. विद्यापीठाचे नामांकन वाढीकरिता करण्‍यात येणा-या उपाय योजना, विविध सामजंस्‍य करार, विद्यार्थी, शेतकरी व कर्मचारी यांच्‍या दृष्‍टीने विविध निर्णय घेण्‍यात आले. याप्रसंगी विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे नवनियुक्‍त सदस्‍याचे विद्यापीठाच्‍या वतीने सत्‍कार करण्‍यात आला.





No comments:

Post a Comment