वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत असलेल्या खामगांव येथील कृषी विज्ञान केंद्राची ८ वी वैज्ञानिक सल्लागार समितीची बैठक कुलगुरू मा डॉ इन्द्र मणि यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक १ मार्च रोजी संपन्न झाली. सदर बैठकीस वैज्ञानिक सल्लागार समितीचे सन्माननीय सदस्य, संलग्न विभागाचे अधिकारी, शेतकरी व शेतकरी महिला यांची उपस्थिती होती.
मार्गदर्शनात कुलगुरू मा डॉ इन्द्र मणि म्हणाले की, अनेक शेतकरी बांधव आपआपल्या शेतीत नवनवीन प्रयोग करतात, या प्रगतशील शेतकरी बांधवांचा विद्यापीठाच्या संशोधन व विस्तार कार्यात योगदान घेण्यात येणार आहे. हेच शेतकरी कृषि तंत्रज्ञानाचे दुत बनुन इतर शेतकरी बांधवांना मार्गदर्शन करितील, असे मत त्यांनी व्यक्त केले.
विस्तार शिक्षण संचालक डॉ. डी. बी. देवसरकर यांनी आंतरपिकांचे महत्व सांगून सोयाबीन अधिक तूर, कापूस अधिक तुर फायदेशीर ठरत असुन बीड जिल्हयात तेलबिया पिके व कडधान्य पिकांखालील लागवडीस मोठा वाव असल्याचे म्हणाले.
मान्यवरांचे नुट्रीबास्केट देऊन स्वागत करण्यात करण्यात येऊन आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष २०२३ निमित्त कृषी विज्ञान केंद्र येथे तृणधान्याच्या सेल्फी बोर्ड चे उद्घाटन करण्यात आले तसेच केंद्रातर्फे तयार करण्यात आलेले पौष्टिक तृणधान्य विषयीचे पोस्टरचे मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले. बैठकीत केंद्राचे कार्यक्रम समन्वयक यांनी कृषी विज्ञान केंद्राचे सन २०२२ या वर्षीच्या केलेल्या कार्याचे सादरीकरण केले तसेच विविध शास्त्रज्ञांनी आपआपल्या विषयाचा मागील वर्षी केलेल्या कार्याचा आढावा घेण्यात आला.यावेळी मान्यवरांनी केंद्राच्या कामाची प्रशंसा करून पुढील वर्षी करण्यात येणाऱ्या कामाबद्दल सल्ला दिला.
कृषी
विज्ञान केंद्राने प्रक्षेत्रावर राबवलेले
वेगवेगळ्या तृण धान्याचे पीक संग्रहालय (विविध मिलेट्स ) यांची पाहणी करून कृषी
विज्ञान केंद्रातील पिक संरक्षण किटकशास्त्र या विभागामार्फत नव्याने चालू
केलेल्या रेशीम किटक संगोपण युनिटचे उद्घाटन करण्यात आले त्याचबरोबर केंद्राच्या
प्रक्षेत्रावर असलेल्या शेळीपालन युनिट, आदर्श
पोषण बागेस भेट देऊन पाहणी केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रम समन्वयक प्रा.
दिप्ती पाटगावकर यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. हनुमान गरुड यांनी केले तर आभार डॉ
तूकेश सुरपाम यांनी मानले. समितीची बैठक यशस्वीतेकरिता कृषी विज्ञान केंद्रातील अधिकारी,
कर्मचारी
यांनी परिश्रम घेतले.
No comments:
Post a Comment