वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ कर्मचारी सहकारी पतसंस्था म. परभणी ची ४५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक १८ सप्टेंबर रोजी परभणी कृषि महाविद्यालयाच्या सभागृह संपन्न झाली. सभेस प्रमुख पाहूणे म्हणून कुलगुरू डॉ इन्द्र मणि, परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष माननीय आमदार श्री. सुरेशरावजी वरपुडकर, माननीय आमदार डॉ राहुल पाटील, परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष प्रा. रामभाउ घाटगे, शिवसेनेचे युवा नेते मा. श्री. संग्राम जामकर आदी उपस्थित होते तर सभेचे अध्यक्षपद पतसंस्थेचे अध्यक्ष डॉ पी. यु. घाटगे यांनी भूषवले. सभेस पतसंस्थेचे उपाध्यक्ष डॉ. शिवाजी म्हेत्रे, सचिव श्री. सुनिल खताळ, संचालक डॉ. राजेश कदम, डॉ महेश देशमुख, डॉ शामराव घुगे, श्री.जी.बी. उबाळे, श्री. राम खोबे, श्री. सुरेश हिवराळे, श्री. भारत उबाळे, श्री. बालाजी कोकणे, श्री. रावजी खरोडे, श्री. कृष्णा जावळे, श्री. किशोर शिंदे, श्रीमती अर्चना घनवट, सौ. सुधा सालगोडे आदीसह सस्थेचे सन्माणनीय सभासद मोठया प्रमाणात उपस्थित होते.
प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते संस्थेच्या सभासदांच्या पाल्यांचा
सत्कार करण्यात आला. सभेत मृत्यु पावलेल्या सभासदांना स्तब्धता
पाळून श्रद्धाजली अर्पण करण्यात आली. सभेत ४५ वा वार्षिक
अहवाल वाचन पतसंस्थेचे चेअरमन तथा सभेचे अध्यक्ष डॉ पी. यु. घाटगे यांनी केले
तसेच मागील सभेचे प्रोसेडिंग संस्थेचे सचिव श्री. अे. डी. काळे यांनी वाचन केले. सभेत
सभासदांच्या प्रश्नांचे समाधान करण्यात आले आणि महत्वपुर्ण
निर्णय घेण्यात आले, यात दिर्घमुदती कर्ज वाटप मर्यादा
सर्व टप्प्यांमध्ये वाढवून चार लाखापासुन ते वीस लाखापर्यंत करणे. सर्व जमा ठेवीवरील व्याज
दर एक टक्का कमी करणे. संस्थेला झालेल्या सन. २०२१-२०२२ वर्षाच्या नफ्यातून १२ टक्के लाभांष वाटप तथा भेट वस्तु म्हणून बॅगेचे वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला.
No comments:
Post a Comment