वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्या लातुर येथील कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता तथा प्राचार्य डॉ बाबासाहेब ठोंबरे यांना चंदीगड (पंजाब) येथील भारतीय कृषि व उद्यान संशोधन विकास संस्थेच्या वतीने "जीवनगौरव पुरस्काराने" सन्मानित करण्यात आले. प्राचार्य डॉ.बाबासाहेब ठोंबरे यांच्या कृषि, सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक व पर्यावरण संवर्धन यासारख्या विविध क्षेत्रात त्यांनी राबवलेल्या अभिनव संकल्पना व विविध उपक्रमांची तसेच उल्लेखनीय सृजनशील कार्याची दखल घेऊन सदर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
कृषि महाविद्यालय अंबाजोगाई येथे सहयोगी अधिष्ठाता या पदावर कार्यरत असताना त्यांनी अत्यंत उल्लेखनीय असे कार्य केले आहे. कृषि विद्यापीठाच्या शिक्षण, संशोधन आणि विस्तार कार्याबरोबरच त्यांनी महाविद्यालयात राबविलेल्या विविध उपक्रमांतर्गत वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धन, अटल घनवन वृक्ष लागवड, योगा पार्क इत्यादी विविध संकल्पना त्यांनी सर्वांना सोबत घेऊन महाविद्यालय व महाविद्यालयाच्या परिसरात राबविल्या. अत्यंत अल्पावधीत एकूण २६ हजारांहून अधिक विविध प्रजातींच्या वृक्षरोपांची लागवड करून त्यांचे संवर्धन केले आहे. त्याचबरोबर कृषि महाविद्यालयासमोर अत्यंत देखणे, नयनरम्य आणि रमणीय (गार्डन) बगीचा निर्माण करून महाविद्यालयाची शोभा वृद्धिंगत केली आहे. संस्थेशी विविध क्षेत्रातील मान्यवर, तज्ज्ञ, विचारवंत, व्याख्याते, कवी, समाजसेवक यांचे वेळोवेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन घडवून आणले व संस्थेशी त्यांचे जिव्हाळ्याचे नाते जोडले व अंबाजोगाई येथील कृषि महाविद्यालय खऱ्या अर्थाने लोकाभिमुख केले. त्यांनी देशी गोवंश, म्हैसवर्ग व शेळी - मेंढी पालनात जे विशेष संशोधन केले असुन राष्ट्रीय स्तरावर शेतकरी, पशुपालक विद्यार्थी यांना मार्गदर्शन करण्यासाठी शेतकरी मेळावे व चर्चासत्रे यात सक्रिय सहभाग नोंदविला आहे. दूरदर्शन, आकाशवाणी, नियतकालिके, दैनिके याद्वारे जनजागृती करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले आहे. डॉ.बाबासाहेब ठोंबरे यांना "जीवनगौरव पुरस्कार" प्राप्त झाल्याबद्दल त्यांचे कुलगुरू मा डॉ. इन्द्र मणि, माजी कुलगुरू मा डॉ. अशोक ढवण, संचालक शिक्षण तथा अधिष्ठाता डॉ.धर्मराज गोखले, कुलसचिव डॉ.धीरजकुमार कदम, माजी कुलसचिव डॉ.दिगंबर चव्हाण, ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा, रमेशराव आडसकर, प्राचार्य डॉ.सोमनाथ रोडे, डॉ.अनिलकुमार भिकाणे, डॉ.हेमंत पाटील, पं.उद्धवबापू आपेगावकर, ज्येष्ठ पत्रकार सुदर्शन रापतवार, वसंतराव मोरे, अॅड.माधव जाधव, अॅड.संतोष पवार, सुप्रसिद्ध लेखक सर नागेश जोंधळे, पत्रकार रणजित डांगे, विनोद पोखरकर, पत्रकार दिलीप अरसूळ, प्रख्यात कवी राजेश रेवले आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर, मित्र, परिवार आणि नातेवाईक यांनी विशेष अभिनंदन केले आहे.
No comments:
Post a Comment