मराठवाडा विभागातील आठही जिल्हयातील खरीप नियोजनाबाबत विभागस्तरीय खरीप हंगामपुर्व आढावा बैठक छत्रपती संभाजीनगर येथे माननीय कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक २९ रोजी संपन्न झाली. बैठकीस वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ इन्द्र मणि, कृषि विभागाचे प्रधान सचिव श्री एकनाथ डवले, कृषि आयुक्त श्री सुनिल चव्हाण, जिल्हाधिकारी श्री अस्तिककुमार पाण्डेय, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री विकास मीना, महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक श्री सचिन कलंत्रे, नियोजन संचालक श्री सुभाष नागरे, फलोत्पादन संचालक श्री कैलास मोते, गुणनियंत्रण संचालक श्री विकास पाटील, विस्तार संचालक श्री दिलीप झेंडे, आत्मा संचालक श्री दशरथ तांबाळे, विभागीय कृषि सहसंचालक डॉ डी एल जाधव, लातुरचे कृषि सहसंचालक श्री साहेबराव दिवेकर आदीसह मराठवाडा विभागातील आठही जिल्हयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
बैठकीत मार्गदर्शनात माननीय कृषि मंत्री मा ना श्री अब्दुल सत्तार यांनी आगामी खरीप हंगामात बियाणे, खते, किटकनाशके आदी निविष्ठा सर्वत्र उपलब्ध राहतील यादृष्टीने काटेकोर नियोजन करावे, तसेच गुणनियंत्रण विभागाने दक्ष राहुन बोगस बियाणे, खतांची विक्री होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश दिले.
यावेळी खरीप हंगामातील पिकांवर गोगलगायीचा होणारा प्रादुर्भाव व उपाययोजना याबाबत विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉ अनंत लाड यांनी सादरीकरणाव्दारे माहिती दिली.
No comments:
Post a Comment