Sunday, April 30, 2023

मन की बात कार्यक्रमाचा १०० वा भाग प्रसारित, कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि यांनी दिली परभणी आकाशवाणी केंद्रास भेट

पंतप्रधान मा श्री नरेंद्र मोदी यांचा रेडिओ कार्यक्रम ‘मन की बात’ चा दिनांक ३० एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता १०० वा भाग प्रसारित झाला. या ऐतिहासिक क्षणासाठी देशभरात जय्यत तयारी करण्यात आली होती. यानिमित्‍त वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि यांनी परभणी आकाशवाणी केंद्रास भेट देऊन आकाशवाणीच्‍या अधिकारी व कर्मचारी यांचे अभिनंदन केले. आकाशवाणीचे देशातील कृषि विकासात मोलाचे योगदान असल्‍याचे म्‍हणाले. यावेळी आकाशवाणी परभणीचे प्रबंधक श्री सतीश जोशी व सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.







Saturday, April 29, 2023

विभागस्‍तरीय खरीप हंगामपुर्व आढावा बैठक संपन्‍न





 मराठवाडा विभागातील आठही जिल्‍हयातील खरीप नियोजनाबाबत विभागस्‍तरीय खरीप हंगामपुर्व आढावा बैठक छत्रपती संभाजीनगर येथे माननीय कृषिमंत्री अब्‍दुल सत्‍तार यांच्‍या अध्‍यक्षतेखाली दिनांक २९ रोजी संपन्‍न झाली. बैठकीस वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि, कृषि विभागाचे प्रधान सचिव श्री एकनाथ डवले, कृषि आयुक्‍त श्री सुनिल चव्‍हाण, जिल्‍हाधिकारी श्री अस्तिककुमार पाण्‍डेय, जिल्‍हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्री विकास मीना, महाबीजचे व्‍यवस्‍थापकीय संचालक श्री सचिन कलंत्रे, नियोजन संचालक श्री सुभाष नागरे, फलोत्‍पादन संचालक श्री कैलास मोते, गुणनियंत्रण संचालक श्री विकास पाटील, विस्‍तार संचालक श्री दिलीप झेंडे, आत्‍मा संचालक श्री दशरथ तांबाळे, विभागीय कृषि सहसंचालक डॉ डी एल जाधव, लातुरचे कृषि सहसंचालक श्री साहेबराव दिवेकर आदीसह मराठवाडा विभागातील आठही जिल्‍हयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

बैठकीत मार्गदर्शनात माननीय कृषि मंत्री मा ना श्री अब्‍दुल सत्‍तार यांनी  आगामी खरीप हंगामात बियाणे, खते, किटकनाशके आदी निविष्‍ठा सर्वत्र उपलब्‍ध राहतील यादृष्‍टीने काटेकोर नियोजन करावे, तसेच गुणनियंत्रण विभागाने दक्ष राहुन बोगस बियाणे, खतांची विक्री होणार नाही याची दक्षता घ्‍यावी, असे निर्देश दिले.

यावेळी खरीप हंगामातील पिकांवर गोगलगायीचा होणारा प्रादुर्भाव व उपाययोजना याबाबत विद्यापीठाचे शास्‍त्रज्ञ डॉ अनंत लाड यांनी सादरीकरणाव्‍दारे माहिती दिली. 


Sunday, April 16, 2023

कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि यांची वैजापुर येथील बाजरी संशोधन केंद्रास भेट व पाहणी

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. इन्द्र मणि यांनी दिनांक १६ एप्रिल रोजी बाजरी संशोधन केंद्र, वैजापुर प्रक्षेञास भेट देऊन प्रक्षेञावर घेण्यात आलेल्या १० एकर क्षेञातील बाजरी बीजोत्पादन पिकाची (CMS-98222 A x AUBI-1101R) पाहणी केली. २०२३ हे वर्ष अंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष असल्या कारणाने तृणधान्याचे व विषेशतः बाजरी पिकाचे आहारातील महत्व यविषयी मा.कुलगुरु महोदयांनी अनमोल मार्गदर्शन केले. याप्रसंगी वैजापुर तालुक्यातील खंडाळा, लोणी ई.गावचे बाजरी उत्पादक शेतकरी उपस्थित होते. रा.कृ.सं प्र. औरंगाबाद येथून संशोधित झालेली संकरीत बाजरी एएचबी-१२०० या वाणाचे प्रक्षेञावर बीजोत्पादन घेत असताने मा.कुलगुरु महोदयांनी शेतक-यांनीही आपल्या शेतावर बीजोत्पादन घेऊन आपला आर्थिकस्तर उंचवावा असे शेतक-यांना आवाहन केले. मोठ्या प्रमाणात बाजरी पिकाखालील क्षेञ वाढवून उत्पादन घ्यावे व आहारामध्ये मोठ्या प्रमाणात समावेश करुन घ्यावा. भेटी प्रसंगी मा. कुलगुरु महोदयांनी बांबू पिकाची पाहणी केली व प्रक्षेञावर उत्पादन वाढवून महसूल कसा वाढविता येईल याविषयी मार्गदर्शन केले, प्रक्षेञ बळकटीकरणाविषयी मार्गदर्शन केले. याप्रसंगी डॉ. सुर्यकांत पवार, सहयोगी संचालक संशोधन रा.कृ.सं.प्र.औरंगाबाद, डॉ दिलीप हिंगोले, वनस्पती रोग शास्रज्ञ व डॉ.बागडे सर, सहाय्यक पैदासकार आदीसह बाजरी उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

Tuesday, April 11, 2023

नांदेड येथील आंबेडकरी मिशनाचे मा श्री दिपक कदम यांचे व्‍याख्‍यान

 





भारतरत्‍न डॉ बाबासाहेब आंबेडकर व महात्‍मा फुले यांच्‍या जयंतीनिमित्‍त परभणी कृषि महाविद्यालयाच्‍या वतीने दिनांक ११ एप्रिल रोजी नांदेड येथील आंबेडकरी मिशनाचे मा श्री दिपक कदम यांनी व्‍याख्‍यान दिले. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि हे होते तर व्‍यासपीठावर शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, प्राचार्य डॉ सय्यद ईस्‍माईल, प्राचार्य डॉ जी एम वाघमारे, डॉ रावसाहेब भाग्‍यवंत, डॉ रणजित चव्‍हाण, डॉ पी आर झंवर आदींची उपस्थिती होती.


Monday, April 10, 2023

श्री वैभव राऊत यांनी बॅकिंग स्‍पर्धा परिक्षाबाबत मार्गदर्शन

 

भारतरत्‍न डॉ बाबासाहेब आंबेडकर व महात्‍मा फुले यांच्‍या जयंतीनिमित्‍त परभणी कृषि महाविद्यालयाच्‍या वतीने दिनांक १० एप्रिल रोजी श्री वैभव राऊत यांनी व्‍याख्‍यान दिले. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि हे होते तर व्‍यासपीठावर शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, प्राचार्य डॉ सय्यद ईस्‍माईल, डॉ रावसाहेब भाग्‍यवंत, डॉ रणजित चव्‍हाण, डॉ पी आर झंवर आदींची उपस्थिती होती. श्री वैभव राऊत यांनी बॅकिंग स्‍पर्धा परिक्षाबाबत मार्गदर्शन केले.





Thursday, April 6, 2023

वनामकृविच्‍या तुळजापुर कृषि विज्ञान केंद्रास माननीय कुलगुरू डॉ इन्‍द्र मणि यांची भेट व पाहणी

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि विज्ञान केंद्र, तुळजापूर येथे दिनांक २ एप्रिल रोजी भेट देऊन पाहणी केली. यावेळी विस्तार शिक्षण संचालक डॉ. देवराव देवसरकर, कृषि महाविद्यालय, उस्मानाबादचे प्राचार्य डॉ. कमलाकर कांबळे, कृषि विज्ञान केंद्राच्या कार्यक्रम समन्वयक प्रा. वर्षा मरवाळीकर, शास्त्रज्ञ डॉ. विजयकुमार जाधव, श्री. लतिॅफ चौधरी आदी उपस्थित होते.

मार्गदर्शनात कुलगुरू मा डॉ. इन्‍द्र मणि म्हणाले की, कृषि विद्यापीठाच्या परभणी येथील प्रक्षेत्रावर ५०० एकर पडीक जमिनीची सुधारणा करून येत्या वर्षात खरीप व रबी हंगामात विविध पिकांच्‍या वाणाचे बीजोत्‍पादन  कार्यक्रम हाती घेण्‍यात येणार असुन यामुळे मराठवाडयातील शेतक-यांना बियाणे उपलब्ध करून दिले जाणार आहे. याकरिता विद्यापीठ कर्मचारी परिश्रम घेत आहेत. तुळजापुर कृषि विज्ञान केंद्र हे उस्‍मानाबाद भागातील अत्यंत महत्वाचे विस्‍तार केंद्र असून विद्यापीठाचे तंत्रज्ञान विस्‍तारात मोलाचे योगदान राहील.

यावेळी माननीय कुलगुरू यांनी कृषि विज्ञान केंद्राच्या प्रक्षेत्रावर असलेल्या विविध उपक्रमांना भेट देऊन पाहणी केली. यात शेततळे, अंडी उबवणुक एकक, माती व पाणी परीक्षण प्रयोगशाळा, वनस्पती रोग-किड संग्रहालय, भरडधान्य एकक, कुक्कुट पालन एकक आदींची उपक्रमांबाबत कुलगुरू महोदयांनी समाधान व्यक्त केले. भविष्यात शेतक-यांच्या विकासासाठी अशाच प्रकाराचे उपक्रम कृषि विज्ञान केंद्राच्या प्रक्षेत्रावर राबवावीत अशी अपेक्षा व्‍यक्‍त केली. बैठकीचे प्रास्‍ताविकात विस्तार शिक्षण संचालक डॉ. देवराव देवसरकर यांनी कृषि विज्ञान केंद्राच्या प्रगतीचा आढावा घेतला. शास्त्रज्ञ डॉ. विजयकुमार जाधव यांनी सर्वांचे आभार माणले. 

Saturday, April 1, 2023

प्राचार्य डॉ.बाबासाहेब ठोंबरे 'जीवनगौरव' पुरस्काराने सन्मानित

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्‍या लातुर येथील कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्‍ठाता तथा प्राचार्य डॉ बाबासाहेब ठोंबरे यांना चंदीगड (पंजाब) येथील भारतीय कृषि व उद्यान संशोधन विकास संस्थेच्या वतीने "जीवनगौरव पुरस्काराने" सन्मानित करण्यात आले. प्राचार्य डॉ.बाबासाहेब ठोंबरे यांच्या कृषि, सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक व पर्यावरण संवर्धन यासारख्या विविध क्षेत्रात त्यांनी राबवलेल्या अभिनव संकल्पना व विविध उपक्रमांची तसेच उल्लेखनीय सृजनशील कार्याची दखल घेऊन सदर पुरस्‍काराने सन्‍मानित करण्‍यात आले.

कृषि महाविद्यालय अंबाजोगाई येथे सहयोगी अधिष्ठाता या पदावर कार्यरत असताना त्यांनी अत्यंत उल्लेखनीय असे कार्य केले आहे. कृषि विद्यापीठाच्या शिक्षण, संशोधन आणि विस्तार कार्याबरोबरच त्यांनी महाविद्यालयात राबविलेल्या विविध उपक्रमांतर्गत वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धन, अटल घनवन वृक्ष लागवड, योगा पार्क इत्यादी विविध संकल्पना त्यांनी सर्वांना सोबत घेऊन महाविद्यालय व महाविद्यालयाच्या परिसरात राबविल्या. अत्यंत अल्पावधीत एकूण २६ हजारांहून अधिक विविध प्रजातींच्या वृक्षरोपांची लागवड करून त्यांचे संवर्धन केले आहे. त्याचबरोबर कृषि महाविद्यालयासमोर अत्यंत देखणे, नयनरम्य आणि रमणीय (गार्डन) बगीचा निर्माण करून महाविद्यालयाची शोभा वृद्धिंगत केली आहे. संस्थेशी विविध क्षेत्रातील मान्यवर, तज्ज्ञ, विचारवंत, व्याख्याते, कवी, समाजसेवक यांचे वेळोवेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन घडवून आणले व संस्थेशी त्यांचे जिव्हाळ्याचे नाते जोडले व अंबाजोगाई येथील कृषि महाविद्यालय खऱ्या अर्थाने लोकाभिमुख केले. त्यांनी देशी गोवंश, म्हैसवर्ग व शेळी - मेंढी पालनात जे विशेष संशोधन केले असुन राष्ट्रीय स्तरावर शेतकरी, पशुपालक विद्यार्थी यांना मार्गदर्शन करण्यासाठी शेतकरी मेळावे व चर्चासत्रे यात सक्रिय सहभाग नोंदविला आहे. दूरदर्शन, आकाशवाणी, नियतकालिके, दैनिके याद्वारे जनजागृती करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले आहे. डॉ.बाबासाहेब ठोंबरे यांना "जीवनगौरव पुरस्कार" प्राप्त झाल्याबद्दल त्यांचे कुलगुरू मा डॉ. इन्‍द्र मणि, माजी कुलगुरू मा डॉ. अशोक ढवण, संचालक शिक्षण तथा अधिष्ठाता डॉ.धर्मराज गोखले, कुलसचिव डॉ.धीरजकुमार कदम, माजी कुलसचिव डॉ.दिगंबर चव्हाण, ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा, रमेशराव आडसकर, प्राचार्य डॉ.सोमनाथ रोडे, डॉ.अनिलकुमार भिकाणे, डॉ.हेमंत पाटील, पं.उद्धवबापू आपेगावकर, ज्येष्ठ पत्रकार सुदर्शन रापतवार, वसंतराव मोरे, अॅड.माधव जाधव, अॅड.संतोष पवार, सुप्रसिद्ध लेखक सर नागेश जोंधळे, पत्रकार रणजित डांगे, विनोद पोखरकर, पत्रकार दिलीप अरसूळ, प्रख्यात कवी राजेश रेवले आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर, मित्र, परिवार आणि नातेवाईक यांनी विशेष अभिनंदन केले आहे.