Wednesday, March 8, 2023

बेटी बचाओ, बेटी बढाओ और बेटी पढाओ याकरिता सर्वांनी प्रयत्‍न केले पाहिजे..... कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि

वनामकृविच्‍या तुळजापुर कृषी वि़ज्ञान केंद्रात जागतिक महिला दिन साजरा


महिलांना स्वतःच्या पायावर उभे करणे अत्यंत जरूरी असून त्यामुळे अधिक सक्षम होऊन, त्यांच्यावर होणा-या अत्याचारात घट होईल. शास्त्रामध्ये लिहीले आहे की, जिथे स्त्रिची सन्‍मान केला जातो, तिथे सर्व सुख संपन्नता नांदते. समाजाने महिलांना सन्मानासोबत पुरूषांच्‍या दर्जा प्रमाणे महिलांनाही दर्जा दिला गेला पाहिजे. समाजातील यशस्‍वी महिलांचा सन्मान करणे जरूरीचे आहे. महिलांनी बेटी बचाओ, बेटी बढाओ और बेटी पढाओे या करिता सर्वांनी प्रयत्‍न केला पाहिजे, असे प्रतिपादन कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि यांनी व्‍यक्‍त केले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्‍या तुळजापुर येथील कृषि विज्ञान केंद्राच्‍या वतीने  दिनांक ८ मार्च रोजी तंत्रज्ञान महोत्सव २०२३ च्या ‘महिला मेळाव्यात धाराशीव जिल्हयातील महिलांना उद्देशुन ते दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून बोलत होते. व्‍यासपीठावर विस्तार शिक्षण संचालक डॉ देवराव देवसरकर, लातुर कृषि महाविद्यालयोच सहयोगी अधिष्‍ठाता डॉ. बाबासाहेब ठोंबरे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री. महेश तिर्थकर, आत्माचे प्रकल्प उपसंचालक श्री. बालाजी किरवले, अंबाजोगाईचे कृषि विद्यावेत्ता डॉ वसंत सुर्यवंशी. उमेदचे श्री. विवेक पवार, केंद्राच्या कार्यक्रम समन्वयक श्रीमती वर्षा मरवाळीकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.

कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि पुढे म्हणाले की, कृषी विज्ञान केंद्रांचे कृषि विस्‍तार कार्यात मोलाचे योगदान असून महिलांनी कृषी विज्ञान केंद्राकडुन तांत्रिक महिती घेउन अवलंब करावा. कृषि विज्ञान केंद्रांनी महिलांना त्यांच्या व त्‍यांच्या कुटुंबियांच्या स्वास्थ्यासाठी मार्गदर्शन करावे. कौटुबिंक स्वास्थ्यव्‍यवस्‍थापन अत्यंत महत्वाचे आहे. सल्‍ला त्‍यांनी दिला. सध्याच्या काळात महिलांनी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करण्‍याचा सल्‍ला त्‍यांनी दिला. 

मार्गदर्शनात डॉ. देवराव देवसरकर म्हणाले की, अन्नधान्य, फळे व भाजीपाला यांची होणारी नासाडी टाळण्यासाठी प्रक्रिया उद्योगांना प्रोत्साहन देण्यात येत असून त्यात महिलांनी सक्रीय सहभाग नोंदवावा. महिलांनी लघुउद्योगाकडे वळावे. शेतीतील उत्पादन खर्च कमी करण्यात महिला हातभार लावु शकतात. स्वतःसाठी लागणारे बियाणे निवड पद्धतीने स्वतः तयार करावे, जेणेकरून उत्पादन खर्च तर कमी होईलच चांगल्‍या बियाणामुळे उत्पादनात वाढ होऊ शकेल. महिलांनी रोजच्या आहारात ज्वारी-बाजरी चा वापर जास्तीत जास्त करावा, ज्यामुळे जिल्हयातील ज्वारीचे क्षेत्रफळ वाढण्यास मदत होईल.

भाषणात श्री महेश तिर्थकार म्हणाले की, महिलांनी आपल्या व आपल्या कुटुंबाच्या पोषणतेकडे लक्ष देणे जरूरीचे आहे. कुटुबाचे आरोग्य जपन्‍याची जबाबदारी महिलांना पार पाडवी लागते. कृषी विभागाच्या महिलांकरीता विविध योजना कार्यरत असून त्‍याचा लाभ घेण्‍याचे आवाहन त्‍यांनी केले. डॉ बाबासाहेब ठोंबरे म्हणाले की, ज्यांना आई कळाली ते जिजाउचे शिवबा झाले, ज्यांना बहीण कळाली ते मुक्ताइचे ज्ञानेश्‍वर झाले, ज्यांना पत्नी कळाली ते सीतेचे राम झाले आणि ज्यांना मैत्री कळाली ते राधेचे श्‍याम झाले. भारतात सर्वप्रथम १९४३ मध्ये महिलादिन साजरा करण्यात आला. भारतात मातृत्व भाव सदैव जपला जातो. महिलांनी आपले स्वतःचे अस्तित्व स्वतःच निर्माण करणे गरजेचे असून सध्या महिलाच आपले अस्तित्व नाकारतांना दिसतात.

मेळाव्यात कृषी विज्ञान केंद्र, तुळजापूर सोबत जिल्हयात काम करणा-या विविध सहयोगी विभागांच्या महिलांचा सन्मान चिन्ह, प्रशस्तीपत्र, लिंबू रोपे व वनामकृवि दिनदर्शिका देवून मान्‍यवरांच्‍या हस्‍ते सन्मान करण्यात आला. सन २०२२-२३ मध्ये कृषी विज्ञान केंद्रातर्फे आयोजीत विविध प्रशिक्षण कार्यक्रमातील महिलांना प्रतिनिधीक स्वरूपात प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. सोबतच या प्रषिक्षणार्थी महिलांनी त्यांचे मनोगत देखील व्यक्त केले.

प्रास्ताविक वर्षा मरवाळीकर यांनी केले. सुत्रसंचालन डॉ. विजयकुमार जाधव यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. श्रीकृष्‍ण झगडे यांनी केले. मेळावा यशस्वीतेसाठी डॉ भगवान आरबाड, डॉ दर्शना भुजबळ, सखाराम मस्के, जगदेव हिवराळे, डॉ नकुल हरवाडीकर, विलास बोनगे, षिवराज रूपनर, बालाजी कदम, शाम शिंदे आदिंनी प्रयत्न केले.


No comments:

Post a Comment