Saturday, October 22, 2022

माननीय कुलगुरू यांनी घेतली विज्ञान संकुलाची माहिती

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या परिसरात विद्यापीठ आणि परभणी अॅस्‍ट्रोनामिकल सोसायटी यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने विज्ञान संकुल उभारण्‍यात येत असुन दिनांक १९ ऑक्‍टोबर रोजी सदर संकुलाबाबत बैठकीचे आयोजन करण्‍यात आले होते. बैठकीस कुलगुरू मा डॉ इ्रन्द्र मणि, पासचे अध्‍यक्ष डॉ रामेश्‍वर नाईक, उपाध्‍यक्ष डॉ पी आर पाटील, श्री समीर धुरडे, सुधीर सोनुनकर, श्री दिपक शिंदे, डॉ प्रविण कापसे, श्री अशोक लाड आदी उपस्थित होते.

यावेळी डॉ रामेश्‍वर नाईक यांनी उभारण्‍यात येत असलेल्‍या विज्ञान संकुल बाबत माहिती दिली तर पुणे येथील इंटर-युनिव्हर्सिटी सेंटर फॉर अॅस्ट्रॉनॉमी अँड अॅस्ट्रोफिजिक्स (IUCAA) चे शास्‍त्रज्ञ श्री समीर धुरडे यांनी लिगो (The Laser Interferometer Gravitational Wave Observatory – LIGO)  इंडिया प्रकल्‍पाबाबत माहिती दिली. कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि यांनी भौतिकशास्‍त्रातील अनेक सिध्‍दांत हे मानवी जीवनातील समस्‍यावर मात करण्‍यास मदत करतात असे सांगितले. 

No comments:

Post a Comment