Sunday, September 18, 2022

मौजे खंडाळा तालुका वैजापुर येथील शेतकरी बांधवाच्‍या शेतातील विद्यापीठ विकसित बाजरी एएचबी-१२६९

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्‍या औरंगाबाद येथील राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पातील अखिल भारतीय समन्वय प्रकल्पामार्फत इक्रीसॅट संस्था व जोधपूर येथील अखिल भारतीय बाजरी समनव्यक प्रकल्प यांच्या संयुक्‍त विद्यामाने राष्‍ट्रीय स्तरावर जैवसंपृक्त बाजरी संकरित वाण एएचबी-१२०० व एएचबी-१२६९ विकसित केलेले आहेत. या वाणामध्ये लोहाचे प्रमाण ८७ पीपीएम व जस्तचे प्रमाण ३७ पीपीएम आहे त्याच प्रमणे एएचबी-१२६९ वाण मध्ये लोह ९१ पीपीएम व जस्त ४३ पीपीएम आहे. या वाणाचे प्रात्‍याक्षिके वैजापुर तालुक्‍यातील खंडाळा येथे श्री सुभाषराव सुर्यवंशी, पांडुरंग सुर्यवंशी आदीसह इतर शेतकरी बांधवाना देण्यात आले होते. सदरिल कार्यक्रम माननीय कुलगुरू डॉ इन्‍द्र मणि व संशोधन संचालक डॉ  दत्तप्रसाद वासकर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे. संयुक्त राष्ट्र संघटनेत संघटनेने व भारत सरकारने २०२३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून साजरे करण्याचे आवाहन केले आहे. त्या अनुषंगाने पीक पद्धतीत व आहारात बाजरी पिकाचा समावेश करून बाजरी पिकाविषयी शेतकऱ्यांना महत्त्व पटवून देण्याच्या दृष्टीने व मूल्यवर्धनाच्या दृष्टीने विद्यापीठाच्या वतीने प्रयत्न चालू आहेत. त्यामुळे शेतकरी त्यामुळे शेतकरी बंधूंना अन्नसुरक्षा बरोबरच पौष्टिक सुरक्षा चे महत्व पटवून या पिकांचा पीक पद्धतीत व आहारात समावेश करण्याच्या दृष्टीने जनजागृती चालू आहे, अशी माहिती सहयोगी संचालक डॉ सुर्यकांत पवार यांनी दिली.

No comments:

Post a Comment