Thursday, September 1, 2022

मौजे तादलापुर ता. उदगीर जि. लातूर येथील शेतकरी बांधवांशी संवाद

"माझा एक दिवस माझ्या बळीराजा साठी" अभियान अंतर्गत मौजे तादलापुर ता. उदगीर जि. लातूर येथे शेतकरी यांचेशी संवाद साधून त्यांना शासनाच्या विविध योजनांची तसेच शेतिविषयक मार्गदर्शन करण्यात आले. यामध्ये पीक विमा योजनाक्रॉपसॅप अंतर्गत यलो मोझाकखोडमाशी व इतर किडींची ओळख व व्यवस्थापनरुंद वरंबा सरी वर सोयाबीन चे प्रात्यक्षिक पाहणी व व्यवस्थापनशेती पूरक जोड़धंदा - दुग्धव्यवसाय इत्यादी विषयी माहिती देण्यात आली. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री दत्तात्रय गावसानेप्राचार्य डॉ बाबासाहेब ठोंबरेविस्तार कृषि विद्यावेत्ता प्रा अरुण गुट्टे आदी उपस्थित होते. उपक्रमांर्गत साधारणत: १०० पेक्षा शेतकरी बांधवाशी संवाद साधला.


सौजन्‍य : विस्तार कृषि विद्यावेत्ता लातूर

No comments:

Post a Comment