Tuesday, August 15, 2023

नांदेड जिल्‍हयातील विविध गांवाना माननीय कुलगुरू यांची भेट व मार्गदर्शन

स्‍वातंत्र दिनाचे औजित्‍य साधुन दिनांक १५ ऑगस्‍ट रोजी नांदेड जिल्‍हयातील धर्माबाद, कोठांळा, शिंदीगांव, हुडांपत्‍ती गुलतीगांव येथे वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि यांनी भेट देऊन उपस्थित शेतकरी बांधवांना मार्गदर्शन केले. शेतीत ड्रोन चा वापर, मानवी आहारात भरड धान्‍याचे महत्‍व यावर मार्गदर्शन केले. यावेळी कापुस विशेषज्ञ डॉ के एस बेग, उपकुलसचिव डॉ आर व्‍ही देशमुख, बियाणे तज्ञ डॉ एस एन देवकुळे, श्री दिलिप जाधव, कृषि विभागातील अधिकारी आदीसह शेतकरी बांधव मोठया संख्‍येने उपस्थित होते.




No comments:

Post a Comment