Thursday, April 6, 2023

वनामकृविच्‍या तुळजापुर कृषि विज्ञान केंद्रास माननीय कुलगुरू डॉ इन्‍द्र मणि यांची भेट व पाहणी

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि विज्ञान केंद्र, तुळजापूर येथे दिनांक २ एप्रिल रोजी भेट देऊन पाहणी केली. यावेळी विस्तार शिक्षण संचालक डॉ. देवराव देवसरकर, कृषि महाविद्यालय, उस्मानाबादचे प्राचार्य डॉ. कमलाकर कांबळे, कृषि विज्ञान केंद्राच्या कार्यक्रम समन्वयक प्रा. वर्षा मरवाळीकर, शास्त्रज्ञ डॉ. विजयकुमार जाधव, श्री. लतिॅफ चौधरी आदी उपस्थित होते.

मार्गदर्शनात कुलगुरू मा डॉ. इन्‍द्र मणि म्हणाले की, कृषि विद्यापीठाच्या परभणी येथील प्रक्षेत्रावर ५०० एकर पडीक जमिनीची सुधारणा करून येत्या वर्षात खरीप व रबी हंगामात विविध पिकांच्‍या वाणाचे बीजोत्‍पादन  कार्यक्रम हाती घेण्‍यात येणार असुन यामुळे मराठवाडयातील शेतक-यांना बियाणे उपलब्ध करून दिले जाणार आहे. याकरिता विद्यापीठ कर्मचारी परिश्रम घेत आहेत. तुळजापुर कृषि विज्ञान केंद्र हे उस्‍मानाबाद भागातील अत्यंत महत्वाचे विस्‍तार केंद्र असून विद्यापीठाचे तंत्रज्ञान विस्‍तारात मोलाचे योगदान राहील.

यावेळी माननीय कुलगुरू यांनी कृषि विज्ञान केंद्राच्या प्रक्षेत्रावर असलेल्या विविध उपक्रमांना भेट देऊन पाहणी केली. यात शेततळे, अंडी उबवणुक एकक, माती व पाणी परीक्षण प्रयोगशाळा, वनस्पती रोग-किड संग्रहालय, भरडधान्य एकक, कुक्कुट पालन एकक आदींची उपक्रमांबाबत कुलगुरू महोदयांनी समाधान व्यक्त केले. भविष्यात शेतक-यांच्या विकासासाठी अशाच प्रकाराचे उपक्रम कृषि विज्ञान केंद्राच्या प्रक्षेत्रावर राबवावीत अशी अपेक्षा व्‍यक्‍त केली. बैठकीचे प्रास्‍ताविकात विस्तार शिक्षण संचालक डॉ. देवराव देवसरकर यांनी कृषि विज्ञान केंद्राच्या प्रगतीचा आढावा घेतला. शास्त्रज्ञ डॉ. विजयकुमार जाधव यांनी सर्वांचे आभार माणले. 

No comments:

Post a Comment