Wednesday, August 17, 2022

तुळजापुर येथील कृषि विज्ञान केंद्रास माननीय कुलगुरू डॉ इन्‍द्र मणि यांची सदिच्‍छा भेट

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्‍या तुळजापुर येथील कृषि विज्ञान केंद्रास दिनांक १३ ऑगस्‍ट रोजी सदिच्‍छा भेट देऊन केंद्रातील शास्‍त्रज्ञ व कर्मचारी यांच्‍याशी संवाद साधला. माननीय कुलगुरू यांचे कार्यक्रम समन्वयक श्री. लालासाहेब देशमुख यांनी स्वागत केले. यावेळी केंद्रातील शास्त्रज्ञ वर्षा मरवाळीकर, डॉ विजयकुमार जाधव, गणेश मंडलिक, अपेक्षा कसबे, डॉ. श्रीकृष्ण झगडे, श्री.सखाराम मस्के, डॉ नकुल हरवाडीकर, श्री. शिवराज रूपनर आदींची उपस्थिती होती

याप्रसंगी मार्गदर्शनात कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि म्‍हणाले की, शेतकरी बांधवापर्यंत कृषि तंत्रज्ञान पोहचविण्‍याची जबाबदारी प्रत्‍येक जिल्‍हयातील कृषि विज्ञान केंद्राची आहे. उस्मानाबाद जिल्हयातील जैवविविधता, तापमान, पर्जन्यमान, शेतक-यांच्या असलेल्या विविध समस्या लक्षात घेऊन कृषि विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञांनी कार्य करावे. शास्त्रज्ञांनी जिल्हयातील शेतक-यांच्या विविध समस्यांचा अभ्यास करून राज्यातील व राज्याबाहेरील शासकीय, निमशासकीय संस्थांकडे निरनिराळे प्रकल्प अहवाल सादर करावेत. सर्वांच्‍या सामुदायिक प्रयत्‍नाने विस्‍तार कार्याची व्‍याप्‍ती वाढवुन जास्‍तीत जास्‍त शेतकरी बांधवापर्यंत कृषि तंत्रज्ञान पोहचवु, अशी अपेक्षा व्‍यक्‍त केली.

सौजन्‍य: डॉ विजयकुमार जाधव, कृषि विज्ञान केंद्र, तुळजापुर

No comments:

Post a Comment