अर्धापुर (जिल्हा नांदेड) तालुक्यातील मालेगाव येथील आत्मनिर्भर किसान प्रोडूसर कंपनी लिमिटेड व आयडियल ॲग्री सर्च यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त दिनांक १७ ऑगस्ट रोजी मालेगाव येथे भव्य शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता. मेळाव्याचे उद्घाटक वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ. इन्द्र मणि हे होते तर विस्तार शिक्षण संचालक डॉ. देवराव देवसरकर, नांदेड जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री आर बी चलवदे, डेव्हलपमेंट मॅनेजर श्री वैभव कुमार जाधव, नांदेड जि.प. चे कृषि विकास अधिकारी डॉ. टी. जी. चिमणशेटे, आयडियल ॲग्री सर्च लि. चे झोनल मॅनेजर श्री बी. सी.बकाल, अर्धापूर तालुका कृषी अधिकारी श्री अनिल शिरफुले, श्री संतोष गव्हाणे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
मार्गदर्शनात मा डॉ इन्द्र मणि म्हणाले की, शेतकरी देवो भव: म्हणजेच शेतकरी हा समाजासाठी
देवता समान असुन शेतकरी कल्याणासाठी सर्वांनी एकत्रित कार्य करण्याची आवश्यकता आहे.
मेळाव्यात हळद व केळी या विषयावर तज्ञांनी
मार्गदर्शन करण्यात आले. मेळाव्यास मालेगाव
परिसरातील मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधवांनी उपस्थिती होती. कार्यक्रम
यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी श्री दत्ता पाटील
धामदरी कर, गजानन
कोटकर , श्री मारोती देमे, सतीश आरसुळे यांनी परिश्रम घेतले.
No comments:
Post a Comment