Tuesday, March 14, 2023

वनामकृवितील औरंगाबाद येथील हिमायतबाग येथील फळ संशोधन केंद्रात वैज्ञानिक भवन नुतनीकरणाचे उदघाटन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या हिमायतबाग येथील फळसंशोधन केंद्रातील वैज्ञानिक भवन व शेतकरी संवाद केंद्राच्‍या वास्‍तुचे नुतनीकरणाचे उदघाटन दिनांक ११ मार्च रोजी राज्‍याचे माननीय कृषी मंत्री मा ना श्री अब्‍दुल सत्‍तार यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. यावेळी कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि, फळ संशोधन केंद्रोच प्रभारी डॉ एम बी पाटील, विद्यापीठ अभियंता श्री दीपक कशाळकर, भरत राजपुत आदींची प्रमुख उपस्थिती होती.

 यावेळी मार्गदर्शनात कृषी मंत्री म्हणाले की, परभणी कृषि विद्यापीठाचे संशोधन चांगले आहे ते अधिक गतिमान करण्यासाठी निधी देण्यात येईल, छत्रपती संभाजीनगर येथे विद्यापीठाचे उपकेंद्र स्थापन करण्यासाठी प्रयत्न केले जातील. या भागातील शेतकऱ्यांना परभणी येथे जाण्याची गरज भासू देणार नाही. नुकताच सादर करण्यात आलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात कृषीसाठी मोठ्या प्रमाणात निधीची व्यवस्था करण्यात आली आहे. कृषी विभागाच्या योजना आणि विद्यापीठाचे संशोधन हे या विभागातील शेतकऱ्यांना पोहचविण्‍यासाठी प्रयत्न केले जातील.

कार्यक्रमास सहयोगी संचालक संशोधन डॉ एस बी पवार, प्राचार्य कृषी महाविद्यालय बदनापूर डॉ राकेश अहिरे, प्रभारी अधिकारी डॉ दीपक पाटील, डॉ संजय पाटील, कार्यक्रम समन्वयक डॉ किशोर झाडे, डॉ सचिन सोमवंशी, डॉ भगवानराव कापसे, द्वारकाभाऊ पाथरीकर, अशोक सूर्यवंशी आदीसह विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी मोठया संख्‍येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषीतंत्र विद्यालयाचे प्राचार्य डॉ किरण जाधव यांनी केले तर आभार डॉ आर व्ही नईनवाड यांनी मानले.


No comments:

Post a Comment