वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. इन्द्र मणि यांनी दिनांक १६ एप्रिल रोजी बाजरी संशोधन केंद्र, वैजापुर प्रक्षेञास भेट देऊन प्रक्षेञावर घेण्यात आलेल्या १० एकर क्षेञातील बाजरी बीजोत्पादन पिकाची (CMS-98222 A x AUBI-1101R) पाहणी केली. २०२३ हे वर्ष अंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष असल्या कारणाने तृणधान्याचे व विषेशतः बाजरी पिकाचे आहारातील महत्व यविषयी मा.कुलगुरु महोदयांनी अनमोल मार्गदर्शन केले. याप्रसंगी वैजापुर तालुक्यातील खंडाळा, लोणी ई.गावचे बाजरी उत्पादक शेतकरी उपस्थित होते. रा.कृ.सं प्र. औरंगाबाद येथून संशोधित झालेली संकरीत बाजरी एएचबी-१२०० या वाणाचे प्रक्षेञावर बीजोत्पादन घेत असताने मा.कुलगुरु महोदयांनी शेतक-यांनीही आपल्या शेतावर बीजोत्पादन घेऊन आपला आर्थिकस्तर उंचवावा असे शेतक-यांना आवाहन केले. मोठ्या प्रमाणात बाजरी पिकाखालील क्षेञ वाढवून उत्पादन घ्यावे व आहारामध्ये मोठ्या प्रमाणात समावेश करुन घ्यावा. भेटी प्रसंगी मा. कुलगुरु महोदयांनी बांबू पिकाची पाहणी केली व प्रक्षेञावर उत्पादन वाढवून महसूल कसा वाढविता येईल याविषयी मार्गदर्शन केले, प्रक्षेञ बळकटीकरणाविषयी मार्गदर्शन केले. याप्रसंगी डॉ. सुर्यकांत पवार, सहयोगी संचालक संशोधन रा.कृ.सं.प्र.औरंगाबाद, डॉ दिलीप हिंगोले, वनस्पती रोग शास्रज्ञ व डॉ.बागडे सर, सहाय्यक पैदासकार आदीसह बाजरी उत्पादक शेतकरी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment