Thursday, March 30, 2023

मौजे कारेगाव येथील कृषिभुषन श्री सोपानराव अवचार यांच्‍या मौजे पिंगळी येथील शेतीत ड्रोन फवारणी प्रात्‍यक्षिक

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माननीय कुलगुरू मा डॉ  इन्‍द्र मणि यांच्‍या मार्गदर्शनानुसार मौजे कारेगाव येथील कृषिभुषन श्री सोपानराव अवचार यांच्‍या मौजे पिंगळी येथील शेतीत ड्रोन फवारणी प्रात्‍यक्षिक





Saturday, March 18, 2023

VNMKV Parbhani win fine arts champion trophy in All India ICAR Youth Festival at Bangalore

VNMKV, Parbhani team win fine arts champion trophy in ICAR - AgriUnifest organized by Bangalore Agricultural University during 16-20 March, 2023.More than 2500 talented students from 60 SAUs/Deemed Universities/Central Universities have participated, showcasing their skills in 18 events under 5 disciplines (Music, Dance, Literature, Theatre, and Fine Arts). 

Tuesday, March 14, 2023

वनामकृवितील औरंगाबाद येथील हिमायतबाग येथील फळ संशोधन केंद्रात वैज्ञानिक भवन नुतनीकरणाचे उदघाटन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या हिमायतबाग येथील फळसंशोधन केंद्रातील वैज्ञानिक भवन व शेतकरी संवाद केंद्राच्‍या वास्‍तुचे नुतनीकरणाचे उदघाटन दिनांक ११ मार्च रोजी राज्‍याचे माननीय कृषी मंत्री मा ना श्री अब्‍दुल सत्‍तार यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. यावेळी कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि, फळ संशोधन केंद्रोच प्रभारी डॉ एम बी पाटील, विद्यापीठ अभियंता श्री दीपक कशाळकर, भरत राजपुत आदींची प्रमुख उपस्थिती होती.

 यावेळी मार्गदर्शनात कृषी मंत्री म्हणाले की, परभणी कृषि विद्यापीठाचे संशोधन चांगले आहे ते अधिक गतिमान करण्यासाठी निधी देण्यात येईल, छत्रपती संभाजीनगर येथे विद्यापीठाचे उपकेंद्र स्थापन करण्यासाठी प्रयत्न केले जातील. या भागातील शेतकऱ्यांना परभणी येथे जाण्याची गरज भासू देणार नाही. नुकताच सादर करण्यात आलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात कृषीसाठी मोठ्या प्रमाणात निधीची व्यवस्था करण्यात आली आहे. कृषी विभागाच्या योजना आणि विद्यापीठाचे संशोधन हे या विभागातील शेतकऱ्यांना पोहचविण्‍यासाठी प्रयत्न केले जातील.

कार्यक्रमास सहयोगी संचालक संशोधन डॉ एस बी पवार, प्राचार्य कृषी महाविद्यालय बदनापूर डॉ राकेश अहिरे, प्रभारी अधिकारी डॉ दीपक पाटील, डॉ संजय पाटील, कार्यक्रम समन्वयक डॉ किशोर झाडे, डॉ सचिन सोमवंशी, डॉ भगवानराव कापसे, द्वारकाभाऊ पाथरीकर, अशोक सूर्यवंशी आदीसह विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी मोठया संख्‍येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषीतंत्र विद्यालयाचे प्राचार्य डॉ किरण जाधव यांनी केले तर आभार डॉ आर व्ही नईनवाड यांनी मानले.


Monday, March 13, 2023

Hon’ble VC, VNMKV, Parbhani attended & delivered a Keynote Address in the National Conference at NAARM

Dr. Indra Mani, Hon’ble VC, VNMKV, Parbhani attended and delivered a Keynote Address in the National Conference on ‘Policy Development & Implementation Strategies for Academic-Industry-Government Linkages for Agricultural Higher Education in India organised during 12-13, 2003 at ICAR-NAARM, Rajendranagar, Hyderabad.




Sunday, March 12, 2023

वनामकृवि विकसित ज्‍वारीचे वाण परभणी शक्‍ती



पानी फाउंडेशनव्‍दारे वनामकृवि शास्‍त्रज्ञांचा सन्‍मान




पानी फाउंडेशनव्‍दारे २०२२ च्‍या खरीप व रब्‍बी हंगामात आयोजित केलेल्‍या डिजिटल शेतीशाळेत वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील शास्‍त्रज्ञांनी विषय तज्ञ म्‍हणुन सहभाग घेऊन शेतकरी बांधवांना मोलाचे मार्गदर्शन केले, त्‍याबाबत पानी फाउंडेशनच्‍या वतीने वनामकृवि शास्‍त्रज्ञाचा सन्‍मान उपमुख्‍यमंत्री मा ना श्री देवेंद्रजी फडणवीस, पानी फाउंडेशनचे प्रसिध्‍द सिने अभिनेते श्री आमिर खान, श्रीमती किरणराव यांच्‍या हस्‍ते दिनांक १२ मार्च रोजी करण्‍यात आला.  



Wednesday, March 8, 2023

बेटी बचाओ, बेटी बढाओ और बेटी पढाओ याकरिता सर्वांनी प्रयत्‍न केले पाहिजे..... कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि

वनामकृविच्‍या तुळजापुर कृषी वि़ज्ञान केंद्रात जागतिक महिला दिन साजरा


महिलांना स्वतःच्या पायावर उभे करणे अत्यंत जरूरी असून त्यामुळे अधिक सक्षम होऊन, त्यांच्यावर होणा-या अत्याचारात घट होईल. शास्त्रामध्ये लिहीले आहे की, जिथे स्त्रिची सन्‍मान केला जातो, तिथे सर्व सुख संपन्नता नांदते. समाजाने महिलांना सन्मानासोबत पुरूषांच्‍या दर्जा प्रमाणे महिलांनाही दर्जा दिला गेला पाहिजे. समाजातील यशस्‍वी महिलांचा सन्मान करणे जरूरीचे आहे. महिलांनी बेटी बचाओ, बेटी बढाओ और बेटी पढाओे या करिता सर्वांनी प्रयत्‍न केला पाहिजे, असे प्रतिपादन कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि यांनी व्‍यक्‍त केले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्‍या तुळजापुर येथील कृषि विज्ञान केंद्राच्‍या वतीने  दिनांक ८ मार्च रोजी तंत्रज्ञान महोत्सव २०२३ च्या ‘महिला मेळाव्यात धाराशीव जिल्हयातील महिलांना उद्देशुन ते दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून बोलत होते. व्‍यासपीठावर विस्तार शिक्षण संचालक डॉ देवराव देवसरकर, लातुर कृषि महाविद्यालयोच सहयोगी अधिष्‍ठाता डॉ. बाबासाहेब ठोंबरे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री. महेश तिर्थकर, आत्माचे प्रकल्प उपसंचालक श्री. बालाजी किरवले, अंबाजोगाईचे कृषि विद्यावेत्ता डॉ वसंत सुर्यवंशी. उमेदचे श्री. विवेक पवार, केंद्राच्या कार्यक्रम समन्वयक श्रीमती वर्षा मरवाळीकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.

कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि पुढे म्हणाले की, कृषी विज्ञान केंद्रांचे कृषि विस्‍तार कार्यात मोलाचे योगदान असून महिलांनी कृषी विज्ञान केंद्राकडुन तांत्रिक महिती घेउन अवलंब करावा. कृषि विज्ञान केंद्रांनी महिलांना त्यांच्या व त्‍यांच्या कुटुंबियांच्या स्वास्थ्यासाठी मार्गदर्शन करावे. कौटुबिंक स्वास्थ्यव्‍यवस्‍थापन अत्यंत महत्वाचे आहे. सल्‍ला त्‍यांनी दिला. सध्याच्या काळात महिलांनी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करण्‍याचा सल्‍ला त्‍यांनी दिला. 

मार्गदर्शनात डॉ. देवराव देवसरकर म्हणाले की, अन्नधान्य, फळे व भाजीपाला यांची होणारी नासाडी टाळण्यासाठी प्रक्रिया उद्योगांना प्रोत्साहन देण्यात येत असून त्यात महिलांनी सक्रीय सहभाग नोंदवावा. महिलांनी लघुउद्योगाकडे वळावे. शेतीतील उत्पादन खर्च कमी करण्यात महिला हातभार लावु शकतात. स्वतःसाठी लागणारे बियाणे निवड पद्धतीने स्वतः तयार करावे, जेणेकरून उत्पादन खर्च तर कमी होईलच चांगल्‍या बियाणामुळे उत्पादनात वाढ होऊ शकेल. महिलांनी रोजच्या आहारात ज्वारी-बाजरी चा वापर जास्तीत जास्त करावा, ज्यामुळे जिल्हयातील ज्वारीचे क्षेत्रफळ वाढण्यास मदत होईल.

भाषणात श्री महेश तिर्थकार म्हणाले की, महिलांनी आपल्या व आपल्या कुटुंबाच्या पोषणतेकडे लक्ष देणे जरूरीचे आहे. कुटुबाचे आरोग्य जपन्‍याची जबाबदारी महिलांना पार पाडवी लागते. कृषी विभागाच्या महिलांकरीता विविध योजना कार्यरत असून त्‍याचा लाभ घेण्‍याचे आवाहन त्‍यांनी केले. डॉ बाबासाहेब ठोंबरे म्हणाले की, ज्यांना आई कळाली ते जिजाउचे शिवबा झाले, ज्यांना बहीण कळाली ते मुक्ताइचे ज्ञानेश्‍वर झाले, ज्यांना पत्नी कळाली ते सीतेचे राम झाले आणि ज्यांना मैत्री कळाली ते राधेचे श्‍याम झाले. भारतात सर्वप्रथम १९४३ मध्ये महिलादिन साजरा करण्यात आला. भारतात मातृत्व भाव सदैव जपला जातो. महिलांनी आपले स्वतःचे अस्तित्व स्वतःच निर्माण करणे गरजेचे असून सध्या महिलाच आपले अस्तित्व नाकारतांना दिसतात.

मेळाव्यात कृषी विज्ञान केंद्र, तुळजापूर सोबत जिल्हयात काम करणा-या विविध सहयोगी विभागांच्या महिलांचा सन्मान चिन्ह, प्रशस्तीपत्र, लिंबू रोपे व वनामकृवि दिनदर्शिका देवून मान्‍यवरांच्‍या हस्‍ते सन्मान करण्यात आला. सन २०२२-२३ मध्ये कृषी विज्ञान केंद्रातर्फे आयोजीत विविध प्रशिक्षण कार्यक्रमातील महिलांना प्रतिनिधीक स्वरूपात प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. सोबतच या प्रषिक्षणार्थी महिलांनी त्यांचे मनोगत देखील व्यक्त केले.

प्रास्ताविक वर्षा मरवाळीकर यांनी केले. सुत्रसंचालन डॉ. विजयकुमार जाधव यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. श्रीकृष्‍ण झगडे यांनी केले. मेळावा यशस्वीतेसाठी डॉ भगवान आरबाड, डॉ दर्शना भुजबळ, सखाराम मस्के, जगदेव हिवराळे, डॉ नकुल हरवाडीकर, विलास बोनगे, षिवराज रूपनर, बालाजी कदम, शाम शिंदे आदिंनी प्रयत्न केले.


Saturday, March 4, 2023

वनामकृवि विकसित बाजरीचे वाण एएचबी-१२००एफई

मौजे तिडका (ता सोयागाव जि छत्रपती संभाजीनगर) येथील शेतकरी बांधव श्री ईश्‍वर सपकाळ यांच्‍या शेतात वनामकृवि विकसित बाजरीचे वाण एएचबी-१२००एफई (AHB 1200Fe) चांगलाच बहरले आहे. सन २०२३ हे वर्ष जागतिक भरड धान्‍य वर्ष म्‍हणुन साजरे केले जात असुन बाजरी हे भरड धान्‍यातील महत्‍वाचे पिक आहे. बाजरी पिकांमध्‍ये वनामकृवि आणि इक्रीसॅट संस्था हैदराबाद यांच्या संयुक्त विद्यमाने विकसित बायोफोर्टिफाइड - जैवसंवर्धीत बाजरीचे वाण एएचबी-१२००एफई (AHB-1200Fe) आणि एएचबी-१२६९ (AHB-1269) या वाणात इतर सामान्‍य वाणापेक्षा लोह व जस्‍ताचे प्रमाण अधिक आहे. सर्वसामान्‍य वाणात लोहाचे ४५ ते ५० पीपीएम व जस्‍ताचे ३० ते ३५ पीपीएम असते, परंतु एएचबी-१२००एफई वाणात लोहाचे प्रमाण ८८ पीपीएम असुन जस्‍ताचे प्रमाण ४३ पीपीएम आहे तर एएचबी-१२६९ मध्‍ये लोहाचे प्रमाण ६१ पीपीएम व जस्‍ताचे ४३ पीपीएम आहे. यामुळे या वाणाचा मानवी आहारात उपयोग केल्‍यास कुपोषण, रक्‍तक्षय व बालमृत्‍यु टाळण्‍यासाठी होऊ शकतो. तसेच हे वाण गोसावी व करपा रोगास प्रतिकारक आहे. उत्‍पादन क्षमता एकरी १२ क्विंटल आहे.

Thursday, March 2, 2023

कृषी विज्ञान केंद्र खामगावची ८ वी वैज्ञानिक सल्लागार समितीची बैठक संपन्न

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत असलेल्‍या खामगांव येथील कृषी विज्ञान केंद्राची ८ वी वैज्ञानिक सल्लागार समितीची बैठक कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि यांच्‍या अध्‍यक्षतेखाली दिनांक १ मार्च रोजी संपन्न झाली. सदर बैठकीस वैज्ञानिक सल्लागार समितीचे सन्माननीय सदस्य, संलग्न विभागाचे अधिकारी, शेतकरी व शेतकरी महिला यांची उपस्थिती होती.

मार्गदर्शनात कुलगुरू मा डॉ इन्द्र मणि म्‍हणाले की, अनेक शेतकरी बांधव आपआपल्‍या शेतीत नवनवीन प्रयोग क‍रतात, या प्रगतशील शेतकरी बांधवांचा विद्यापीठाच्‍या संशोधन व विस्‍तार कार्यात योगदान घेण्‍यात येणार आहे. हेच शेतकरी कृषि तंत्रज्ञानाचे दुत बनुन इतर शेतकरी बांधवांना मार्गदर्शन करितील, असे मत त्‍यांनी व्‍यक्‍त केले.  

विस्तार शिक्षण संचालक डॉ. डी. बी. देवसरकर यांनी आंतरपिकांचे महत्व सांगून सोयाबीन अधिक तूर, कापूस अधिक तुर फायदेशीर ठरत असुन बीड जिल्‍हयात तेलबिया पिके व कडधान्य पिकांखालील लागवडीस मोठा वाव असल्‍याचे म्‍हणाले.

मान्यवरांचे नुट्रीबास्केट देऊन स्वागत करण्यात करण्‍यात येऊन आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष २०२३ निमित्त कृषी विज्ञान केंद्र येथे तृणधान्याच्या सेल्फी बोर्ड चे उद्घाटन करण्यात आले तसेच केंद्रातर्फे तयार करण्यात आलेले पौष्टिक तृणधान्य विषयीचे  पोस्टरचे मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले. बैठकीत केंद्राचे कार्यक्रम समन्वयक यांनी कृषी विज्ञान केंद्राचे सन २०२२ या वर्षीच्या केलेल्या कार्याचे सादरीकरण केले तसेच विविध शास्त्रज्ञांनी आपआपल्या विषयाचा मागील वर्षी केलेल्या कार्याचा आढावा घेण्‍यात आला.यावेळी मान्‍यवरांनी केंद्राच्‍या कामाची प्रशंसा करून पुढील वर्षी करण्यात येणाऱ्या कामाबद्दल सल्ला दिला. 

कृषी विज्ञान केंद्राने प्रक्षेत्रावर  राबवलेले वेगवेगळ्या तृण धान्याचे पीक संग्रहालय (विविध मिलेट्स ) यांची पाहणी करून कृषी विज्ञान केंद्रातील पिक संरक्षण किटकशास्त्र या विभागामार्फत नव्याने चालू केलेल्या रेशीम किटक संगोपण युनिटचे उद्घाटन करण्यात आले त्याचबरोबर केंद्राच्या प्रक्षेत्रावर असलेल्या शेळीपालन युनिट, आदर्श पोषण बागेस भेट देऊन पाहणी केली. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक कार्यक्रम समन्‍वयक प्रा. दिप्‍ती पाटगावकर यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. हनुमान गरुड यांनी केले तर आभार डॉ तूकेश सुरपाम यांनी मानले. समितीची बैठक यशस्वीतेकरिता कृषी विज्ञान केंद्रातील अधिकारी, कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.