Wednesday, July 12, 2023

वनामकृविच्‍या औरंगाबाद येथील बाजरा संशोधन प्रकल्‍पाचा गौरव

बाजरा संशोधन व बीजोत्पादन कार्याबद्दल पारितोषक 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्‍या औरंगाबाद येथील अखिल भारतीय बाजरा संशोधन प्रकल्पास उत्‍कृष्‍ट संशोधन केंद्र म्‍हणुन हैद्राबाद येथील राष्‍ट्रीय भरड धान्‍य संशोधन केंद्रात आयोजित वार्षिक बैठकीत दिनांक ११ जुलै रोजी प्रमाणपत्र देऊन हस्‍ते गौरवण्‍यात आले. यावेळी भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे सहायक महासंचालक डॉ शरदकुमार प्रधान, जोधपुर येथील केंद्रीय शुष्क क्षेत्र संशोधनं संस्थेचे संचालक डॉ ओमप्रकाश यादव, हैदराबाद येथील अखिल भारतीय श्री अन्न प्रकल्पाच्या संचालिका डॉ तारा सत्यवती यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रमाणपत्र प्रदान करण्‍यात आले. सदर गौरवाबद्दल कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि व संशोधन संचालक डॉ  दत्‍तप्रसाद वासकर यांनी शास्‍त्रज्ञांचे अभिनंदन केले.

बाजरा संशोधन केंद्राने अखिल भारतीय बाजारा प्रकल्प जोधपुर व इक्रिसॅट संस्था हैदराबाद यांच्या संयुक्त विद्यमाने अधिकतम लोह व जस्त असणाऱ्या संकरित वाण एएचबी १२०० व एएचबी १२६९  या जैवसंपृक्त संकरित वाण विकसित केला, हा वाण राष्ट्रीय स्तरावर प्रसारित करण्यात आला. या वाणाचे बीजोत्पादन घेऊन शेतकरी बांधवापर्यंत पोहोचण्याकरिता विशेष प्रयत्न केले. कुलगुरू मा डॉ इन्द्र मणि व संशोधन संचालक डॉ दत्तप्रसाद वासकर यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणावर बीजोत्पादनाचा कार्यक्रम घेऊन बियाणे शेतकरी पर्यंत पोहोचण्यासाठी कार्यक्रम हाती घेतला आहे. तसेच २०२३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून साजरे येत असुन बाजरा लागवड, महत्‍व या बाबत मोठया प्रमाणात जागृती करण्‍यात येत आहे. या पार्श्‍वभुमीवर सदर संशोधन केंद्रास गौरवण्‍यात आले.

सहयोगी संचालक संशोधन डॉ सूर्यकांत पवार, बाजरा पिकाचे रोग शास्त्रज्ञ डॉ. दिलीप हिंगोले, कृषि विद्या विभागाचे डॉ चंद्रकांत पाटील, बाजरा पैदासकार डॉ. हीरामन भदर्गे, डॉ. आशिष बागडे कीटकशास्त्रज्ञ डॉ. नितीन पतंगे, पिक पैदासकार डॉ दिपक पाटील, वरीष्ठ संशोधक श्रीमती शितल कांबळे, आशा झोटे, नानासाहेब  कुंदे, रामेश्वर ठोंबरे, बाबासाहेब लगाने, सोपंन माने आदीसह अधिकारी व कर्मचारी यांचे योगदान लाभले. बीजोउत्पादन कार्य करता डॉ  खिसर बेग, डॉ श्यामराव घुगे, डॉ मिसाळ यांचे योगदान लाभले, अशी माहिती डॉ सुर्यकांत पवार यांनी दिली.  

 

No comments:

Post a Comment