वनामकृवितील बदनापूर कृषी महाविद्यालयात क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन
विद्यार्थ्यांनी
महाविद्यालयीन जीवनामध्ये अभ्यासासोबतच आपल्यातील कलागुण जोपासावे, विद्यार्थी जीवन आनंदी,
उत्साही व निरोगी राहण्यासाठी ते
कलागुण ओळखून त्याला चालना द्यावी जेणेकरून आपले विद्यार्थीजीवन हे सुकर व कायम
स्मरणीय राहील असे प्रतिपादन बदनापूरचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांनी केले
ते कृषी महाविद्यालय, बदनापूर मार्फत आयोजित क्रीडा व सांस्कृतिक
कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी उद्घाटक म्हणून बोलत होते. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि
विद्यापीठांतर्गत असलेल्या बदनापुर येथील कृषी महाविद्यालयाच्या वतीने दिनांक २३ ते २५ फेब्रुवारी रोजी क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले
आहे. यावेळी उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष व कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता
व प्राचार्य डॉ. आर. डी. अहिरे यांनी क्रीडा महोत्सवाच्या अध्यक्षीय भाषणात
महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विद्यापीठस्तरावर क्रीडाक्षेत्रात केलेल्या
कामगिरीबद्दल अवगत करून दिले तसेच क्रीडा प्रकारासाठी आवश्यक त्या सोयीसुविधा
विद्यार्थ्यांना पुरविण्यात येतील असे आश्वासन दिले.
क्रीडा
महोत्सवादरम्यान क्रिकेट, व्हॉलीबॉल, खो-खो, कबड्डी, बुद्धिबळ व टेबल टेनिस आदी विविध क्रीडा प्रकारांचा
समावेश करण्यात आलेला असून मुलांसाठी व मुलींसाठी स्वतंत्र सामन्यांचे आयोजन
करण्यात आलेले आहे. यावेळी राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त
त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे
सूत्रसंचालन प्रा डॉ. एन. डी. देशमुख यांनी केले. उद्घाटन प्रसंगी कृषी संशोधन
केंद्र, बदनापूरचे प्रभारी अधिकारी डॉ. डी. के. पाटील, जिमखाना उपाध्यक्ष डॉ. एस. एस. माने यांच्यासह
महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सौजन्य
– डॉ एन डी देशमुख, कृषि महाविद्यालय, बदनापुर
No comments:
Post a Comment